Engineering Students
Engineering Students Esakal
सोलापूर

सोलापूरच्या शासकीय अभियांत्रिकीतून 300 विद्यार्थ्यांना संधी !

तात्या लांडगे

गव्हर्नमेंट पॉलिटेक्‍निक कॉलेजच्या आवारातच शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय सुरू करण्यासंदर्भातील कृती आराखडा आठ दिवसांत उच्च व तंत्रशिक्षण विभागाच्या सचिवांना सादर केला जाणार आहे.

सोलापूर : गव्हर्नमेंट पॉलिटेक्‍निक कॉलेजच्या (Government Polytechnic College) आवारातच शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय (Government Engineering College) सुरू करण्यासंदर्भातील कृती आराखडा आठ दिवसांत उच्च व तंत्रशिक्षण विभागाच्या सचिवांना सादर केला जाणार आहे. आमदार प्रणिती शिंदे (MLA Praniti Shinde) यांच्या पाठपुराव्यातून पुढील वर्षीपासून (सन 2022-23) विद्यार्थ्यांना त्या कॉलेजमधून माफक दरात प्रवेश घेता येईल, यादृष्टीने उच्च व तंत्रशिक्षण विभागाने (Department of Higher and Technical Education) नियोजन केले आहे. (Opportunity for three hundred students from Government Engineering College, Solapur)

विद्यार्थ्यांअभावी बंद पडण्याच्या मार्गावरील सोलापुरातील तंत्रनिकेतन महाविद्यालय बंद करू नये, अशी मागणी आमदार प्रणिती शिंदे यांनी उच्च शिक्षणमंत्र्यांकडे सातत्याने केली होती. दुसरीकडे, त्याच ठिकाणी नवीन शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय सुरू करावे, अशी मागणीही त्यांनी लावून धरली. त्यांच्या पाठपुराव्यानंतर उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी त्यासंदर्भातील प्रस्ताव तत्काळ सादर करावा, असे आदेश संचालकांना दिले आहेत. सोलापुरातील गव्हर्नमेंट पॉलिटेक्‍निक कॉलेज 1956 पासून सुरू आहे. त्या ठिकाणी स्थापत्य, संगणक, विद्युत, अणुविद्युत व दूरसंचारण, यंत्र, माहिती तंत्रज्ञान व वस्त्रनिर्माण असे पदविका अभ्यासक्रम संपूर्ण क्षमतेने सुरू आहेत. अत्यल्प व माफक शैक्षणिक शुल्कात शिक्षण मिळते. महाविद्यालयातून अनेकांना रोजगार मिळाला असून अनेक लहान-मोठे उद्योजकही तयार झाले आहेत. शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय सुरू झाल्यानंतर पॉलिटेक्‍निक महाविद्यालयातील मुलांना त्याच ठिकाणी पुढील शिक्षण घेण्याची सोय उपलब्ध होईल, असेही आमदार प्रणिती शिंदे यांनी मंत्र्यांना सांगितले. त्यानुसार आता तातडीने कार्यवाही सुरू झाली आहे.

अभियांत्रिकी कॉलेज सुरू करण्यासाठी...

  • उच्च व तंत्रशिक्षण विभागाच्या सचिवांना संचालकांकडून सादर होतो कृती आराखडा

  • नवीन शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाचा प्रस्ताव शासनामार्फत नियोजन व वित्त विभागाकडे जातो

  • वित्त विभागाच्या मान्यतेनंतर कॅबिनेटमध्ये त्याला अंतिम मंजुरी दिली जाते

  • कॅबिनेटच्या मंजुरीसह अभियांत्रिकी महाविद्यालयाचा प्रस्ताव नवी दिल्लीतील "एआयसीटीई'कडे पाठवावा लागतो

  • अभियांत्रिकी कॉलेज सुरू करण्याच्या पहिल्या वर्षी किमान अडीच हजार स्क्‍वेअर मीटर बांधकाम, प्रयोगशाळा, वर्कशॉप, पिण्याचे पाणी अशा पायाभूत सुविधा बंधनकारक

  • चार वर्षांत एकूण आठ हजार 900 स्क्‍वेअर मीटर बांधकाम करणे बंधनकारक; प्रवेश क्षमता असते तीनशेपर्यंत

सोलापुरातील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय पुढील वर्षीपासून सुरू होईल, असे नियोजन उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत (Higher and Technical Education Minister Uday Samant) यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. आठ दिवसांत त्यासंदर्भातील कृती आराखडा (डीपीआर) सचिवांना सादर केला जाईल.

- डॉ. अभय वाघ, संचालक, उच्च व तंत्रशिक्षण विभाग, पुणे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RSS: आता ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही 'नकली आरएसएस' म्हणतील; नड्डांच्या फुलटॉसवर, ठाकरेंचा षट्कार

PM मोदींच्या द्वेषयुक्त भाषणाच्या आरोपावर काय कारवाई केली? न्यायालयाचा पोलिसांना सवाल! ५ जूनपर्यंत मागवला अहवाल

भाजपला RSS ची गरज आहे का? जेपी नड्डांनी एका वाक्यात संपवला विषय, BJP मध्ये अंतर्गत राजकारण पेटणार

RCB vs CSK : पावसामुळे 5-5 किंवा 10-10 ओव्हरचा सामना झाला तर कसे असेल RCBचे गणित? जाणून घ्या समीकरण

Mallikarjun Kharge : ''राज्यात 'मविआ'ला कमीत कमी ४६ जागा मिळतील'' खर्गेंचा दावा; इंडिया आघाडीची पत्रकार परिषद

SCROLL FOR NEXT