Opposition to take over a hospital for corona in Malshiras taluka
Opposition to take over a hospital for corona in Malshiras taluka 
सोलापूर

आमदार सातपुते म्हणतायेत ‘म्हणून’ महात्मा फुले जीवनदायी आरोग्य योजना सुरू असलेली रुग्णालये ताब्यात घेऊ नका

सुनील राऊत

नातेपुते (सोलापूर) : कोव्हीड 19 चा सोलापूर शहरातील वाढता प्रभाव लक्षात घेता, खबरदारीचा उपाय म्हणून माळशिरस तालुक्यातील प्रशासनाने अकलूजमधील महात्मा फुले जीवनदायी आरोग्य योजना ज्या दवाखान्यात सुरू आहे ते दवाखाने खबरदारीचा उपाय म्हणून कोरोनाग्रस्तांसाठी ताब्यात घेण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्या सूचना अव्यवहार्य असून हे दवाखाने ताब्यात घेऊ नयेत, असे ठाम मत आमदार राम सातपुते यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना व्यक्त केले.
आमदार राम सातपुते म्हणाले, संपूर्ण जिल्ह्यातच नव्हे तर शेजारील सातारा, सांगली व पुणे जिल्ह्यातील अनेक रुग्ण उपचारासाठी मेडिकल हब म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अकलूजमध्ये येत असतात. सध्या अकलूजमध्ये कदम हॉस्पिटल, क्रिटीकेअर हॉस्पिटल आणि देवडीकर हॉस्पिटल या हॉस्पिटलमध्ये महात्मा फुले जीवनदायी आरोग्य योजना सुरू आहे. या योजनेचा लाभ गोरगरीब तळागाळातील लोकांना मिळत आहे. समजा प्रशासनाने कोरोनाग्रस्तांसाठी खबरदारीचा उपाय म्हणून ही हॉस्पिटल ताब्यात घेतली, तर एकट्या देवडीकर हॉस्पिटलमध्ये महिन्याकाठी 900 रुग्णांच्या डायलिसिस केल्या जातात. याचबरोबर क्रिटीकेअर हॉस्पिटलमध्ये जवळपास 70 ऍन्जिओग्राफी आणि 30 एन्जोप्लास्टी महिन्याकाठी होतात, तर कदम हॉस्पिटलमध्ये ही अनेक गोरगरीब रुग्णांना लाभ दिला जातो. याचबरोबर हार्टअटॅक, सर्पदंश, विषारी औषध प्राशन केलेले अनेक रुग्ण व इतर आजारांचे पेशंट ही सदर हॉस्पिटलमध्ये भरती असून उपचार घेत आहेत.
अशी हॉस्पिटल खबरदारीचा उपाय म्हणून प्रशासनाने ताब्यात घेतली तर या हॉस्पिटलमध्ये उपचार घेणाऱ्यावरील रुग्णांची पर्यायी व्यवस्था काय? दुसऱ्या तालुक्यात उपचारासाठी जाणे हे या ठिकाणच्या सर्वसामान्य गोरगरीब जनतेला परवडणार नाही. महात्मा फुले जीवनदायी आरोग्य योजनेचा लाभ इतर ठिकाणी मिळेल की नाही? हेही सांगता येत नाही, यामुळे लॉकडाऊनच्या काळात होणारा खर्च सर्वसामान्यांना परवडणारा आहे का? याउलट उपजिल्हा रुग्णालय अकलूज, माळशिरस, नातेपुते आदी ठिकाणची शासकीय दवाखाने कोरोनाग्रस्तांसाठी खबरदारीचा उपाय म्हणून सज्ज ठेवावेत. आयएमए माळशिरस तालुका यांच्या वतीने याठिकाणी अथवा प्रशासन जिथे कोव्हीड 19 हॉस्पिटल तयार करेल अशा ठिकाणी रोटेशनप्रमाणे वैद्यकीय सेवा देण्यासाठी माळशिरस तालुक्यातील सर्वच खासगी डॉक्टर तयार आहेत हे तालुक्यातील डॉक्टरांनी सांगितले आहे. 
या खाजगी हॉस्पिटलमधील डॉक्टरांनी आपल्या हॉस्पिटलमधील बेड, व्हेंटिलेटर आदी वैद्यकीय साधनसामग्री यासाठी देऊ असेही आश्वासन प्रशासनाला दिले आहे. याउलट जर प्रशासनाने देवडीकर हॉस्पिटल, कदम हॉस्पिटल आणि क्रीटीकेअर हॉस्पिटल ताब्यात घेतली तर हे दवाखाने भाड्याच्या जागेत सुरू असून यासाठी देण्यात येणारे भाडे कोण देणार? या हॉस्पिटलमध्ये काम करणारे जे वैद्यकीय कर्मचारी आहेत त्यांच्या पगाराचे व सुरक्षिततेचे धोरण काय?, असे एक ना अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. यामुळे प्रशासनाने कोणतेही आडमुठे धोरण न स्वीकारता भविष्यातील कोरोना रुग्णांची वाढ होणार नाही याची काळजी घ्यावी व योग्य ती खबरदारीही घ्यावी. परंतु संपूर्ण माळशिरस तालुक्यात अकलूजमध्ये दोनच कोरोनाग्रस्त रुग्ण आढळले आहेत. यामुळे प्रशासनाने गांगरून न जाता सर्वसामान्य गोरगरीब जनतेच्या हिताचा विचार करून कोव्हीड-19 साठी खबरदारीचा उपाय म्हणून शासकीय दवाखान्यात अधिकची व्यवस्था करता येत आहे, ती करावी मात्र इतर रुग्णांची हेळसांड होणार नाही अशा प्रकारचे धोरण ठरवावे. याबाबत जिल्हाधिकारी यांच्याशी बोलणार असून हॉस्पिटल ताब्यात घेण्याचा अवसानघातकी निर्णय माळशिरस तालुक्यातील प्रशासनाने घेऊ नये. अन्यथा जनतेच्या रोषाला प्रशासनाला सामोरे जावे लागेल आणि हे होऊ नये यासाठी योग्य ती खबरदारी घ्यावी. तसेच, तालुक्यात 1 उपजिल्हा रुग्णालय, दोन ग्रामीण रूग्णालय, 11 प्राथमिक रुग्णालये आहेत. या इमारतीत अगोदर कोवीड सेंटर सुरू करावीत. ती अपुरी पडली तर खाजगी घ्यावीत असे आमदार राम सातपुते यांनी सांगितले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Arvind Kejriwal: नायब राज्यपालांकडून केजरीवाल पुन्हा टार्गेट! खलिस्तान्यांकडून पैसा घेतल्याची केली NIAकडं तक्रार

Team India Jersey: T20 वर्ल्ड कपमध्ये टीम इंडिया दिसणार नव्या रुपात, नवी जर्सी झाली लाँच; पाहा Video

IPL 2024 MI vs SRH Live Score: हार्दिक-चावलाची भेदक गोलंदाजी, पण हेड- कमिन्सच्या फटकेबाजीमुळे हैदराबादचे मुंबईसमोर 174 धावांचे लक्ष्य

Hires Women to Seduce Men: पबमध्ये पुरुषांना भुरळ घालण्यासाठी महिलांची नियुक्ती; पोलिसांच्या छाप्यात धक्कादायक प्रकार उघड

Sunita Williams News : अभिमानास्पद! सुनीता विल्यम्स पुन्हा घेणार अंतराळात झेप; सोबत नेणार भगवद्‍गीता अन् 'ही' खास मूर्ती

SCROLL FOR NEXT