सोलापूर

सोलापूरमध्ये सहाय्यक आयुक्तांच्या अंतर्गत बदल्यांचे आदेश

शहर पोलिस आयुक्तालयास पाच सहायक पोलिस आयुक्‍त मिळाले.

सकाळ वृत्तसेवा

सोलापूर : शहर पोलिस आयुक्तालयातील सहायक पोलिस आयुक्तांच्या अंतर्गत बदल्यांचे आदेश पोलिस आयुक्त हरिश बैजल(police comissionor harish baijal) यांनी काढले आहेत. परिमंडळ दोनच्या सहाय्यक पोलिस आयुक्त डॉ. प्रीती टिपरे(dr. priti tipare) यांच्याकडे शहर गुन्हे शाखेचा (crime branch) पदभार सोपविण्यात आला आहे. शहर पोलिस आयुक्तालयात एकूण सात सहायक पोलिस आयुक्तांची पदे आहेत. मागील काही महिन्यांपासून बरीच पदे रिक्‍त होती. त्यामुळे एका अधिकाऱ्याकडे काही विभागाचा अतिरिक्त पदभार देण्यात आला होता. त्यामुळे कामाचा ताण खूपच वाढल्याचेही चित्र होते. काही दिवसांपूर्वी गृह विभागाने राज्यातील सहायक आयुक्तांच्या बदल्याचा निर्णय घेतला. काहींना पदोन्नतीही मिळाली. त्यामध्ये शहर पोलिस आयुक्तालयास पाच सहायक पोलिस आयुक्‍त मिळाले. नव्याने आलेल्या आणि पूर्वीच्या सहायक पोलिस आयुक्‍तांमध्ये अंतर्गत बदल्या करून त्यांच्याकडे गुन्हे, विशेष शाखा, वाहतूक शाखा, प्रशासन, नियंत्रण कक्षाचा पदभार सोपविण्यात आला.

विभागनिहाय सहायक पोलिस आयुक्‍त

डॉ. प्रीती टिपरे यांच्याकडे गुन्हे शाखा, दीपक आर्वे यांच्याकडे शहर वाहतूक शाखा, डॉ. संतोष गायकवाड यांच्याकडे विभाग एक तर माधव रेड्डी यांच्याकडे विभाग दोनचा चार्ज दिला आहे. प्रांजली सोनवणे यांच्याकडे प्रशासनाची जबाबदारी दिली असून अनिल लंभाते यांच्याकडे विशेष शाखेचा पदभार सोपविला आहे. अजय परमार यांच्याकडील नियंत्रण कक्षाचा पदभार कायम ठेवला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT