opration parivartan esakal
सोलापूर

SP सातपुतेंचे ऑपरेशन परिवर्तन! रोजगार मेळाव्यातून १०० जणांना नोकरी

जिल्ह्याला हातभट्टी दारूमुक्त करण्याच्या निमित्ताने पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी सुरू केलेल्या ‘ऑपरेशन परिवर्तन’ अंतर्गत आज (शनिवारी) उद्योजक राम रेड्डी यांच्या उपस्थितीत दुसरा रोजगार मेळावा पार पडला. ११ कंपन्यांच्या प्रतिनिधींनी १०० तरुणांच्या मुलाखती घेतल्या.

तात्या लांडगे

सोलापूर : जिल्ह्याला हातभट्टी दारूमुक्त करण्याच्या निमित्ताने पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी सुरू केलेल्या ‘ऑपरेशन परिवर्तन’ अंतर्गत आज (शनिवारी) उद्योजक राम रेड्डी यांच्या उपस्थितीत दुसरा रोजगार मेळावा पार पडला. ११ कंपन्यांच्या प्रतिनिधींनी १०० तरुणांच्या मुलाखती घेतल्या.

जिल्ह्यातील मुळेगाव तांड्यासह इतर तांड्यांवरील हातभट्टी दारू निर्मिती व विक्रीचा अवैध व्यवसाय समूळ नष्ट व्हावा, यासाठी पोलिस अधीक्षक सातपुते यांनी एक मोहीम हाती घेतली. त्याअंतर्गत ४८० जणांनी अवैध व्यवसाय सोडून समाजमान्य व्यवसाय सुरू केला आहे. तर हातभट्टी दारू निर्मिती करणाऱ्यांच्या मुलांना रोजगार मिळावा, पारधी समाजातील व पोलिस पाल्यांनाही नोकरी मिळावी म्हणून त्यांनी यापूर्वी मोठा रोजगार मेळावा घेतला होता. त्यावेळी ९०० जणांना नोकरीची संधी मिळाली होती. आता पुन्हा रोजगार मेळावा आयोजित करून १०० तरुणांना रोजगाराची संधी उपलब्ध करून दिली आहे. चिंचोळी एमआयडीसीतील उद्योग भवनात पार पडलेल्या या रोजगार मेळाव्याला पोलिस अधीक्षकांसह अप्पर पोलिस अधीक्षक हिंमत जाधव, उपविभागीय पोलिस अधिकारी अमोल भारती, सोलापूर इंडस्ट्रीज असोसिएशनचे सचिव वासुदेव बंग, उपाध्यक्ष गणेश सुत्रावे, सहसचिव रामेश्वरी गायकवाड, कार्यकारी सदस्य तारासिंग राठोड, शिवशंकर आंधळकर आदी उपस्थित होते.

दोन दिवसांत मिळणार नियुक्तिपत्र
पोलिस अधीक्षकांच्या ‘ऑपरेशन परिवर्तन’अंतर्गत आयोजित रोजगार मेळाव्यात मुलाखत दिलेल्या तरुणांना त्यांच्या शैक्षणिक पात्रतेनुसार दोन दिवसांत नियुक्तिपत्र मिळणार आहे. यावेळी पोलिस उपअधीक्षक ज्योतिराम गुंजवटे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक सुहास जगताप, पोलिस निरीक्षक अरुण फुगे, राखीव पोलिस निरीक्षक आनंद काजूळकर व पोलिस उपनिरीक्षक सुबोध जमदाडे यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sting Ban: विद्यार्थ्यांच्या आरोग्यासाठी मोठा निर्णय! शाळांजवळ ५०० मीटरमध्ये स्टिंग पेय विक्रीवर बंदी, महायुती सरकारचे महत्त्वाचे निर्देश

Shaktipeeth Expressway : शेतीच्या मुळावर उठलेला शक्तिपीठ रद्द करा; उरुण-ईश्वरपूर पालिकेत सत्ताधारी-विरोधकांत जोरदार खडाजंगी, बहुमताच्या जोरावर ठराव मंजूर

Nanarao Peshwa Park: झाशीची राणी जिथे घोडेस्वारी शिकल्या, ते ठिकाण पाहिलंय का? तात्या टोपेंचा खंजीर अन् १८५७ ची गाथा...हा ऐतिहासिक प्रवास चुकवू नका

Ketan Agrawal Murder : केतन अग्रवाल हत्याकांडाचे बीड कनेक्शन, सिया-चेतनला मदत करणारा 'तो' तरुण कोण? तपासात धक्कादायक माहिती समोर

Latest Marathi News Live Update : कोल्हापूर जिल्ह्यातील गडहिंग्लज भागात मुसळधार पाऊस

SCROLL FOR NEXT