corona
corona 
सोलापूर

सोलापूर जिल्ह्यातील  प्राथमिक आरोग्य केंद्रात कोरोना पश्‍चात बाह्यरुग्णसेवा सुरु 

प्रमोद बोडके

सोलापूर : सोलापूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील कोरोना बाधितांची संख्या काही प्रमाणात घटली आहे. सध्या जिल्ह्यात रोज सरासरी दीडशे ते दोनशेच्या आसपास नव्या रुग्णांची भर पडत आहे. कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांना योग्य उपचार, योग्य मार्गदर्शन देण्यासाठी जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाच्यावतीने सर्व 77 प्राथमिक आरोग्य केंद्रात कोरोना पश्‍चात बाह्यरुग्णसेवा सुरू करण्यात आली आहे. 

सौम्य/किरकोळ प्रकारचा त्रास (थकवा, अंगदुखी) असणाऱ्या रुग्णांना प्राथमिक आरोग्य केंद्रस्तरावर उपचार केले जाणार आहेत. तीव्र/गंभीर स्वरूपाचा त्रास असल्यास अथवा गुंतागुंत असलेल्या रुग्णांना तातडीने संदर्भ सेवेसाठी पाठविण्याच्या सूचना प्राथमिक आरोग्य केंद्रांना करण्यात आल्या आहेत. वैयक्तिक स्वच्छता, वारंवार हात धुणे, मास्कचा नियमित वापर, सामाजिक अंतर ठेवणे याबाबत रुग्ण व रुग्णाच्या नातेवाईकांची प्राथमिक आरोग्य केंद्रस्तरावर समुपदेशन केले जात आहे. 

योग, प्राणायाम, श्वसनाचे व्यायाम, हलका व्यायाम नियमित करण्याबाबत रुग्ण व नातेवाईकांना मार्गदर्शन करण्यात येत आहे. सकस व समतोल आहार नियमितपणे घेण्याबाबतही रुग्ण व नातेवाईकांना मार्गदर्शन केले जात आहे. रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी प्रचलित आयुष उपचार पद्धतीचा अवलंब याबाबत देखील प्राथमिक आरोग्य केंद्राच्यावतीने मार्गदर्शन करण्यात येत आहे. 
 
कोरोना मुक्तीनंतर हृदयविकाराचा अधिक धोका 
कोरोनामुक्त झाल्यानंतर मृत्यू झाल्याच्या अनेक घटना सोलापूर शहर व जिल्ह्यात घडल्या आहेत. कोरोनामुक्त झाल्यानंतर त्या व्यक्तींला हृदयविकाराचा झटका येत असल्याचे प्रकर्षाने दिसत आहे. त्यासाठी कोरोनामुक्तीनंतर देखील काही पत्थ पाळणे, वैद्यकीय सल्ल्यानुसार आहार, व्यायाम करणे आवश्‍यक असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शीतलकुमार जाधव यांनी दिली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime News : बायकोचा दिवाना! पत्नी नांदायला आली नाही तर पुण्यात सात ठिकाणी बॉम्बस्फोट करण्याची धमकी

KKR: 'माहीभाईचं घर दिसतंय का?' रांचीवरून विमान जात असताना उत्साही वेंकटेश अय्यरचा प्रश्न, Video होतोय व्हायरल

Mumbai Weather Update : वादळी वाऱ्यासह कल्याण डोंबिवलीत अवकाळी पाऊस

Maharashtra Lok Sabha Election 2024 LIVE : दुपारी तीन वाजेपर्यंतची आकडेवारी समोर; देशात 52.60 टक्के तर राज्यात 42.35 टक्के मतदान

Shaktiman : सामान्य माणसाची असामान्य गोष्ट ; आदिनाथ-स्पृहाच्या शक्तिमानचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीस

SCROLL FOR NEXT