Railway Passenger Media Gallery
सोलापूर

पॅसेंजर गाड्या 16 महिन्यांपासून "यार्डा'तच !

पॅसेंजर गाड्या 16 महिन्यांपासून "यार्डा'तच ! आरक्षित तिकिटाशिवाय मिळेना एक्सप्रेसमध्ये प्रवेश

विजय थोरात

गतवर्षीच्या कोरोना व लॉकडाउनच्या तडाख्यात रेल्वेची प्रवासी वाहतूक बंद झाली होती.

सोलापूर : गतवर्षीच्या कोरोना (Covid-19) व लॉकडाउनच्या (Lockdown) तडाख्यात रेल्वेची (Indian Railway) प्रवासी वाहतूक बंद झाली होती. हळूहळू परिस्थिती निवळल्यानंतर 1 जून 2021 पासून रेल्वेच्या प्रवासी वाहतुकीस रेल्वे प्रशासनाकडून हिरवा कंदिल मिळाला. आरक्षित तिकिटावर रेल्वेच्या विशेष गाड्या सुरू करण्यात आल्या. परंतु, चाकरमानी, सर्वसामान्य नागरिकांच्या बजेटमध्ये धावणाऱ्या पॅसेंजर रेल्वेगाड्या (Passenger Train) अद्यापही सुरू झालेल्या नाहीत. मागील तब्बल 16 महिन्यांपासून या पॅसेंजर गाड्या रेल्वेच्या यार्डातच थांबून आहेत. (Passenger trains have been in the yard for 16 months because of the corona-ssd73)

पॅसेंजर रेल्वेगाड्या बंद असल्याने सर्वसामान्य नागरिकांना व चाकरमान्यांना परिवहन महामंडळाच्या (ST Bus) बसचा आधार घ्यावा लागत आहे. राज्यांतर्गत प्रवासाचे महत्त्वाचे साधन असलेल्या या पॅसेंजर रेल्वेगाड्या बंद का, असा सवाल आता सर्वसामान्य नागरिकांतून उपस्थित केला जात आहे. हजारो प्रवाशांची गैरसोय होत असताना जिल्ह्यातील खासदार व लोकप्रतिनिधी गप्प का? अशा संतप्त भावनाही व्यक्त होत आहेत. कोरोना प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर नियमित गाड्यांना विशेष गाड्यांचा दर्जा देण्यात आला आहे. लांब पल्ल्याच्या गाड्या उत्तर प्रदेश, बिहार, गुजरात, कर्नाटक, आंध्र प्रदेश, मध्य प्रदेश, राजस्थान आदी राज्यांत धावू लागल्या. त्यामुळे लांब पल्ल्याचा प्रवास करणाऱ्या प्रवाशांची सोय झाली. मात्र कन्फर्म आणि आरक्षित तिकीट असल्याशिवाय प्रवास करता येत नाही. वेटिंग तिकीट घेऊनही प्रवासास मुभा नाही.

सर्वसामान्य नागरिकांची आर्थिक परवड थांबविण्यासाठी सोलापूर रेल्वे स्थानकावरून (Solapur Railway Station) सुटणाऱ्या सर्व पॅसेंजर रेल्वेगाड्या पूर्ववरत सुरू कराव्यात, अशी मागणी प्रवासी संघटनांनी केली आहे. दुसरीकडे लोकप्रतिनिधींकडून अपेक्षित असे कोणतेही प्रयत्न होताना दिसून येत नाहीत. त्यामुळे सोलापूर रेल्वे स्थानकावरून पुणे, कर्नाटक, पंढरपूर, मिरज मार्गावर धावणाऱ्या सर्व पॅसेंजर गाड्या अद्यापही यार्डातच थांबून आहेत. यावर रेल्वे अधिकाऱ्यांकडे विचारणा केली असता, हा निर्णय रेल्वे बोर्डाकडून घेतला जातो, असे सांगण्यात आले.

ठळक बाबी...

  • दैनंदिन प्रवास करणारे एकूण दीड हजार पासधारक

  • 350 महिला पासधारक

  • रेल्वेकडून पास दिला जात नाही

  • खासगी वाहनाने प्रवास करून वेळेत पोचता येत नाही

  • एक्‍स्प्रेस गाड्यांना थांबा मिळावा

या पॅसेंजर गाड्या आहेत बंद

सोलापूर-पुणे, सोलापूर- गुलबर्गा, सोलापूर- बोलाराम, सोलापूर- विजयपूर, विजयपूर- हैदराबाद, मुंबई - विजयपूर फास्ट पॅसेंजर, मुंबई - पंढरपूर फास्ट पॅसेंजर, निझामाबाद - लातूर - पंढरपूर, परळी-मिरज.

कोरोनामुळे सर्वसामान्यांसाठी मुंबई येथील लोकलदेखील बंद आहेत. सोलापूर विभागातील पॅसेंजर गाड्यांसंदर्भात सोलापूर विभागीय व्यवस्थापकांशी चर्चा करून माहिती घेणार आहे.

- डॉ. जयसिद्धेश्वर महास्वामी, खासदार, सोलापूर

कोरोनामुळे मागील दीड वर्षापासून सोलापूर रेल्वे स्थानकावरून धावणाऱ्या पॅसेंजर गाड्या बंद आहेत. त्यामुळे नोकरीच्या ठिकाणी जाण्यासाठी आर्थिक आणि मानसिक त्रास होत आहे. खासगी वाहनाने प्रवास करूनदेखील कामाच्या ठिकाणी वेळेत पोचता येत नाही. रेल्वे प्रशासनाने पॅसेंजर गाड्या सुरू कराव्यात.

- नंदू दळवी, प्रवासी

नोकरीसाठी दुधनी येथे जावे लागते. तिकीट जास्त असूनही एसटीनेच प्रवास करावा लागत आहे. पॅसेंजर रेल्वेगाड्या सुरू झाल्या तर सर्वसामान्यांची जाण्या - येण्याची चांगली सोय होणार आहे. इतर विभागातील पॅसेंजर गाड्या सुरू झाल्या आहेत; मात्र सोलापूर विभागातीलच पॅसेंजर गाड्या अद्याप बंद का आहेत, तेच समजेना.

- लता शिंपी, प्रवासी

शेतकरी, विद्यार्थी, नोकरदार यांना दैनंदिन कामाकरिता अप-डाउन करण्यासाठी एक्‍स्प्रेस व पॅसेंजर गाड्या सुरू करणे गरजेचे आहे. दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या ठिकाणी प्रवेश घेण्यासाठी ये-जा करण्यासाठीही या गाड्यांची मदत होईल. लोकप्रतिनिधींनी रेल्वे बोर्डास तत्काळ निवेदन देऊन या मागणीसाठी पाठपुरावा केला पाहिजे.

- संजय पाटील, अध्यक्ष, रेल्वे प्रवासी संघटना, सोलापूर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test : रवींद्र जडेजाने 'तलवार' उपसली! कपिल देव यांचा विक्रम मोडला, Sobers सारख्या दिग्गजांसोबत जाऊन बसला

Latest Maharashtra News Updates : महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेकडून बाळासाहेब लांडगे यांचं निलंबन

बाबा वेंगाचं भाकीत खरं ठरणार? पुढच्या 6 महिन्यात 'या' 4 राशी करोडपती होणार? कोणत्या त्या राशी जाणून घ्या...

Pune Accident: बसची वाट बघत उभे होते, तेव्हाच टेम्पो काळ बनून आला अन्..., दोघांचा जागीच मृत्यू, घटनेने पुण्यात खळबळ

Dhule Crime : दारूच्या नशेत पत्नीवर प्राणघातक हल्ला, धुळे कोर्टाने सुनावली ५ वर्षांची शिक्षा

SCROLL FOR NEXT