Traffic Police Action 
सोलापूर

पाहा "यांच्या'कडून कशी होतेय पशुपालकांची लूट

सकाळ वृत्तसेवा

सांगोला (सोलापूर) : संपूर्ण पश्‍चिम महाराष्ट्रात सांगोला येथील जनावरांचा बाजार प्रसिद्ध आहे. प्रत्येक रविवारी जनावरांच्या बाजारात मोठ्या प्रमाणात खरेदी-विक्रीसाठी दूरवरून शेतकरी व व्यापारी येत असतात. परंतु, सांगोल्याच्या मुख्य रस्त्यावर रविवारीच वाहतूक पोलिसांचा जनावरे घेऊन येणाऱ्या-जाणाऱ्या वाहनधारकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे. वाहतूक नियमावलीच्या नावाखाली थेट त्रास पशू उत्पादकांनाच होत आहे.

वाहने अडवून दाखवला जातो नियमांचा बडगा
आठवडा बाजारात जनावरांची मोठ्या प्रमाणात खरेदी-विक्री होत असते. सांगोल्यातील जनावरांचा बाजार हा पश्‍चिम महाराष्ट्रात खिलार बैलांच्या जातीच्या जनावरांसाठी प्रसिद्ध आहे. खिलार बैलांबरोबरच सध्या बाजार जर्सी गायी व म्हशींसाठीही प्रसिद्ध आहे. या बाजारासाठी इतर जिल्ह्यांतून व परिसरातील तालुक्‍यांतून मोठ्या प्रमाणात शेतकरी जनावरांच्या खरेदी-विक्रीसाठी येत असतात. शेतकऱ्यांबरोबरच कर्नाटकातील व्यापारीही या ठिकाणी जनावरे घेऊन खरेदी-विक्रीसाठी येतात. प्रत्येक रविवारी भरणाऱ्या जनावरांच्या बाजारात सांगोल्यात येणाऱ्या मुख्य रस्त्यांवरून म्हणजे पंढरपूर - मिरज - मंगळवेढा अशा रस्त्यांवर वाहतूक पोलिस असतात. शहराच्या एक किलोमीटर बाहेर जनावरे घेऊन येणाऱ्या व जाणाऱ्या टेम्पो, टमटम, पिकअप आदी वाहनांना अडवून वाहतूक नियमावलीचा बडगा दाखवला जातो. या नियमावलीचा त्रास नको म्हणून वाहनधारकही यातून चिरीमिरी देऊन आपली सुटका करून घेत असतात. परंतु, वाहनधारक हे पैसे भाड्यातून न देता शेतकऱ्यांकडून वसूल करतात. त्यामुळे वाहतूक पोलिसांच्या नियमावलीच्या नावाखाली होणाऱ्या लुटीचा त्रास थेट शेतकऱ्यांना होत असल्याचे शेतकरी सांगतात.

नियमानुसार कारवाई होणार
ज्या दिवशी बाजार असतो त्या दिवशी वाहतुकीच्या नियमानुसार कारवाईही होणार. या कारवाईचा येथील जनावरांच्या बाजारावर काहीही परिणाम होणार नाही. नियमानुसार होत नसल्यास याची चौकशी केली जाईल.
- राजेश गवळी,
पोलिस निरीक्षक, सांगोला

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Orange Cap : नाद करा, या पोरांचा नको... यशस्वी जैस्वाल, वैभव सूर्यवंशीने 'ऑरेंज' कॅप शर्यतीत रोहितला मागे सोडले;Top Five List

RR vs MI Live: युवा जोश, उडवली मुंबईची झोप! यशस्वी जैस्वाल, वैभव सूर्यवंशी यांची दे दणादण फटकेबाजी; ११ षटकांत १५० धावा...

RR vs MI Live: हटा सावन की घटा... वैभव सूर्यवंशीचा तोरा... जसप्रीत बुमराहचा पहिलाच चेंडू षटकार, ३ चेंडूंत कुटल्या १३ धावा, Video

Manoj Jarange: मनोज जरांगेंनी टाळलं अन् धनंजय मुंडे हेलिकॉप्टरने पोहोचले; महंत म्हणाले, सर्वांना सोबत घेऊन चालण्याची परंपरा...

Rice Export : तणावातही भारतीय तांदळाला इराणमध्ये मागणी; युद्धजन्य परिस्थितीवर मात करत उलाढाल, ६५ लाख टन निर्यातीचा अंदाज

SCROLL FOR NEXT