Solapur News  esakal
सोलापूर

Solapur News : पंढरपूर विधानसभा मविआची उमेदवारी मंगळवेढयातून देण्यासाठी अध्यक्ष पवारांना भेटणार ; कौडूभैरी

अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेणार असल्याची माहिती शहराध्यक्ष चंद्रशेखर कोडूभैरी दिली.

हुकूम मुलाणी: सकाळ वृत्तसेवा

मंगळवेढा : सकाळ वृत्तसेवा लोकसभा निवडणुकीत पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातून 45 हजारापेक्षा अधिक मताधिक्य दिलेल्या मतदारसंघात सर्वाधिक मताधिक्य हे मंगळवेढयातील असल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचा आगामी उमेदवार हा मंगळवेढ्यातीलच द्यावा. यासाठी अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेणार असल्याची माहिती शहराध्यक्ष चंद्रशेखर कोडूभैरी दिली.

कायम राष्ट्रवादीला मानणाऱ्या मतदारसंघात मागील विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस मधून भारत भालके हे विजयी झाले त्यांच्या अकाली निधनानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत राष्ट्रवादीचे भगीरथ भालके निसटच्या मताने पराभूत झाले मात्र राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारासाठी मंगळवेढा शहर व ग्रामीण भागातील मतदारांनी चांगले योगदान दिले. दरम्यान त्यांनी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी दिली त्यानंतर राष्ट्रवादीमधून विठ्ठल कारखान्याचे अभिजीत पाटील हे इच्छुक होते त्यांनीही लोकसभा निवडणुकीदरम्यान भाजप उमेदवाराचे समर्थन केले त्यामुळे पंढरपूरच्या संभाव्य उमेदवारानी त्यांच्या राजकीय सोयीसाठी पक्षाला सोडचिट्टी दिली.दरम्यान मतदारसंघातील जनतेचे प्रश्न तसेच राहिल्यामुळे यंदाची लोकसभा निवडणूक ही जनतेनेच हातात घेतल्यामुळे पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातून 45 हजारपेक्षा अधिक मताधिक्य प्रणिती शिंदेला मिळाले त्यामध्ये सर्वाधिक मताधिक्य हे मंगळवेढयातील राहिले.

त्यामुळे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत अभिजीत पाटील व भगीरथ भालके हे दोघेही विधानसभेसाठी इच्छुक आहेत मात्र त्यांचा पक्ष मात्र अनिश्चित आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाचा उमेदवार हा पंढरपुरातून न देता मंगळवेढ्यातील द्यावा ही मागणी अध्यक्ष शरद पवार यांच्याकडे करणार आहे.सध्या राज्यात महाविकास आघाडीला चांगले यश मिळाले असले तरी या मतदारसंघातून महाविकास आघाडीचा संभाव्य उमेदवार कोण हे अद्याप निश्चित केली नसताना शहराध्यक्ष कोंडूभैरी यांनी केलेल्या मागणीकडे पक्ष नेतृत्व लक्ष देणार का ? याची चर्चा या निमित्ताने सुरू झाली

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Point Table: पंजाब किंग्सचा सलग चौथा पराभव; दिल्ली कॅपिटल्सने Playoff चे गणित बिघडवले; CSK, KKR, RR ला संधी...

Big News: राहुल द्रविड बनला ट्वेंटी-२० संघाचा मालक; भारताशिवाय 'ज्या' देशाकडून खेळलेला, तिथेच युवा टॅलेंट शोधण्यासाठी परतला...

Operation Clean: अवैध मद्यनिर्मितीविरोधात महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय! राज्यभर ‘ऑपरेशन क्लीन’ सुरू; कायदा आणखी कडक

Iran Peace Proposal: मिडल ईस्टमध्ये शांततेची शेवटची आशा संपली? अमेरिकेने इराणचा प्रस्ताव फेटाळला; तेलाच्या किंमतीत वाढ

Mumbai Local: मुंबई लोकल वाहतूक विस्कळीत, काही फेऱ्या रद्द; अनेक गाड्या २० मिनिटांपर्यंत उशिराने

SCROLL FOR NEXT