Police  sakal
सोलापूर

पंढरपूर : कार्तिकी वारीसाठी 3289 पोलिस कर्मचारी तैनात

कार्तिक वारीत येणाऱ्या भाविकांच्या सुरक्षेसाठी तसेच वारी सुरक्षितपणे पार पडण्यासाठी पोलिस यंत्रणा सज्ज असल्याची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम यांनी दिली

अभय जोशी - सकाळ वृत्तसेवा

पंढरपूर : कार्तिक वारीत येणाऱ्या भाविकांच्या सुरक्षेसाठी तसेच वारी सुरक्षितपणे पार पडण्यासाठी पोलिस यंत्रणा सज्ज असल्याची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम यांनी दिली. वारीत पोलिस प्रशासनाने वारकरी तसेच स्थानिक नागरिकांच्या सुरक्षेला प्राधान्य दिले असून सुरक्षेसाठी व वाहतूक नियत्रंणासाठी 3 हजार 289 पोलिस अधिकारी व कर्मचारी यांची नेमणूक करण्यात आली आहे.

यामध्ये 15 पोलिस उपअधीक्षक, 41 पोलिस निरीक्षक, 178 सहाय्यक पोलिस निरीक्षक व पोलिस उपनिरीक्षक, 1 हजार 955 पोलिस कर्मचारी व 1 हजार 100 होमगार्ड तसेच दोन एसआरपीएफच्या तुकड्या नियुक्त करण्यात आल्या आहेत. वारीसाठी नेमणूक करण्यात आलेल्या सर्व अधिकारी व कर्मचारी यांची कोरोना चाचणी करण्यात येत असून त्यांना आरोग्य सुरक्षिततेसाठी प्रथमोपचार किट देण्यात येत आहे. वारी कालावधीत गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी तसेच कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी नदीपात्र, 65 एकर, महाव्दार, महाव्दार घाट, पत्राशेड या सहा ठिकाणी वॉच टॉवर करण्यात आले आहेत. तसेच नदीपात्रासह नव्याने नगर प्रदक्षिणा मार्ग, मंदिर परिसर येथे सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार असल्याचेही उपविभागीय पोलिस अधिकारी श्री. कदम यांनी सांगितले.

वारी कालावधीत वाहतुकीची कोंडी होऊ नये, भाविकांना वाहुकीचा कोणताही अडथळा येऊ नये यासाठी जिल्हा पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांच्या आदेशान्वये जड वाहतुक शहराबाहेरुन वळविण्यात आली आहे. तसेच वाहतूक नियमनासाठी 12 ठिकाणी डायव्हरशन पॉईंट व दोन ठिकाणी नाकाबंदी पॉईंट सुरु करण्यात आले आहेत. त्याचबरोबर खाजगी वाहनधारकांच्या वाहनांना थांबण्यासाठी 15 ठिकाणी वाहनतळ व्यवस्था करण्यात आली असून या वाहनतळांवर सुमारे पाच हजार पेक्षा अधिक वाहने पार्क करण्याची क्षमता असल्याचेही श्री. कदम यांनी सांगितले. भाविकांनी तसेच नागरिकांनी सुरक्षेसाठी तसेच वारी सुरक्षित पार पाडण्यासाठी पोलीस प्रशासनास सहकार्य करावे असे, आवाहनही उपविभागीय पोलिस अधिकारी कदम यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: 5/84 ते 5/385! हॅरी ब्रूक, जेमी स्मिथ यांच्या १५० धावा; १४८ वर्षांच्या इतिहासात जे कधीच घडले नव्हते ते इंग्लंडने केले

Saif Ali Khan : सैफ अली खानला मध्य प्रदेश उच्च न्यायालयाने दिला मोठा धक्का!

Operation Sindoor: 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये पाकिस्तानला चीनची सक्रिय मदत; लष्कर उपप्रमुखांची माहिती

WI vs AUS: ६ पावलं पळाला, स्वतःला दिलं झोकून; Pat Cummins चा अविश्वसनीय झेल, Viral Video नक्की पाहा

Miraj News : कौटुंबिक वादातून कीटकनाशक पिवून पिता पुत्राने संपविले जीवन

SCROLL FOR NEXT