सोलापूर

ओवैसींनी सांगितलं शिवसेनेचं भविष्य; म्हणाले, '2024 साली शिवसेना नक्कीच...'

सकाळ डिजिटल टीम

सोलापूर: एमआयएम पक्षाचे प्रमुख असदुद्दीन ओवैसी आज सोलापूर दौऱ्यावर होते. त्यांनी आज माध्यमांशी बोलताना राज्यातील महाविकास आघाडी सरकारवर जोरदार टीकास्त्र डागलं आहे. शिवसेनेच्या भूमिकेविषयी भाकित करताना त्यांनी शिवसेनेच्या भूमिकेवर अविश्वास देखील व्यक्त केला आहे. तसेच 2024 साली शिवसेनेची काय भूमिका असेल, याबाबत त्यांनी भाकित देखील वर्तवलं आहे.

धर्मनिरपेक्षतेच्या मुद्द्यावरून बोलताना त्यांनी म्हटलंय की, हे सरकार म्हणजे थ्री इन वन आहे की टू इन वन आहे ते काही कळत नाही. धर्मनिरपेक्षता म्हणजे चेष्टा वाटली का यांना? याला धर्मनिरपेक्षता म्हणतात का? असा सवाल देखील त्यांनी केला आहे. महाविकास आघाडीतील पक्षांवर आरोपांची तोफ डागताना त्यांनी म्हटलंय की, शिवसेनेला सत्ता देऊन तुम्ही स्वत: धर्मनिरपेक्ष समजता का? तुम्ही धर्मनिरपेक्षतेविषयी बोलता का? असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केला आहे.

यावेळी ओवैसींनी राहुल गांधींना देखील थेट आव्हान दिलं आहे. त्यांनी म्हटलंय की, काँग्रेसचे माजी अध्यक्ष हिंदुत्वाविषयी फारच बोलत असतात. महाराष्ट्रात सध्या काय घडत आहे, त्याविषयी त्यांनी आधी बोलावं. त्यावर बोलायची हिंमत राहुल गांधींमध्ये आहे का? असा सवाल त्यांनी केला आहे.

पुढे राष्ट्रवादी काँग्रेसवर टीका करताना त्यांनी म्हटलंय की, याच विषयावर राष्ट्रवादीला बोलायला सांगा. पुढे ते म्हणाले की, जेंव्हा आम्ही निवडणूक लढवायला आलो तेंव्हा हे म्हणायला लागले की तुम्ही मतांची विभागणी करत आहात. आम्ही मतांची मागणी केली तर तुम्ही आम्हाला जातीयवादी म्हणता आणि दुसरीकडे तुम्हीच शिवसेनेला सत्ता दिली आहे. त्यांना मुख्यमंत्रीपद दिलंय. तुम्ही प्रत्येक गोष्टीवर बोलू शकता, मात्र आम्ही नाही? तुम्ही धर्मनिरपेक्षतेचा ठेका घेतलाय का? असं देखील ओवैसी म्हणाले आहेत.

2024 ला शिवसेनेची भूमिका

लवकरच हे सरकार पडेल, अशी भाकितं भाजपकडून सातत्याने वर्तवण्यात येतात. 2024 ला तुम्ही बघा, शिवसेना पुन्हा भाजपासोबत जाईल, असं थेट भाकित देखील ओवैसींनी वर्तवलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

स्कॉर्पिओला आग लागून एकाच कुटुंबातील चौघांचा अंत, मृतांमध्ये ZP सदस्यासह २ माजी सरपंचाचा समावेश

Latest Marathi News Live Update : मनोज जरांगेंची पत्रकार परिषद! 30 मे पासून आमरण उपोषण

Badlapur Crime: बदलापुरात वडिलांच्या मित्रानेच १६ वर्षीय मुलीचा केला विनयभंग, मोबाईल चार्जिंगसाठी घरी आला अन्...

Deepali Sayyad Claims : ‘महाराष्ट्र एपस्टीन फाइल्स’वरून खळबळ! दिपाली सय्यदला धमक्या, “ते नाव घेतलं तर सर्व काही संपेल...”

Kolhapur Student Death Case : बाबा दुप्पट फायदा मिळणार आहेत, पैसे पाठवा..., मुलीचे शेवटचे शब्द, कुटुंबीयांनी नाकारलं विद्यार्थिनीने नको ते केलं

SCROLL FOR NEXT