AWTADE_GODSE 
सोलापूर

पोटनिवडणुकीसाठी एकाचा अर्ज दाखल ! 22 जणांनी घेतले 24 अर्ज; शैला गोडसे, समाधान अवताडे यांचा समावेश

अभय जोशी

पंढरपूर (सोलापूर) : पंढरपूर - मंगळवेढा विधानसभेच्या पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरावयाच्या मंगळवारी पहिल्या दिवशी संतोष महादेव माने (अपक्ष) या एकमेव उमेदवाराने अर्ज दाखल केला आहे. समाधान आवताडे आणि शैला गोडसे यांच्यासाठी उमेदवारी अर्ज घेण्यात आले. एकूण 22 इच्छुक उमेदवारांनी 24 अर्ज घेतले आहेत, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी गजानन गुरव यांनी दिली. 

मंगळवारी पहिल्या दिवशी संतोष महादेव माने (रा. लेंडवे चिंचाळे, ता. मंगळवेढा) यांनी मंगळवारी अपक्ष अर्ज दाखल केला. तर अन्य काहीजण अर्ज घेऊन गेले. विनोद नानासाहेब कदम यांनी शैला धनंजय गोडसे यांच्यासाठी तर बालम याकूब मुलाणी (तावशी) यांनी स्वतःसाठी एक आणि समाधान आवताडे यांच्यासाठी एक, अभिजित ज्ञानेश्वर मोरे यांनी स्वतःसाठी एक आणि समाधान आवताडे यांच्यासाठी एक अर्ज घेतला. 

अर्ज घेतलेल्या अन्य लोकांची नावे पुढीलप्रमाणे... 
पंडित मारुती भोसले (सरकोली, पंढरपूर), अब्दुलरौफ जाफर मुलाणी (पंढरपूर), रामचंद्र तात्या गंगथडे (कासेगाव), संजय नागनाथ माने (कोर्टी), बळिराम जालिंदर बनसोडे (चळे), नागेश प्रकाश पवार (इसबावी), ऍड. सीताराम मारुती सोनवले (दक्षिण सोलापूर), ऍड. मल्लिकार्जुन सदाशिव टाकणे (पंढरपूर), महेंद्र काशिनाथ जाधव (कासेगाव), सचिन हनुमंत गवळी (मोहोळ), संदीप जनार्दन खरात (माण - खटाव), केदार श्‍याममराव शिंदे (खर्डी), सचिन अरुण शिंदे (आंबे), अशोक ज्ञानदेव वाघमोडे (निलज, करमाळा), सागर शरद कदम (पंढरपूर), गणेश शिवाजी लोखंडे (इसबावी), संजय चरणू पाटील (ब्रह्मपुरी), नामदेव थोरबोले (रड्डे, मंगळवेढा) यांनी अर्ज घेतले आहेत. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Municipal Election : मुंबईसाठी ‘राष्ट्रवादी’ची यादी जाहीर; भाजपला धक्का, मलिक यांच्या कुटुंबातील तिघांना उमेदवारी

Video: 'त्या' एका व्हिडिओमुळे जान्हवी किल्लेकर ट्रोल, संतापून उत्तर देत म्हणाली...'पुर्णपणे माहिती नसताना...'

Latest Marathi News Live Update : उन्नाव बलात्कार प्रकरणातील आरोपी कुलदीप सेंगरच्या जामिनाच्या विरोधात आज सुनावणी

BMC Election नवनाथ बन, तेजस्वी घोसाळकर आणि किरीट सोमय्यांच्या पुत्राला भाजपकडून उमेदवारी, एबी फॉर्मचं वाटप सुरू

farmer Success Story: माळरानावर फुलवली बोरांची बाग; कष्टातून मिळतय अडीच लाखांचे उत्पादन ; बोधेगावातील तरुणाचा यशस्वी प्रयोग!

SCROLL FOR NEXT