अपघात ग्रस्त टॅकर व जीप.
अपघात ग्रस्त टॅकर व जीप. Sakal
सोलापूर

सोलापूर : "ऑक्सीजन टॅंकर व जीपचा अपघात"जीवीत हानी नाही

राजकुमार शहा

मोहोळ - पुढच्या वाहनाला ओव्हरटेक करणाऱ्या बोलेरो जिपला पाठीमागून येणाऱ्या ऑक्सीजन टॅंकरने जोराची धडक देऊन अपघात झाला. यात कुठलीही जीवीत हानी झाली नाही, वा कोणी जखमी नाही, मात्र दोन्ही वाहनांचे नुकसान झाले आहे. ही घटना यावली ता मोहोळ शिवारातील एका पेट्रोल पंपा जवळ रविवार ता 15 रोजी सकाळी 7 वाजण्याच्या सुमारास घडली.

या संदर्भात मोहोळ पोलीसा कडुन मिळालेली माहिती अशी की, पिंपळखुटे, ता. माढा या ठिकाणा वरून सोलापूरच्या दिशेने जाणारी बोलेरो जिप क्रमांक एम एच 45 एन 1916 हि यावली शिवारात समोरच्या वाहनाला अचानक ओव्हरटेक करत असताना पाठीमागून येणारा टॅंकर क्रमांक एच आर 38 वाय 0996 याने जिप मध्ये असणाऱ्या लोकांना वाचविण्याच्या नादात अचानक ब्रेक दाबला मात्र तो न लागल्याने टॅंकर ने जिपला धडक देऊन पुन्हा दोन्ही वाहने दुभाजकावर जाऊन आदळली त्यात टॅंकर रस्त्यावर पलटी झाला त्यामुळे काही काळ वाहतूक ठप्प झाली होती. या अपघातात सुदैवाने कोणतीही जिवितहानी झाली नसून टॅंकर चालकाच्या सतर्कते मुळे जिप मधील सर्व नागरीक सुखरूप बचावले. त्यामुळे मोठी जीवीत हानी टळल्याची माहिती प्रथम दर्शनी अपघात पाहणाऱ्या ग्रामस्थांनी दिली .दरम्यान टॅंकर मधे ऑक्सीजन वायु होता.टॅंकर उचलताना कोणतीही दुर्घटना होऊ नये म्हणुन मोहोळ पोलीस ठाण्यातील अपघात पथकाचे सहाय्यक फौजदार जे एन पवार यांनी पुणे येथील ऑक्सीजन तज्ञांना पाचारण केले.ते घटना स्थळी आल्यावर त्यांनी सर्व परिस्थीतीची पाहणी केली व धोका नसल्याचा निर्वाळा दिल्यानंतर टॅंकर सरळ करून वाहतुक सुरळीत केली. याबाबत मोहोळ पोलिसात तक्रार दाखल करण्याचे काम उशीरा पर्यंत सुरु होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Naseem Khan: नसीम खान यांची नाराजी दूर करण्यात काँग्रेसला यश? पुण्यात धंगेकरांच्या प्रचारासाठी लावली हजेरी

MI vs KKR Live IPL 2024 : मुंबई इंडियन्सने नाणेफेक जिंकली, MI आत्मसन्मानासाठी तर KKR प्ले ऑफसाठी खेळणार

Rohit Sharma MI vs KKR : टी 20 वर्ल्डकपचा संघ जाहीर होताच मुंबईच्या प्लेईंग 11 मधून रोहितचं नाव गायब, काय आहे कारण?

Pune Loksabha election 2024 : ''आरक्षणाच्या पन्नास टक्क्यांच्या मर्यादेबद्दल मोदींनी भूमिका जाहीर करावी, आमचं ठरलंय...'' राहुल गांधी स्पष्टच बोलले

Latest Marathi News Live Update : मोदी आता ओबीसी असल्याचं सांगत नाहीत- राहुल गांधी

SCROLL FOR NEXT