In Pandharpur, Shiv Sena has protested against the Modi government by agitating against petrol and diesel price hike.jpg 
सोलापूर

पंढरपुरात पेट्रोल, डिझेल दरवाढी विरोधात शिवसेनेचे आंदोलन

भारत नागणे

पंढरपूर (सोलापूर) : पेट्रोल, डिझेल दरवाढी विरोधात शनिवारी पंढरपुरात शिवसेनेने बोंबाबोंब आंदोलन करून मोदी सरकारचा निषेध केला. गेल्या महिनाभरापासून देशभरात पेट्रोल आणि डिझेलचे सातत्याने दर वाढत आहेत. पेट्रोलच्या दराने नव्वदी पार केली आहे. तर काही ठिकाणी डिझेल आणि पेट्रोल एकाच दराने विक्री सुरू आहे. इंधनाचे दर वाढल्यामुळे सर्वत्र महागाईचा भडका उडाला आहे.

कोरोनामुळे आधीच सर्वसामान्य जनतेचे जगणे मुश्किल झाले आहे. त्यात मोदी सरकारने पेटोल दर वाढ करून सामान्य जनतेच्या जखमेवर मीठ चोळत आहे. पंढरपूर शहर व तालुका शिवसेनेच्यावतीने येथील गोपाळपूर रोड येथील पेट्रोल पंपासमोर बोंबाबोंब आंदोलन करून केंद्र सरकारचा निषेध केला. 

यावेळी शिवसेनेचे पंढरपूर विभाग जिल्हा प्रमुख संभाजी शिंदे म्हणाले, केंद्र सरकार हे केवळ कार्पोरेट उद्योगपती आणि आंतराष्ट्रीय बडे गुंतवणूकदार यांचे हित डोळ्यासमोर ठेवून निर्णय घेत आहे आणि यात सर्वसामान्य जनता मात्र भरडून निघत आहे. तेल कंपन्या ज्या दराने क्रूड ऑइल खरेदी करत आहेत. त्यावर केंद्र सरकार कररूपाने दुप्पट तिप्पट कर वसुली करत आहे. गेल्या काही दिवसात पेट्रोल डिझेल आणि गृहोपयोगी गॅसच्या दरात प्रचंड वाढ केली आहे. ही बाब सामान्य लोकांचे जगणे मुश्किल करणारी आहे.

मात्र या बाबत न बोलता भाजपचे केंद्रीय मंत्री शेतकरी आणि सामान्य नागरिक यांच्याबाबत अवमानकारक  वक्तव्ये करत आहेत. केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी तर कहरच केला असून आपली दानवी प्रवृत्ती दाखवलेली आहे. शेतकरी आपल्या हक्काच्या लढाईसाठी घरदार सोडून आंदोलन करीत असताना त्यांना खलिस्तानी, पाकिस्तानी समर्थक अतिरेकी संबोधने लाजिरवाणे आहे. यावेळी शिवसेनेच्या वतीने दानवे यांच्या विरोधातही घोषणाबाजी केली.

यावेळी शिवसेना सोलापूर जिल्हा प्रमुख (पंढरपुर विभाग) संभाजीराजे शिंदे, जयवंत माने, शिवसेना पंढरपुर तालुका प्रमुख महावीर नाना देशमुख, शिवसेना पंढरपुर शहर प्रमुख रविंद्र मुळे, शिवसेना उपशहर प्रमुख. लंकेश बुराडे, विनय वनारे, मा. सचिन बंदपट्टे, बाबा अभंगराव, अवि वाळके, युवासेना शहर समन्वयक अमित (पिंटू) गायकवाड, युवा सेना शहर प्रमुख मा. महावीर अभंगराव, शिवसेना विभाग प्रमुख पंकज डांगे-कोळी, अरुण कांबळे, ईश्वर सालुंखे, गणेश वाघमारे, राघवेंद्र ऐनापुरे, शाखा प्रमुख विजय गंगणे, पिंटू रेड्डी, प्रणित पवार, सौरव चौगुले, प्रदीप बडवे, अपंगसेना शहर अध्यक्ष शिवाजीराजे कोष्टी, अमित अभंगराव, गणेश पवार, बसवेश्वर अभंगराव, अजय अभंगराव, बंटी यवनकर, सीताराम माने ( तावशी ), गणेश घंटे, मारू धोत्रे, विट्ठल शिंगाडे, रवि शिंगाडे, रणजीत बंदपट्टे, प्रतापसिंह पवार, जितेंद्र ठाकुर, अक्षय गायकवाड, बाजी घाडगे, अजय हुलवडे, स्वप्निल शिंगाडे, सुजीत डोंबे, स्वप्निल शिंदे, सौरव नागटिळक, विशाल पाटोळे, अमितकुमार जमदाडे, अमित मुळे, छोटू ठाकूर, गणेश मुळे तसेच बहुसंख्य शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

संपादन - सुस्मिता वडतिले 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vande Bharat Sleeper Train Speed Test Video : ताशी १८० किमी वेग तरीही काठोकाठ भरलेल्या ग्लासांमधून एकही थेंब पाणी सांडले नाही...!

Alcohol Tree : ऐकू ते नवलच! 'या' 3 झाडांपासून बनते दारू...लाखो लोकांना आजही नाही माहिती

INDW vs SLW, 5th T20I: दीप्ती शर्माने नोंदवला मोठा विश्वविक्रम अन् भारतानेही रोमांचक विजयासह श्रीलंकेला दिला व्हाईटवॉश

Horoscope : उद्यापासून त्रिपुष्कर योगसह बुधादित्य राजयोग; कन्यासह 5 राशींना तिप्पट धनलाभ, नवं वर्ष सुरू होताच 3 मोठी कामं होणार पूर्ण

New Money Rules : क्रेडिट स्कोअर ते UPI – १ जानेवारी २०२६ पासून बदलणार ७ मोठे नियम; तुमच्या खिशावर काय परिणाम?

SCROLL FOR NEXT