Chinies Rakhi 
सोलापूर

चिनी राख्या हद्दपार..! राखी पौर्णिमेसाठी बाजारात यंदा एक-दोन टक्केच चिनी राख्यांचा समावेश; दरवर्षी असायचा "इतका' हिस्सा 

प्रकाश सनपूरकर

सोलापूर : दरवर्षी राखी पौर्णिमेच्या सणासाठी सर्वाधिक राख्या चीनमधून येतात. त्यामध्ये प्रामुख्याने कार्टून चित्रे असलेल्या राख्यांचा समावेश असतो. बच्चे कंपनीला आवडणाऱ्या कार्टूनची चित्रे असलेल्या राख्यांची विक्री बाजारात मोठ्या प्रमाणात होते. त्या खालोखाल राख्यांमध्ये छोटासा लागणाऱ्या दिव्याची राखी देखील आकर्षण असते. त्यासाठी अगदी राखीचा पारंपरिक आकार सोडून राखीचा धागा चक्क एका छोट्या बाहुलीला बांधलेला असतो. या बाहुलीमध्ये छोटासा दिवा लावलेला असतो. या राखीचे देखील मोठी विक्री होते. या राख्या प्रामुख्याने चीनच्या व्यापारातून येत असतात. मात्र राखी पौर्णिमा सणासाठी बाजारात दरवर्षी 10 ते 20 टक्के हिस्सा असलेल्या, चीनमध्ये उत्पादित झालेल्या या राख्यांचे प्रमाण यंदा अगदीच एक ते दोन टक्‍क्‍यांवर आले आहे. 

यावर्षी कोरोना व नंतर चीनच्या ताणलेल्या संबंधामुळे चीनबद्दल सर्वत्र नाराजी व्यक्त केली जात आहे. सर्वसामान्यांमध्ये असलेल्या चीनच्या उत्पादनांबद्दलची नाराजी पाहून व्यापाऱ्यांनी देखील चीनच्या राख्या आणण्यासाठी हात आखडता घेतला आहे. त्यामुळे एरव्ही 10 ते 20 टक्‍क्‍यांपर्यंत राखी मार्केटमध्ये असलेल्या चीनच्या राख्या अगदीच एक ते दोन टक्के विक्रीस आल्या आहेत. त्यालाही ग्राहक मिळणार नाहीत, असा व्यापाऱ्यांचा अंदाज आहे. या राख्यांच्या उपलब्धतेबद्दल व्यापारी फारसे बोलण्यास देखील तयार नाहीत. 

काही दुकानांवर बाहुलीच्या आकाराच्या राख्या दिसून आल्या. कार्टून लावलेल्या चीनच्या राख्या देखील अगदीच कमी प्रमाणात दिसून आल्या आहेत. एकंदरीत, या वर्षीची राखी पौर्णिमा चीनच्या राख्यांशिवाय होईल, असा अंदाज आहे. राखी बाजारातील चीनच्या उत्पादनांचा हिस्सा 10 ते 20 टक्के पूर्वी होता. हा हिस्सा आता एक ते दोन टक्‍क्‍यांवर आला आहे. काही राख्या चीनमध्ये उत्पादित झालेल्या तर उर्वरित राख्या भारतीय मालासोबत असेंबल केल्या जात असल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे. तसेच चीनच्या मालाबद्दल कोणताही पुरावा या राखी प्रकारात प्रिंटेड दिसत नाही. याउलट भारतीय उद्योजकांकडून केवळ चीनच्या काही वस्तूंचा वापर करून या राख्या भारतीय उद्योजकांच्या नावाने विकल्या जातात. त्यामुळे केवळ दिव्यांचे तंत्र व कार्टूनची चित्रे या दोनच गोष्टींद्वारे चीनचा सहभाग असलेली राखी ओळखता येते. परंपरागत स्वस्तिक, गोंडे, फुलांचे नक्षीकाम, साधा पद्धतीचा धागा यावरून भारतीय पद्धतीच्या राखीचे स्वरूप यावरून ओळखता येते. 

येथील राखी विक्रेता रोहित शहा म्हणाले, या वर्षी चीनच्या राख्यांचा माल अगदी एक ते दोन टक्के बाजारात आहे. त्याला फारशी मागणी नाही. तसेच या राख्या चिनी बनावटीच्या आहेत किंवा नाहीत हे देखील समजून येत नसल्याने कुठल्या राख्या चीनच्या आहेत, हे कळून येत नाही. 

राखी विक्रेता विश्‍वनाथ मंठाळकर म्हणाले, आम्ही कोलकता भागातून व स्थानिक भागात तयार केलेल्या पारंपरिक राख्या मागवत असतो. त्याची विक्री करतो. या वर्षी लाईट लागणाऱ्या राख्या आम्ही खरेदी केल्या नाहीत. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hardik Pandya Reaction : लाजीरवाण्या पराभवानंतर MI कॅप्टन हार्दिक संतापला; जसप्रीत बुमराहसह बघा कोणाकोणावर खापर फोडलं, वैभव सूर्यवंशीबाबत म्हणाला...

RR vs MI Live: मुंबई इंडियन्सचे 'तारे जमीन पर'! राजस्थान रॉयल्सची विजयी हॅटट्रिक; IPL 2026 Point Table मध्ये मोठा बदल

IPL 2026 Orange Cap : नाद करा, या पोरांचा नको... यशस्वी जैस्वाल, वैभव सूर्यवंशीने 'ऑरेंज' कॅप शर्यतीत रोहितला मागे सोडले;Top Five List

RR vs MI Live: हटा सावन की घटा... वैभव सूर्यवंशीचा तोरा... जसप्रीत बुमराहचा पहिलाच चेंडू षटकार, ३ चेंडूंत कुटल्या १३ धावा, Video

Manoj Jarange: मनोज जरांगेंनी टाळलं अन् धनंजय मुंडे हेलिकॉप्टरने पोहोचले; महंत म्हणाले, सर्वांना सोबत घेऊन चालण्याची परंपरा...

SCROLL FOR NEXT