सोलापूर

बनावटगिरीला संधी देणारा ‘शिक्षण’चा आदेश। अतिरिक्त शिक्षक वाढण्याची भीती

यंदा आधारकार्ड आधारित ऑनलाइन संचमान्यता होणार आहे. पण, काही विद्यार्थ्यांचे आधार क्रमांक अपलोड होत नाहीत तथा आधारकार्ड असूनही तांत्रिक अडचणींमुळे काहींचा अंगठा ग्राह्य धरला जात नसल्याने विद्यार्थ्यांचा पट कमी दिसत आहे. त्यामुळे शालेय शिक्षण विभागाने मागील महिन्यात नवा आदेश काढला आहे. त्यानुसार तो विद्यार्थी त्याच शाळेतील असल्याची खात्री करण्यासाठी शालेय शिक्षण विभागाने चारजणांची समिती नेमली आहे.

तात्या लांडगे

सोलापूर : यंदा आधारकार्ड आधारित ऑनलाइन संचमान्यता होणार आहे. पण, काही विद्यार्थ्यांचे आधार क्रमांक अपलोड होत नाहीत तथा आधारकार्ड असूनही तांत्रिक अडचणींमुळे काहींचा अंगठा ग्राह्य धरला जात नसल्याने विद्यार्थ्यांचा पट कमी दिसत आहे. त्यामुळे शालेय शिक्षण विभागाने मागील महिन्यात नवा आदेश काढला आहे. त्यानुसार तो विद्यार्थी त्याच शाळेतील असल्याची खात्री करण्यासाठी शालेय शिक्षण विभागाने चारजणांची समिती नेमली आहे. या समितीच्या मंजुरीनंतरच तो मुलगा त्या शाळेच्या पटसंख्येत ग्राह्य धरला जाणार आहे.

जिल्ह्यातील जवळपास तीन हजार २०० प्राथमिक शाळांमध्ये अंदाजित साडेतीनशे ते चारशे शिक्षक अतिरिक्त होतील, असा अंदाज प्राथमिक शिक्षण विभागाने वर्तविला आहे. त्यानुसार शिक्षणाधिकाऱ्यांनी जिल्हा परिषदेसह खासगी प्राथमिक शाळांमधील पटसंख्येची माहिती घेऊन अतिरिक्त शिक्षकांसह रिक्त तथा नव्याने निर्माण झालेल्या पदांची माहिती मागविली आहे. अद्याप दीडशेहून अधिक शाळांनी तशी माहिती सादर केलेली नाही. त्यांनी शालेय शिक्षण विभागाच्या आदेशाचा आधार घेत आपल्या शाळेतील एकही शिक्षक अतिरिक्त होणार नाही, यादृष्टीने प्रयत्न सुरू केल्याची चर्चा आहे. केंद्र प्रमुखांच्या अध्यक्षतेखालील त्या समितीत संबंधित शाळेचे मुख्याध्यापक, अंगणवाडी सेविका व आरोग्य सेविका हे आहेत. या समितीकडून शाळेने नाव सांगिलेला मुलगा त्यांच्याच शाळेतील आहे की नाही, याची खात्री केली जात आहे. त्या समितीचा अहवाल शालेय शिक्षण विभागाला पाठविला जाणार असून, त्यानुसार सुधारित संचमान्यता होईल. त्यानंतर अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांचे समायोजन केले जाईल आणि त्यानंतरच शिक्षकांच्या बदल्यांचा मार्ग मोकळा होईल, अशी माहिती उपशिक्षणाधिकारी संजय जावीर यांनी दिली.

‘तो’ आदेश म्हणजे बनावटगिरीला संधीच
कोरोनातील निर्बंधांमुळे अनेक पालकांनी मुलांसह गाव तथा शहर सोडले. त्यातील बरीच मुले दुसऱ्या शाळेत जात आहेत. तरीही, त्यांचे नाव पूर्वीच्या शाळेच्या हजेरीपटावर आहे. आपल्या शाळेतील शिक्षक अतिरिक्त होऊ नयेत म्हणून शाळांनी पटसंख्येची जुळवाजुळव सुरू केल्याची चर्चा आहे. या पार्श्वभूमीवर शाळेकडे आधार क्रमांक आहे, पण त्याचा अंगठा सरल पोर्टलवर ग्राह्य धरला गेलेला नाही, तो मुलगा त्याच शाळेचा विद्यार्थी आहे का, तो शाळेत येतोय का, याची खात्री त्या समितीतर्फे केली जात आहे. प्राथमिक विशेषत: खासगी शाळांना पटसंख्या वाढवून दाखविता यावी म्हणूनच शालेय शिक्षण विभागाने हा आदेश काढलाय का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT