रोपळेत डेंग्यूसदृश आजाराचे थैमान sakal
सोलापूर

रोपळेत डेंग्यूसदृश आजाराचे थैमान! ग्रामपंचायतीने सुरू केल्या उपाययोजना

रोपळेत डेंग्यूसदृश आजाराचे थैमान! प्राथमिक आरोग्य केंद्र व ग्रामपंचायतीने सुरू केल्या उपाययोजना

मोहन काळे

चक्कर येणे, डोकं जड होणे, उलटी -मळमळ, ताप येऊन पांढऱ्या पेशींचे प्रमाण कमी होऊन प्रचंड थकवा येत असल्याची लक्षणे दिसणाऱ्या रुग्णांची संख्या वाढत आहे.

रोपळे बुद्रक (सोलापूर) : रोपळे (ता. पंढरपूर) येथे कोरोनाचा(Covid-19) प्रादुर्भाव कमी होताच डेंग्यूसदृश (Dengue) आजाराने थैमान घातले आहे. चक्कर येणे, डोकं जड होणे, उलटी -मळमळ, ताप येऊन पांढऱ्या पेशींचे प्रमाण कमी होऊन प्रचंड थकवा येत असल्याची लक्षणे दिसणाऱ्या रुग्णांची संख्या वाढत आहे. साथीच्या आजाराची लक्षणे दिसत असूनही रुग्ण सरकारी दवाखान्यात जात नाहीत. त्यामुळे रुग्णांचे आपल्या आरोग्यासाठी लाखो रुपये खर्च झाले आहेत.

सुमारे दोन ते अडीच महिन्यांपासून रोपळेत डेंग्यूसदृश आजाराने थैमान घातले आहे. या गावातील कदम वस्ती व गुंजाळ वस्तीच्या दरम्यान अशा प्रकारचे रुग्ण वाढत आहेत. त्यामुळे या वस्तीवरील प्रत्यक्ष रुग्णांची भेट घेतली तेव्हा आमच्या भागात रात्री डासांचा प्रचंड त्रास होत असल्याचे सांगिण्यात आले. तेव्हा त्यांच्या घरासमोरील पाण्याच्या टाक्‍या पाहिल्या. परंतु, त्यामध्ये डासांच्या अळ्या आढळल्या नाहीत. मात्र जवळच असलेल्या उजनीच्या कालव्यात पाणवनस्पती, साठलेले घाण पाणी व कचऱ्याच्या ढिगांमुळे प्रचंड घाण निर्माण झाल्याचे दृष्य दिसून आले.

दरम्यानच्या काळात काही रुग्णांची दवाखान्यात जाण्यासाठीची घालमेल पाहायला मिळाली. कोणी गावातील दवाखान्यात तर कोणी पंढरपूर आणि सोलापूर येथील दवाखान्यात उपचार घेण्यासाठीची पळापळ करत होते. या वस्तीवरील सुमारे 25 हून अधिक रुग्णांना डेंग्यूसदृश आजाराची लागण झाली आहे. दवाखान्याच्या औषधोपचारासाठी प्रत्येकी सरासरी 15 ते 20 हजार रुपये खर्च होत आहे. बहुतांश रुग्ण बरे झाले असून अशा प्रकारची लक्षणे दिसणाऱ्या नवीन रुग्णांची भर पडत आहे.

लोकांनी पाणी साठवलेल्या पाण्याच्या टाक्‍या रिकाम्या करून स्वच्छ केल्या आहेत. त्या भागात फवारणी करून घेत आहे. सार्वजनिक पाण्याच्या टाकीतून कॅनॉलमध्ये वाया जाणारे पाणी बंद करण्यास सांगितले आहे.

- रमेश कोळी, ग्रामविकास अधिकारी, ग्रामपंचायत, रोपळे बुद्रूक, ता. पंढरपूर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Rain Update : पुण्यात जोरदार पावसाची अचानक हजेरी, नागरिकांची उडाली तारांबळ; घाटमाथ्यावर सतर्कतेचा इशारा

IND vs ENG 1st T20I: भारत-इंग्लंड मॅच नक्की कुठे पाहायची, Sony की Star Sports? चाहते कन्फ्युज; JioHotstar वाल्याचं काय?

Child Crime: अल्पवयीन गुन्हेगारांना आता सवलत नाही? वयोमर्यादा १८ वरून १६ वर्षांवर आणणार; महाराष्ट्र सरकारचा मास्टरस्ट्रोक

सलमानसोबतच्या ब्रेकअपनंतर ऐश्वर्याला 'त्या' गोष्टीची वाटायची प्रचंड भीती, इतक्या वर्षानंतर झाला खुलासा

Latest Marathi News Live Update : बुलढाणा पोलीस अधीक्षकांच्या निलंबनाच्या मागणीसाठी आमरण उपोषण; शिवसेना पदाधिकाऱ्यांचे आंदोलन

SCROLL FOR NEXT