सोलापूर : देशात कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. त्याला रोखण्यासाठी सरकार वेगगेळ्या उपाययोजना करत आहे. याचा सर्वसामान्यांसह देशाच्या आर्थिक व्यवस्थेवरही परिणाम होत आहे. सरकारने परवानगी दिलेली अत्यावश्यक सेवा व कृषीक्षेत्र सोडून सर्व सध्या सर्व वाहनेही बंद आहेत.
देशात कोरोना व्हायरसच्या संकटामध्येच आणखी एक संकट येण्याचे संकेत आहेत. पुढच्या महिन्यापासून नागरिकांना पेट्रोल आणि डिझेलसाठी जास्त पैसे द्यावे लागतील. मे महिन्यानंतर तेल कंपन्या दररोज पेट्रोल आणि डिझेलच्या किरकोळ किंमतीत सुधारणा करण्यास सुरवात करू शकतात, त्यानंतर ग्राहकांना पेट्रोल आणि डिझेल खरेदी करणे महाग होणार आहे.
लॉकडाऊन हटवल्यानंतर ऑटो इंधनच्या दैनंदिन किंमतीत सुधारणा होण्यास सुरुवात होईल. मात्र, याबाबत अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही. असे झाल्यास, पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती पुन्हा वाढू शकतात, असे ओएमसीच्या सूत्रांचे म्हणणे आहे.
एका वृत्तवाहिनीशी बोलताना नाव न सांगण्याच्या अटीवरुन सरकारच्या मालकीच्या ओएमसी अधिकाऱ्यांनी सांगितले की, 16 मार्चपासून पेट्रोल व डिझेलच्या किंमतींमध्ये बदल करण्यात आलेला नाही. त्यामुळे सरकारने किरकोळ उत्पादनांवर परिणाम न करता दोन्ही उत्पादनांवर उत्पादन शुल्क वाढविले. आता दररोज किंमत सुधार योजना सुरू झाल्यानंतर ऑटो इंधन काही दिवस तेजीत येऊ शकेल.
दररोजच्या किंमतीत सुधारणा केल्यावरही पेट्रोल व डिझेलच्या किरकोळ किंमतीत निर्धारित प्रमाणपेक्षा अधिक वाढ करण्याची परवानगी दिली जाणार नाही. याचा अर्थ असा होईल की पेट्रोलियम उत्पादनांमध्ये दररोज 30 ते 50 पैशांची वाढ होऊ शकते किंवा तेल कंपन्या खर्च आणि विक्रीतील तफावत दूर करेपर्यंत कमी होऊ शकतात, असे त्यांचे म्हणणे आहे. दररोजच्या किंमतींच्या पुनरीक्षणानुसार किरकोळ किंमतीत झालेली वाढ तेलाच्या किंमती आणि जागतिक बाजारपेठेवर अवलंबून आहे. गेल्या महिन्यांच्या तुलनेत सध्या कच्च्या तेलाची किंमत 50 टक्के जास्त आहे. दरम्यान, लॉकडाऊनमधून पेट्रोल डिझेलच्या मागणीत घट झाली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.