DR JAWANJAL.JPG 
सोलापूर

राज्यातील कोविड संकटात ऍपच्या मदतीने नर्सिंग स्टाफ उपलब्ध करण्याची आगळी कामगिरी 

शुभजित नष्टे

पिलीव(सोलापूर)ः एनजीओ नर्सिंग ब्युरोच्या माध्यमातून कोरोना कालावधीत संपूर्ण महाराष्ट्रभर नर्सिंगचा स्टाफ पुरवण्याचे मोलाचे योगदान दिल्याबद्दल महाराष्ट्र नर्सिंग कौन्सिलचे शासन नियुक्त सदस्य डॉ. राहुल जवंजाळ यांचा सन्मान आ. राम सातपुते यांच्या हस्ते करण्यात आला. 

यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रसिद्ध ह्दय रोग तज्ञ डॉ. एम के इनामदार होते तर व्यासपीठावर ज्येष्ठ विधिज्ञ ऍड. एम एम मगर, डॉ. तानाजी कदम, ऍड. जी. पी. कदम, डॉ. दिलीप वाघमोडे आदी मान्यवर उपस्थित होते. 

महाराष्ट्र नर्सिंग कौन्सिलचे शासन नियुक्त सदस्य व एनजीओ नर्सिंग ब्युरो चे प्रमुख डॉ. राहुल जवंजाळ यांनी मार्च 2020 पासून संपूर्ण महाराष्ट्रभर हॉस्पिटलमध्ये काम करण्यासाठी नर्सिंग स्टाफचा तुटवडा निर्माण झाला होता. तेव्हा कोव्हीड हॉस्पिटलमध्ये काम करण्यासाठी नर्सिंग स्टाफ धजावत नव्हता. यावेळेस डॉ जवंजाळ यांनी योग्य ते मार्गदर्शन करून मुंबई उपनगरासह संपूर्ण महाराष्ट्रभर सुरु असलेल्या कोव्हीड हॉस्पिटलमध्ये नर्सिंगचा स्टाफ उपलब्ध करून दिला. 
यासाठी त्यांनी एक आगळीवेगळी शक्कल लढवली आणि एनजीओ नर्सिंग ब्युरो नावाने एक ऍप तयार करून मोबाइलच्या माध्यमातून उपलब्ध करून या ऍपद्वारे नर्सिंग स्टाफ उपलब्ध करून दिला. कोरोना कालावधीत रुग्णांची सेवा करण्यासाठी कोव्हीड हॉस्पिटलला या नर्सिंग स्टाफ चे मोलाचे योगदान मिळाले. त्यांच्या या कार्याबद्दल आ. राम सातपुते यांनी डॉ राहुल जवंजाळ यांचा सन्मान केला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक ऍड. जी. पी. कदम यांनी केले. सुत्रसंचालन डॉ. विकास मगर तर आभार संजय हुलगे यांनी मानले. 
 

संपादनः प्रकाश सनपूरकर 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Anna Hazare : जनसेवा हीच ईश्वर सेवा,आता जोपर्यंत शरीरामध्ये प्राण आहे तोपर्यंत जनतेची सेवा करणार

Pune Crime : मैत्रिणीशी बोलत असल्याच्या रागातून स्पर्धा परिक्षेच्या विद्यार्थ्याचे अपहरण करणाऱ्या आरोपींना १५ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी

Beed Scam : बीडमध्ये ७ कोटींचा महाघोटाळा! २० वर्षांच्या भाडेपट्ट्यावरील जमिनीवर डल्ला; एसबीआयचे व्यवस्थापक, सरपंचासह ६ जणांवर गुन्हा दाखल

Maratha Reservation: अभिजित दीपके घेणार मनोज जरांगेंची भेट; तारीख अन् वेळही ठरली

Marathi News Live Updates : राजकारण ते हवामान...; एका क्लिकवर वाचा दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी

SCROLL FOR NEXT