Sharad Pawar, Bhagirath Bhalke And Prashant Paricharak Esakal
सोलापूर

पंढरपूर-मंगळवेढ्यात कोणाला मिळणार तुतारी? प्रत्येक इच्छुक उमेदवाराचा कार्यकर्ता म्हणतोय, "आता आमचीच बारी"

Pandharpur-Mangalwedha Vidhan Sabha Election 2024: इच्छुक उमेदवाराकडून मी उभारणार असे आश्वासन दिले असले तरी सध्या नेत्याचेच पक्ष निश्चित नसल्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमावस्था निर्माण झाली आहे.

हुकुम मुलाणी

मंगळवेढा: विधानसभा निवडणूक अद्याप जाहीर झाली नाही. इच्छुक उमेदवाराकडून मी उभारणार असे आश्वासन दिले असले तरी सध्या नेत्याचेच पक्ष निश्चित नसल्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमावस्था निर्माण झाली आहे.

पक्षीय राजकारणापेक्षा गटाच्या गटातटाच्या राजकारणात विभागलेल्या पंढरपूर विधानसभा मतदारसंघात विद्यमान आमदार समाधान आवताडे यांनी 3000 कोटी पेक्षा अधिक रकमेचा निधी तीन वर्षात मिळवला आहे. त्यामुळे सध्या भाजपाकडून त्यांची उमेदवारी अंतिम मानली जात आहे. दुसऱ्या बाजूला त्यांचे समर्थक देखील आपल्या नेत्यांनी केलेल्या कामाची माहिती सोशल मीडियातून व्हायरल करत तेच संभाव्य दावेदार म्हणून पुन्हा संधी देण्याबाबत कामाला लागले आहेत.

गेल्या निवडणुकीत प्रशांत परिचारक यांनी आमदार आवताडे यांना मदत केली आहे. मात्र यंदा कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही. असे सांगत परिचारक यांनीही निवडणूक लढवण्याचे संकेत दिले आहेत. असे असले तरी त्यांचे कार्यकर्ते तुतारी हातात घ्या असे म्हणत आहेत. प्रशांत परिचारक यांनीही भाजपाकडे आपल्याकडे 80 हजार मताचा जनाधार असून आपणालाच उमेदवारी द्यावी असा दावा देखील केलेला नाही.

दुसरीकडे परिचारक समर्थक देखील प्रशांत परिचारकांना कुठूनही उभा रहावा आम्ही तुमच्या सोबत आहे असा दावा देखील करत नाहीत. मात्र तुतारीवर लढा अशी मागणी करत आहेत.

भगीरथ भालके यांनी जनआशीर्वाद यात्रा काढत लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचे काम केले आहे. त्यामुळे महाविकास आघाडीकडे उमेदवारीचा पहिला हक्क सांगत उमेदवारी न दिल्यास आर या पार पद्धतीने अपक्ष निवडणूक लढणार असा इशारा देखील दिला.

भैरवनाथ शुगरचे उपाध्यक्ष अनिल सावंत यांनी देखील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे उमेदवारीची मागणी करत शरद पवारांशी जवळीक वाढवली मात्र त्यांनी अद्याप राष्ट्रवादीत प्रवेश केलेला नाही. मात्र राजकीय मोर्चेबांधनी मतदारसंघात जोरात सुरू करत विविध उपक्रमातून मतदाराशी संपर्कात आहेत.

सध्या प्रमुख राजकीय पक्षाकडे पहिल्या फळीत काम करणाऱ्या अनेक कार्यकर्त्यांनी थांबा आणि पहा हे धोरण स्वीकारले आहे. तर काही कार्यकर्त्यांनी सातत्याने नवनवीन उमेदवाराची शिफारस राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाकडे केल्यामुळे नेमकं काय चाललंय हेच समजेनासे झाल्याची प्रतिक्रिया एका कार्यकर्त्यांनी व्यक्त केली. तर काही कार्यकर्त्यांना परिचारक आणि भालके या दोघांपैकी एकजण उमेदवार असावेत असे देखील वाटत आहे. तर काही कार्यकर्त्यांनी पक्ष देईल त्या उमेदवाराचे काम करण्यापेक्षा आर्थिक क्षमता असलेल्या उमेदवाराची शिफारस करत बारामती दौरे केल्याचे दिसून आले.

काठावर असलेल्या कार्यकर्ते प्रशांत परिचारक,भगीरथ भालके,अनिल सावंत यांच्या गळाला लागतात यापेक्षा तुतारी चिन्ह कोणाला मिळते यावर ते भूमिका जाहीर करणार असल्याचे दबक्या आवाजात बोलले जात आहे.

मात्र सध्या तरी भगीरथ भालके यांनी दुसऱ्या फळीतील कार्यकर्त्यांच्या सोबतीने जन आशीर्वाद यात्रा समारोपाकडे आणली आहे तर मनसेचे दिलीप धोत्रे देखील या मतदारसंघातून उमेदवार असल्याने ते देखील गाव भेट दौरा करणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मोठी बातमी! ७ महिने झाले अनाथांना मिळाले नाहीत बालसंगोपन योजनेचे पैसे; राज्यातील सव्वालाख चिमुकल्यांचे हाल; दरमहा अपेक्षित आहेत २२५० रुपये

आजचे राशिभविष्य - 4 जुलै 2025

Latest Maharashtra News Updates : कोल्हापुरात पंचगंगेच्या पातळीत एक फुटाने वाढ, ५० बंधारे पाण्याखाली

अग्रलेख : मूक आक्रंदनाचा वारसा

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 4 जुलै 2025

SCROLL FOR NEXT