1yoga1.jpg 
सोलापूर

ऑनलाइन सहजयोग ध्यान वरदानच 

प्रशांत देशपांडे

सोलापूर : सहजयोग ध्यानाला नुकतेच 50 वर्षे पूर्ण झाली आहेत. संपूर्ण विश्‍वाचे चक्र अचानक थांबले आणि सर्व साधक आपल्या घरातच बंदिवासात गेले. 120हून अधिक देशांतील सहयोग ध्यान केंद्रांत या साथीच्या रोगामुळे सामूहिक साप्ताहिक ध्यानकेंद्र स्थगित करावे लागले. अशा अनिश्‍चित परिस्थितीत, ऑनलाइन ध्यान एक वरदानच ठरले आणि यात बघता- बघता सुमारे 80-85 देशांतील लाखो सहजयोगी साधक आणि नवीन साधकही पुण्यातील श्री माताजींचे जगप्रसिद्ध निवासस्थान "प्रतिष्ठान' येथून प्रसारित होत असलेल्या ऑनलाइन कार्यक्रमांतून फेसबुक आणि यूट्यूबद्वारे जोडले गेले आहेत. 

याच अनुषंगाने मागील 60 दिवसांत लॉकडाउन कालावधीत ऑनलाइन ध्यान कार्यक्रम आयोजित केल्याने 9 मे रोजी जगभरातील सहजयोग कुटुंबाला तीन विश्‍व विक्रमांनी गौरविण्यात आले. ग्लोबल रेकॉर्डस अँड रिसर्च फाउंडेशन (जी.आर.आर.एफ.) ही विश्‍वविक्रम आणि पुरस्कारांसाठी एक जागतिक दर्जाची संस्था असून ज्याने 22 मार्च ते 5 मे दरम्यान ऑनलाइन सहजयोग ध्यान कार्यक्रमांना तीन प्रतिष्ठित विश्‍व विक्रम पुरस्कार प्रदान केले. 

एक म्हणजे ग्लोबल रेकॉर्ड सर्वात मोठ्या सामूहिकतेद्वारे ऑनलाइन ध्यान. दुसरा आशिया पॅसिफिक रेकॉर्ड - आशिया खंडातील सर्वात जास्त नागरिकांद्वारे केले गेलेले ऑनलाइन ध्यान आणि तिसरा म्हणजे राष्ट्रीय रेकॉर्ड - सर्वात मोठे दररोज केले जाणारे ऑनलाइन ध्यान. या सहजयोगाला 50 वर्षे पूर्ण झाल्याने सुवर्ण महोत्सवी उत्सव, यूट्यूब आणि फेसबुकद्वारे खासकरून नवीन साधकांसाठी सामूहिक ध्यान आणि अन्य आध्यात्मिक कार्यक्रम 22 मार्च ते 5 मे या कालावधीत आयोजित केले आहेत. 

लॉकडाउन दरम्यान सहजयोग ध्यान करण्यासाठी मागील 60 दिवसांत दैनंदिन सुमारे चार लाख साधकांनी पुणे प्रतिष्ठानच्या यूट्यूब वाहिनीला 90 देशांतून भेट दिली. 3 मे रोजी तीन लाखांहून अधिक नवीन साधकांनी ऑनलाइन आत्म-साक्षात्कारचा लाभ घेतला होता. 

ऑनलाइन ध्यान सत्र 

  •  सहजयोगाचे सकाळ-संध्याकाळचे ध्यान निःशुल्क दररोज (भारतीय वेळेनुसार) पहाटे 5:30 आणि संध्याकाळी सात वाजता केले जाते. 
  • नवीन साधकांसाठी विनामूल्य ध्यान कार्यक्रम : 
  •  लॉकडाउन कालावधीत प्रतिकारशक्ती सुधारण्यासह, मानसिक, आध्यात्मिक आणि भावनिक आरोग्य सुधारण्यासाठी साधकांना मार्गदर्शन करण्यासाठी दररोज संध्याकाळी पाच वाजता यूट्यूब आणि ऑनलाइन रेडिओद्वारे 90 मिनिटांच्या सत्रादरम्यान ध्यान आणि अन्य ध्यान संबंधित क्रिया केल्या जातात. 
  •  मागील 60 दिवसांत अनेक नवीन साधकांनी तंबाखू आणि धूम्रपान करण्यासारख्या वाईट सवयीपासून मुक्ती मिळवली. काही नागरिक त्यांच्या औदासिन्य आणि मानसिक तणावातून बाहेर आले. 
  • झोप न येण्याची समस्याही दूर झाली. 

 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND VS AFG 3RD T20I: अभिषेक शर्माने इतिहास रचला; ट्वेंटी-२०तील सर्वात वेगवान शतक!मोडला रोहित शर्माचा विक्रम, विराटशी बरोबरी

Pune Ganeshotsav Traffic : पुण्यात गणेशोत्सवानिमित्त वाहतुकीत मोठा बदल; 18 ते 25 सप्टेंबरदरम्यान 'हे' प्रमुख रस्ते राहणार बंद, जाणून घ्या महत्त्वाचे पर्यायी मार्ग

Gangapur Sugar Mill: गंगापूर सहकारी साखर कारखाना कर्जमुक्त करण्याचा निर्धार; जय हिंदने गाळप केलेल्या ऊसाचे बिल १५ दिवसांत देण्याचे आश्वासन

Social Media Ban : मुलांचं मानसिक आरोग्य धोक्यात? 13 वर्षांखालील मुलांना सोशल मीडियावर बंदी; किशोरवयीनांसाठीही कडक नियम, EU Kids Act मध्ये काय आहे?

Latest Marathi News Update : वाघूळखेडा शिवारात शेतात काम करणाऱ्या मजुरांवर कोसळली वीज; दुर्घटनेत तीन महिलांचा जागीच मृत्यू

SCROLL FOR NEXT