Covid Hospital Google
सोलापूर

पाच पोलिसांचा कोरोनामुळे मृत्यू ! आयुक्‍तांच्या मार्गदर्शनाखाली उभारतंय शंभर बेडचे हॉस्पिटल

पोलिस आयुक्‍तांच्या मार्गदर्शनाखाली उभारले जातेय शंभर बेडचे हॉस्पिटल

तात्या लांडगे

सोलापूर : पोलिस वेल्फेअर फंडातून पोलिस मुख्यालयातील पोलिस पब्लिक स्कूलच्या इमारतीत 100 बेडचे कोव्हिड हेल्थ सेंटर उभारले जात आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्याच्या हेतूने नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी रस्त्यांवर पहारा देणाऱ्या पोलिसांना कोरोना काळात तत्काळ उपचार व्हावेत, या हेतूने पोलिस आयुक्‍त अंकुश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली या हॉस्पिटलचे काम अंतिम टप्प्यात आले आहे.

कोरोनाच्या पहिल्या लाटेपासून आतापर्यंत शहर पोलिस दलातील 145 हून अधिक पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांना कोरोना झाला आहे. त्यातील एक अधिकारी व चार कर्मचारी कोरोनाचे बळी ठरले. सद्य:स्थितीत नऊ पोलिस कर्मचाऱ्यांवर उपचार सुरू आहेत. आगामी काळात कोरोना बाधित पोलिसांची सोय व्हावी, त्यांच्यावर तत्काळ उपचार व्हावेत म्हणून त्या हॉस्पिटलमध्ये 70 ऑक्‍सिजन बेड तर 30 सेमी व्हेंटिलेटर बेडही असणार आहेत. एमडी-मेडिसीन डॉक्‍टरांच्या माध्यमातून त्या ठिकाणी उपचार केले जाणार आहेत. पोलिस वेल्फेअर फंडातून त्या वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे वेतन दिले जाणार असून पोलिस असो वा त्यांच्या कुटुंबातील सदस्यांवर मोफत उपचार केले जातील. रेमडेसिव्हीरसह सर्वच औषधांचा मुबलक साठा त्या ठिकाणी ठेवला जाणार आहे. लोकांच्या सुरक्षिततेसाठी स्वत:चा जीव धोक्‍यात घालणाऱ्या पोलिसांसाठी जिल्हा प्रशासनाकडूनही मदत घेतली जाणार आहे.

...त्या कर्मचाऱ्यांचे जाणे लागले जिव्हारी

शहर पोलिस दलातील एक सहाय्यक पोलिस निरीक्षक सेवानिवृत्त झाले होते. त्यांचा रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांची पत्नी, सून व मुलाने पोलिस आयुक्‍तांची भेट घेऊन ऑक्‍सिजन बेड उपलब्ध करून देण्याची विनंती केली. त्यांना बेड उपलब्ध झाले, परंतु कोरोनामुळे त्यांचा मृत्यू झाला. दरम्यान, ड्यूटीवर असलेल्या एका अधिकाऱ्यासह चार पोलिस कर्मचाऱ्यांचाही कोरोनामुळे मृत्यू झाला. त्यानंतर आगामी काळात पोलिसांवर तशी वेळ येऊ नये म्हणून पोलिस आयुक्‍तांनी स्वतंत्र हॉस्पिटल सुरू करण्याचे पाऊल उचलले. त्यासाठी पोलिस उपायुक्‍त बापू बांगर, डॉ. दीपाली धाटे, डॉ. वैशाली कडूकर यांनीही परिश्रम घेतले.

पोलिसांसह त्यांच्या कुटुंबीयांसाठी उचलले पाऊल

पोलिस अधिकारी, कर्मचारी कोरोनाच्या संकटाशी दोन हात करून नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी रात्रंदिवस शहरभर पहारा देत आहेत. त्या पोलिसांची व त्यांच्या कुटुंबीयांची सुरक्षितता म्हणून 100 बेडचे कोव्हिड हेल्थ सेंटर उभारले जात आहे; जेणेकरून त्यांना बेडसाठी इतरत्र फिरावे लागणार नाही.

- अंकुश शिंदे, पोलिस आयुक्‍त, सोलापूर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

T20 World Cup : थरार... दक्षिण आफ्रिकेने दोनवेळा पराभव टाळला ! डबल Super over मध्ये अफगाणिस्तानचा करेक्ट 'गेम' केला

Tutankhamun’s Tomb : थडग्यात सापडली 3,300 वर्षे जुनी सँडल; शत्रूंना पायाखाली तुडवायचा राजा, सँडल्सवर का कोरली होती शत्रूंची चित्रे?

Post Office Jobs 2026: ग्रामीण डाक सेवक पदांची भरती अंतिम टप्प्यात; या उमेदवारांना संधी, जाणून घ्या अर्जाची शेवटची तारीख

Latest Marathi News Live Update : पोलीस भरतीदरम्यान 1600 मीटर धावताना उमेदवाराने गमावला जीव

"त्यांना मी रजनीकांतप्रमाणे धुणार" करण जोहर आणि विकीवर भडकला गोविंदा ; हे आहे कारण !

SCROLL FOR NEXT