Solapur Municipal Corporation sakal
सोलापूर

Solapur News : पथदिवे अन् कचरा समस्येमुळे सोलापूरकर वैतागले

सोलापूर महापालिकेच्या परिवर्तन ॲपवर अडीच वर्षात नागरिकांच्या ५ हजार ७०३ तक्रारी प्राप्त झाल्या झाल्या आहेत. त्यात सर्वाधिक तक्रारी या पथदिवे अन्‌ कचऱ्यांच्या समस्येबाबत आहेत.

सकाळ वृत्तसेवा

- प्रमिला चोरगी

सोलापूर - महापालिकेच्या परिवर्तन ॲपवर अडीच वर्षात नागरिकांच्या ५ हजार ७०३ तक्रारी प्राप्त झाल्या झाल्या आहेत. त्यात सर्वाधिक तक्रारी या पथदिवे अन्‌ कचऱ्यांच्या समस्येबाबत आहेत. शहरातील इतर प्रभागांच्या तुलनेत जुळे सोलापूर भागातील प्रभाग क्र. २३, २४, २६ परिसर समस्यांच्या विळख्यात असल्याचे या तक्रारीच्या संख्येवरून दिसून येते.

महापालिकेने सोयीसाठी ऑनलाइन तक्रारी नोंदविण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. त्यासाठी नोव्हेंबर २०२० मध्ये परिवर्तन ॲप सुरू करण्यात आले. या ॲपच्या माध्यमातून नागरिकांच्या तक्रारींचे निवारण हे तक्रारीच्या स्वरुपावरून कमीत कमी २४ तास ते अधिकाधिक ३० दिवसांच्या आत करणे बंधनकारक आहे.

या ॲपद्वारे प्राप्त झालेल्या तक्रारी संबंधित विभागप्रमुख, झोन कार्यालयाकडे पाठवून निवारण करण्यात येते. महापालिकेने शहरवासीयांना अडीच वर्षापूर्वी परिवर्तन ॲपद्वारे ऑनलाइन सुविधा उपलब्ध करून दिले. या कालावधीत कचरा, ड्रेनेज, पथदिवे, उद्यान, पाणीपुरवठा, अनधिकृत बांधकाम, खराब रस्ते, सार्वजनिक स्वच्छतागृह, पाणी गळती आदी १८ प्रकारच्या ५ हजार ७०३ तक्रारी महापालिकेकडे आल्या आहेत.

या ऑनलाइन तक्रारींची सरासरी प्रति दिवसा सहा ते सात इतकी आहे. त्यामध्ये सर्वाधिक तक्रारी या शहरातील बंद पथदिवे, नादुरुस्त पथदिवे, उघड्या वायरी, उघड्या डीपी, घंटागाड्या, सार्वजनिक ठिकाणी साचलेला कचरा असे पथदिवे आणि कचऱ्यासंबंधी आहेत.

या तक्रारी शहर हद्दवाढ भागातील असून त्यात जुळे सोलापूर भागातील प्रभाग क्र. २३, २४, २६ हे परिसर समस्यांच्या विळख्यात असल्याचे दिसून येते. यातील ५ हजार ३५० तक्रारींचे निवारण करण्यात आले असून ३५० तक्रारी संबंधित विभागाकडून सोडविण्यात येत आहेत.

समस्यांचा आलेख

  • पथदिवे : १७५२

  • कचरा : ८८९

  • ड्रेनेज : १९१

  • खराब रस्ते : १५२

  • अनधिकृत बांधकाम : १०१

जनता दरबारात तक्रारी

महापालिकेच्या परिवर्तन ॲपवर केलेल्या तक्रारींचे निकारण होत नसल्याची ओरड आहे. ॲपवरील तक्रारींची दखल घेतली जाईल, यावर नागरिकांचा विश्वास नाही. त्यामुळे शहरवासीयांचा कल हा जनता दरबारमध्ये आयुक्तांना समक्ष भेटून तक्रार मांडण्याकडे अधिक आहे. ऑनलाइच्या तुलनेने आयुक्तांच्या जनता दरबारमध्ये येणाऱ्या नागरिकांची संख्या अधिक असून तक्रारींच्या निवेदनाचा ढिगाराही मोठा असतो. आठवड्यातून दोनदा भरणाऱ्या प्रत्येक जनता दरबारमध्ये साधारण ५० ते ५५ निवेदन येतात. त्यात प्रामुख्याने अतिक्रमण, अनधिकृत बांधकाम आणि सुरळीत पाणी पुरवठ्यासंबंधीच्या तक्रारी सर्वाधिक आहेत.

नागरिकांनी परिवर्तन ॲपच्या माध्यमातून अधिकाधिक तक्रारी कराव्यात. जेणे करून नागरिकांचा आणि प्रशासनातील अधिकाऱ्यांचा वेळ वाचेल. ॲपवर केलेल्या प्रत्येक तक्रारीच्या स्थितीबाबत नागरिकांना वेळोवेळी माहिती मिळते. संबंधित अधिकाऱ्यांना फोनद्वारे विचारणा करता येऊ शकते. ऑनलाइनची प्रक्रिया अत्यंत पारदर्शी आहे. त्यावर नागरिकांनी विश्वास ठेवला पाहिजे.

- शीतल तेली-उगले, आयुक्त, महापालिका

परिवर्तन ॲपवर सर्वाधिक तक्रारी

  • अडीच वर्षात ५७०३ तक्रारी

  • जुळे सोलापुरात सर्वाधिक समस्या

आकडे बोलतात

  • एकूण तक्रारी - ५,७०३

  • निवारण झालेल्या तक्रारी - ४,८९४

  • प्रलंबित असलेल्या तक्रारी - ३५२

  • नाकारलेल्या तक्रारींची संख्या - ४५७

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'मला पोलिसात न्या, तिथं बघतोच तुम्हाला, माझा बाप...' नशेत धुंद मनसे नेत्याच्या लेकाची इन्फ्लुएन्सरला शिवीगाळ, VIDEO VIRAL

Pune News: शिक्षकांचे आंदोलन सुरू, पण विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही,शाळा ८, ९ जुलैला बंद राहणार नाहीत, शिक्षण विभाग

Sangli Muharram: 'हिंदू-मुस्लिम ऐक्याची दीडशे वर्षांची परंपरा'; गगनचुंबी ताबुतांच्या कडेगावात गळाभेटी

Viral Video: अप्पाचा विषय लय हार्डय ! जीम ट्रेनर समोर आजोबांनी मारले जोर पण टोपी पडली नाही... पाहा अनोख्या कौशल्याचा व्हिडिओ

'ही प्राडाची नाही... ओरिजनल कोल्हापुरी आहे'; Prada ला टोला लगावत अभिनेत्री करिना कपूर 'कोल्हापुरी चप्पल'बाबत काय म्हणाली?

SCROLL FOR NEXT