पंडित वाकडे esakal
सोलापूर

भरकटलेल्या जीवनातून अखेर वयाच्या एकेचाळिसाव्या वर्षी झाले अधिकारी!

भरकटलेल्या जीवनातून अखेर वयाच्या एकेचाळिसाव्या वर्षी झाले अधिकारी!

अक्षय गुंड - सकाळ वृत्तसेवा

एमपीएससी परीक्षेतून महिला व बालविकास प्रकल्प अधिकारी म्हणून निवड झालेले बोकडदरवाडी, उपळाई बुद्रूक (ता.माढा) येथील पंडित वाकडे.

उपळाई बुद्रूक (सोलापूर) : घरात अठराविश्व दारिद्य्र, दोन वेळचे पोटभर जेवण मिळण्याचीही शाश्वती नव्हती, शिक्षणाची (Education) कोणतीही घरात पार्श्वभूमी नाही, त्यात तीन वर्षे शाळा सोडून दिल्यामुळे शिक्षणात खंड पडला होता. अशा संघर्षमय जीवनातून प्रवास करत, वयाच्या एकेचाळिसाव्या वर्षी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) परीक्षेतून महिला व बालविकास प्रकल्प अधिकारी (Women and Child Development Project Officer) म्हणून निवड झालेले बोकडदरवाडी, उपळाई बुद्रूक (ता.माढा) (Madha) येथील पंडित वाकडे (Pandit Wakde).

ज्या वयामध्ये लोक सेवानिवृत्तीच्या मार्गाला लागलेले आपणास दिसतात, त्या वयात पंडित वाकडे यांनी नव्या आव्हानांना, नव्या पदांना गवसणी घातली आहे. गावात कायमस्वरूपी दुष्काळी परिस्थिती. त्यामुळे कुटुंबीयांचा खाणकाम, खडी फोडणे हाच उदरनिर्वाहाचा व्यवसाय होता. प्राथमिक शिक्षण 'वर पास' या श्रेणीतून कसेबसे त्यांनी पूर्ण केल्याने, घरच्यांनी व नातेवाइकांनी शाळा सोडून देण्यासाठी तगादा लावला. त्यामुळे शाळा सोडून आईबरोबर मेंढ्या राखण्याचे काम त्यांनी सुरू केले. परंतु घरची परिस्थिती बेताची होत असल्याने, कामांच्या शोधात बाहेर गेल्यानंतर, दारूच्या दुकानात काम करण्याची वेळ आली. परिस्थितीमुळे दारू विक्रीही केली. अशातच तीन वर्षे निघून गेली. एकंदरीत करिअरपासून ते दिशाहीन झाले होते.

या काळात थोरल्या भावाने 'गावात बोंबलत फिरण्यापेक्षा स्वतःचं काहीतरी करिअर घडवण्यासाठी वेळ घालव' असा सल्ला दिला. त्यामुळे पंडित वाकडे यांना शिक्षणाचे महत्त्व पटू लागले. अन्‌ एकदाचा त्यांनी पाचवी इयत्तेत प्रवेश घेतला. परंतु परिस्थितीमुळे पैशाची घरात अधिकच चणचण भासू लागल्याने, त्यांच्या वडिलांनी लोकांच्याकडे सालगडी म्हणून काम करत कुटुंबाचा गाडा हाकत, त्यांच्या शिक्षणासाठी पैसे पुरवले. घरच्या परिस्थितीची जाण ठेवत जिद्द व चिकाटीने त्यांनी अभ्यास सुरू केला. उत्तरोत्तर शालेय प्रगतीचा आलेख वाढतच गेला. बारावी विज्ञान शाखेतून चांगल्या गुणांनी ते उत्तीर्ण झाले. त्यामुळे इंजीनिअरिंगला निश्‍चितच प्रवेश मिळत असताना देखीलही घरच्या आर्थिक संकटामुळे डीएड करणेच त्यांनी पसंत केले. डीएडनंतर लगेचच वाशिममध्ये प्राथमिक शिक्षक म्हणून नोकरीही मिळाली. विद्यार्थी घडवण्याचे काम त्यांचे जोमाने सुरू होते.

अशात गावातून दरवर्षी एकजण अधिकारी होत असल्याची बातमी त्यांना ऐकायला मिळायची. त्यामुळे गावातील अधिकारी झालेल्या युवकांची प्रेरणा घेऊन वयाच्या 31व्या वर्षी स्पर्धा परीक्षेत नशीब आजमावण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार स्पर्धा परीक्षेच्या तयारीला सुरुवात त्यांनी केली. परंतु अपयश त्यांची पाठ सोडायला तयार नव्हते. तरीदेखील त्यांनी प्रयत्न करणे सोडले नाही. सातत्याने प्रयत्न करत असल्याने, अखेर वयाच्या एकेचाळिसाव्या वर्षी 2019 मध्ये महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत बाल विकास प्रकल्प अधिकारी म्हणून त्यांची निवड झाली. जीवन जगत असताना यशाला काळाचे, वयाचे बंधन नसते. मनात ठरवले की आपण नक्की इतिहास घडवू शकतो, हे त्रिकालाबाधित सत्य आहे, हे पंडित वाकडे यांनी सिद्ध केले असून, त्यांचा खडतर प्रवास हा नक्कीच आजच्या युवकांसाठी प्रेरणादायी असाच आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अंबरनाथमध्ये सत्तासंघर्षाला नवं वळण! व्हीप न मानल्यास अपात्रतेची कारवाई, राष्ट्रवादीच्या नगरसेवकांना भाजपचा इशारा

Solapur News: भारतातील सर्वात मोठा दगडी चक्रव्यूहाच्या संवर्धनासाठी ‘इंट्याक’ची हाक; खडकीतील दोन हजार वर्षांपूर्वीचा वारसा पाहण्यासाठी ‘हेरिटेज वॉक’!

Latest Marathi News Live Update : परभणीत ५ एकरातला ऊस जळून खाक

Uddahv Thackeray : ‘भाजपकडून राज्यात भ्रष्टाचाराचे प्रदूषण’

CM Devendra Fadnavis : पुण्याची क्षमता २८० बिलियन डॉलर्सची; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी मांडला पुण्याच्या विकासाचा ‘रोडमॅप’

SCROLL FOR NEXT