Pandharpur market committee will now buy bananas on weight 
सोलापूर

शेतकऱ्यांना दिलासा; पंढरपूर बाजार समितीत आता वजनावरच होणार केळीची खरेदी 

भारत नागणे

पंढरपूर (सोलापूर) : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये यापुढे केळीची खरेदी ही वजनावर करावी, अशा सक्त सूचना बाजार समितीचे सभापती दिलीप घाडगे यांनी आज दिल्या आहेत. बाजार समितीच्या या निर्णयामुळे शेतकऱ्यांना चांगला दिलासा मिळाला आहे. 

बाजार समितीमधील व्यापारी, शेतकरी आणि शेतकरी संघटनेच्या प्रतिनिधीची बैठक झाली. त्यामध्ये सभापती श्री. घाडगे यांनी व्यापाऱ्यांना याबाबत सूचना दिल्या आहेत. त्यानुसार उद्यापासून वजनावरच केळीसह इतर शेतीमालाची खरेदी केली जाणार आहे. येथील बाजार समितीमध्ये डाळिंब, कांद्यासह केळीची आवक होते. अलीकडच्या काही दिवसामध्ये केळीची आवक वाढली आहे. यापूर्वी कमी प्रतिच्या केळीची खरेदीही ढिगावर केली जात होती. यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत असल्याची तक्रार काही शेतकऱ्यांनी सोशल मीडियाद्वारे केली होती. 

या तक्रारीची बाजार समितीने गंभीर दखल घेवून आज तातडीने शेतकरी, व्यापारी आणि शेतकरी संघटनेच्या प्रतिनिधींची बैठक घेवून चर्चा केली. यावेळी शेतकरी आणि व्यापारी यांच्यामध्ये समन्वय साधून शेतकऱ्यांचा अधिक फायदा कसा होईल, या विषयी सांगोपांग चर्चा झाली. केळीची खरेदी वजन करुनच करावी, ढिगावर खरेदी केल्यास संबंधित व्यापाऱ्यावर कडक कारवाई केली जाईल, असा इशारा सभापती श्री. घाडगे यांनी दिला. यावेळी बाजार समितीचे उपसभापती विवेक कचरे, सचिव कुमार घाडगेंसह शेतकरी संघटनेचे प्रतिनिधी उपस्थित होते. 

संपादन : वैभव गाढवे 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

राष्ट्रपती भवनाजवळ नॉर्थ ब्लॉकमध्ये भीषण आग, अग्निशमन दलाच्या ६ गाड्या घटनास्थळी

Pune News: पुणेकरांना दिलासा! जीपीएस यंत्रणेतील तांत्रिक बिघाड दुरुस्त; रखडलेल्या जमीन मोजण्या पुन्हा सुरू होणार

Mumbai Crime: खळबळजनक घटना! घाटकोपरमध्ये बापानेच ९ महिन्यांच्या बाळाला स्कायवॉकवरून फेकलं

Daler Mehndi Row: दलेर मेहंदी प्रकरणात नवा ट्विस्ट; आधी आक्षेप अन् आता माफीनामा! मिका सिंगचा मोठा खुलासा

ULLAS Programme: शिकण्याला वयाचं बंधन नाही ! ;जिल्ह्यात ७३ वर्षांच्या आजीबाईंसह ४२ हजार जणांची साक्षरता परीक्षा

SCROLL FOR NEXT