Corona 
सोलापूर

आता "कोरोना'चा सोलापूरच्या "या' व्यवसायाला बसतोय फटका

श्रीनिवास दुध्याल

सोलापूर : चीनमधून देशोदेशी व आता भारतात कोरोनाचा विषाणू वेगाने पसरत आहे. भारतातील कोरोना बाधितांची संख्या 31 वर पोचली आहे. ही परिस्थिती पाहता, सोलापुरातून नोकरी-व्यवसायानिमित्त परदेशी जाणाऱ्या व सुटीनिमित्त प्रवासाला जाणाऱ्या प्रवाशांनी खबरदारीचा उपाय म्हणून आपला प्रवास रद्द करण्याचा सपाटा लावल्याने ट्रॅव्हल एजन्सींच्या व्यवसायाला फटका बसत असून, आतापर्यंत 50 टक्के व्यवसायावर परिणाम झाल्याचा दावा ट्रॅव्हल व्यावसायिकांनी "सकाळ'शी बोलताना केला.

प्रवास बुकिंग रद्दला झालीय सुरवात
कोरोनाचा जगभरातील फैलाव पाहता, नागरिकांनी याचा धसका घेतला आहे. नोकरी-व्यवसायानिमित्त परदेशी जाणाऱ्या प्रवाशांनी आपला प्रवास रद्द केल्याने हैदराबाद, सिकंदराबाद, मुंबई येथील आंतरराष्ट्रीय विमानतळाला जाणाऱ्या येथील ट्रॅव्हल एजन्सींच्या गाड्यांना फटका बसला. लग्नसराईनंतर देवदेव करण्यासाठी तसेच हनिमून पॅकेजसाठी गोवा, महाबळेश्‍वर, पाचगणी, केरळ आदी ठिकाणच्या प्रवासासाठी बुकिंग झाली होती. मात्र केरळ येथे तसेच इतर राज्यांत कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांची माहिती जशी मिळत आहे, तशी बुकिंग रद्दला सुरवात झाली आहे. रेल्वे प्रवासासाठी जून, जुलैपर्यंतची बुकिंग झाली आहे. मात्र पुढील बुकिंगवर परिणाम झाल्याचे जाणवत नाही. त्याचप्रमाणे सोलापूर- पुणे -मुंबई प्रवासावर 15 ते 20 टक्के परिणाम झाला असल्याची माहिती ट्रॅव्हल एजन्सीकडून मिळाली.

नागरिकांनी घाबरण्याचे कारण नाही : डिंगरे
आमच्या ट्रॅव्हल्सद्वारे 24 फेब्रुवारीपासून दार्जिलिंगचा प्रवास सुरू असून, यात 50 प्रवाशांचा सहभाग आहे. आम्ही पुणे, सोलापूर, भुवनेश्‍वर, जगन्नाथपुरी, गंगटोक, दार्जिलिंग येथून नेपाळमार्गे कोलकत्याला निघालो. नेपाळच्या सीमेवर आमच्यासह इतर अनेक प्रवाशांची कोरोना तपासणी पथकाकडून एका लेझर गनने तपासणी करण्यात आली आणि लगेच त्याचा रिपोर्ट आला. सगळे प्रवासी ठणठणीत आहेत. सरकारने ठिकठिकाणी सुविधा केंद्रे, तपासणी पथके तैनात केली आहेत. त्यामुळे लोकांनी भीती बाळगायचं कारण नाही. अफवांवर विश्‍वास ठेवून नियोजित प्रवास रद्द करू नये, असे आवाहन सोलापूरचे ट्रॅव्हल व्यावसायिक जयंत डिंगरे यांनी "सकाळ'शी बोलताना केले आहे.

आमच्याकडे लहान-मोठ्या 30 गाड्या आहेत. यापैकी पाच गाड्या प्रवासात आहेत. मात्र 15 दिवसांपासून कोरोना व्हायरसच्या भीतीमुळे लोकांनी आपला प्रवास रद्द करायला सुरवात केली आहे. यामुळे व्यवसायावर परिणाम झाला असून, 25 गाड्या थांबून आहेत.
- विनायक विभूते, ट्रॅव्हल व्यावसायिक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Viral Video: तळेगावात रस्त्याच्या मधूनच उसळला पाण्याचा प्रचंड फवारा... सर्व भयभीत... थरारक अन् अचंबित करणारा प्रकार

पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांच्या नातवाचे कांड, परदेशी महिलांच्या व्हिसाची सोय केली, देशात येताच अपहरण अन् अत्याचार

Marathi Live Updates : छत्रपती संभाजीनगरमध्ये सुपारी हनुमान मंदिरात घंटानाद आंदोलन

IND vs ENG: 'त्या एका षटकाने सामना फिरला'; पराभवानंतर श्रेयस अय्यरचं मोठं वक्तव्य, रवी बिश्नोईबाबत काय म्हणाला?

Ayodhya Ram Mandir: राममंदिरासाठी ‘सीईओं’ची नियुक्ती शक्य; ट्रस्टची सोमवारी बैठक; ‘एसआयटी’ अहवालावरही चर्चा

SCROLL FOR NEXT