पंढरपूर कार्तिक यात्रा sakal
सोलापूर

पंढरपूर : कार्तिक यात्रेसाठी प्रशासन सकारात्मक; 30 ऑक्टोबरला निर्णय

अंतिम निर्णय 30 ऑक्टोबरच्या बैठकीत घेतला जाईल अशी माहिती जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिली.

भारत नागणे

पंढरपूर (सोलापूर) : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदाची कार्तिकी यात्रा भरवण्याबाबत जिल्हा प्रशासन सकारात्मक असून, याबाबतचा अंतिम निर्णय 30 ऑक्टोबरच्या बैठकीत घेतला जाईल अशी माहिती जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिली.

येत्या 15 नोव्हेंबर रोजी कार्तिकी यात्रेचा सोहळा साजरा होणार आहे. दरम्यान कोरोनामुळे यात्रेबाबतचा कोणताही अंतिम निर्णय घेण्यात आला नाही. असे असले तरी प्रशासनाकडून यात्रेची जय्यत तयारी सुरू आहे. यात्रेच्या तयारीचा आढावा व पाहणी करण्यासाठी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर आज पंढरपुरात आले होते.

पाहणीनंतर जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्या उपस्थिती मध्ये सर्व विभागातील अधिकाऱ्यांची बैठक ही आज पार पडली. बैठकीनंतर जिल्हाधिकारी श्री. शंभरकर यांनी कार्तिकी यात्रेबाबत प्रशासन सकारात्मक आहे‌ असून याबाबतचा अंतिम निर्णय 30 ऑक्टोबर च्या बैठकीत घेतला जाईल असे स्पष्ट केले. त्यापूर्वी मंदिर समितीकडून वारी बाबतचा अहवाल मागवण्यात आला आहे. तो अहवाल आल्यानंतरच याबाबतचा अंतिम निर्णय घेतला जाणार आहे.

सध्या कोरोनाचा संसर्ग कमी झाला असला, तरी कोरोना निर्बंधांमध्ये यात्रेचा सोहळा पार पाडता येईल का 0 याविषयी चर्चा सुरू आहे. दरम्यान कार्तिकी यात्रेची तयारी प्रशासनाने सुरू‌ केली आहे. कार्तिकी यात्रेची विठ्ठल-रुक्मिणीची शासकीय महापूजेसाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना निमंत्रित देण्यात येणार आहे. तीर्थक्षेत्र विकास आराखडा अंतर्गत पंढरपूर शहर व परिसरात आणखी सहा ठिकाणी नवीन सौचालयांचे प्रस्ताव तयार करण्यात आले आहेत. या प्रस्तावांना मंजुरी मिळाल्यानंतर तातडीने ही कामे सुरू केली जाणार असल्याचेही जिल्हाधिकारी शंभरकर यांनी सांगितले.

या बैठकीला प्रांताधिकारी गजानन गुरव, पालिकेचे मुख्याधिकारी अनिल माळी, तहसीलदार स्वप्नील रावडे आदींसह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Siya Goyal: सियाने माध्यमांना खरंच मिडल फिंगर दाखवलं होतं का? पुरावा देत वडिलांनी दिलं स्पष्टीकरण; संपूर्ण घटनाच सांगितली!

मोठी बातमी! ऑस्ट्रेलिया दौऱ्यापूर्वी पंतप्रधान मोदींना जीवे मारण्याची धमकी, मेलबर्न पोलिसांकडून तपास

Pune Civic Negligence: मुंढव्यात निकृष्ट सांडपाणी कामामुळे रस्त्यात खोल खड्डा; ट्रक अडकला, महापालिकेवर नागरिकांची झोड

IND vs ENG, 2nd T20I: अभिषेक-ईशानची फिफ्टी हुकली, पण तिलक वर्माची दमदार फिनिशिंग, भारतीय संघ इंग्लंडविरुद्ध १९० धावा पार

Pune Rain Alert: पुण्यात सलग पावसाची रिपरिप; घाट परिसरासाठी पुढील दोन दिवस ‘रेड’ अलर्ट, प्रशासनाचे नागरिकांना सतर्कतेचे आवाहन

SCROLL FOR NEXT