टेम्पो व रिक्षाच्या अपघातात पुणे येथील एक ठार, पाच जखमी ! Canva
सोलापूर

टेम्पो व रिक्षाच्या अपघातात पुणे येथील एक ठार, पाच जखमी !

टेम्पो व रिक्षाच्या अपघातात पुणे येथील एक ठार, पाच जखमी !

राजकुमार शहा

टेम्पोला रिक्षाने पाठीमागून जोराची धडक देऊन झालेल्या अपघातात रिक्षा चालकाचा मृत्यू झाला असून, अन्य पाच जण जखमी झाले.

मोहोळ (सोलापूर) : टेम्पोला रिक्षाने पाठीमागून जोराची धडक देऊन झालेल्या अपघातात (Accident) रिक्षा चालकाचा मृत्यू झाला असून, अन्य पाच जण जखमी झाले. हा अपघात 15 ऑगस्ट रोजी दुपारी साडेबारा वाजता सोलापूर- पुणे राष्ट्रीय महामार्गावरील (Solapur-Pune National Haghway) हिवरे (Hiware) शिवारात झाला. बालाजी ओमाने (रा. लोणी काळभोर, जि पुणे) असे मृत रिक्षा चालकाचे नाव आहे. माधुरी सोमनाथ लष्कर (वय 28), सोमनाथ बाबूराव लष्कर (वय 35), लता बाबूराव लष्कर (वय 45), बाबूराव दुर्गा लष्कर (वय 54), हर्ष सोमनाथ लष्कर (वय दीड वर्ष, सर्व रा. लोणी काळभोर, जि. पुणे) (Loni Kalbhor, Pune) अशी जखमींची नावे आहेत.

याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, लोणी काळभोर येथील लष्कर कुटुंबीय 15 ऑगस्ट रोजी नातवाचे जावळ काढण्यासाठी रिक्षाने लोणी काळभोरहून तुळजापूरकडे निघाले होते. दुपारी साडेबारा वाजता रिक्षा (क्र. एम. एच. 12 के. आर. 0953) ही हिवरे गावच्या शिवारात आली असता रिक्षा चालकाचे नियंत्रण सुटल्याने रिक्षाने महामार्गाने सोलापूरच्या दिशेने निघालेल्या टेम्पोला (क्र. टी. एन. 87 बी. 5355) ला पाठीमागील बाजूने जोराची धडक दिली. त्यामुळे भीषण अपघात होऊन रिक्षामधील सर्व जण गंभीर जखमी झाले.

यावेळी टेम्पो चालक नानाभाऊ धर्मा पाखरे (रा. मोरे वस्ती, कुरुळी ता. खेड, जि पुणे) याने सावळेश्वर टोल नाक्‍याची रुग्णवाहिका बोलावून घेतली. त्यानंतर जखमींना उपचारासाठी सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. दरम्यान, वाटेतच उपचारापूर्वी रिक्षाचालक बालाजी ओमाने याचा मृत्यू झाला. तर उर्वरित पाच जणांवर उपचार सुरू आहेत. त्यापैकी माधुरी लष्कर यांना गंभीर दुखापत झाल्याने त्यांना एका खासगी रुग्णालयातील अतिदक्षता विभागात हलविण्यात आले असून, त्यांची प्रकृती चिंताजनक आहे.

या प्रकरणी आकाश चंद्रकांत वाघ (रा. कुर्डुवाडी) यांनी मोहोळ पोलिसात खबर दिली असून, तपास सहाय्यक फौजदार अवि शिंदे करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPS Officers Transfers: महाराष्ट्रात पोलीस दलात मोठा फेरबदल! २१ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदली; कुणाची कुठे नेमणूक? जाणून घ्या यादी...

IPL 2026 Point Table: गुजरात टायटन्सने विजय मिळवून PlayOff ची चुरस अधिक रंजक बनवली; रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूवर सहज मात

HSC Result: मोठी बातमी! महाराष्ट्र बोर्डाच्या १२वी निकालाची तारीख जाहीर, कधी आणि कसा पाहता येणार? जाणून घ्या संपुर्ण प्रक्रिया

GT vs RCB Live: एवढा राग...! शुभमन गिलची कॅच घेतल्यावर विराट कोहलीने काय केलं? त्याच्याकडून अशी अपेक्षा नव्हती Video Viral

Pune News : पोलिस महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर; पुणे, पिंपरी-चिंचवड आणि पुणे ग्रामीणमधील ३२ अधिकारी, अंमलदारांचा समावेश

SCROLL FOR NEXT