crime
crime Esakal
सोलापूर

मोहोळ दुहेरी खून प्रकरण : पोलिसांच्या हाती महत्त्वाचे धागेदोरे

राजकुमार शहा

मोहोळ येथील क्षीरसागर - सरवदे दुहेरी खून प्रकरणात महत्त्वाचे धागेदोरे पोलिसांना मिळाले आहेत.

मोहोळ (सोलापूर) : मोहोळ (Mohol, Solapur) येथील क्षीरसागर - सरवदे दुहेरी खून (Crime) प्रकरणात महत्त्वाचे धागेदोरे पोलिसांना मिळाले असून, या प्रकरणात आणखी संशयितांची नावे समोर येण्याची शक्‍यता आहे. दरम्यान, या प्रकरणातील संशयितांची पोलिस कोठडी नऊ तारखेपर्यंत होती, मात्र पोलिसांनी त्यांना सोलापूर येथील न्यायालयासमोर उभे केले असता त्यांना पुन्हा दोन दिवस म्हणजे 11 ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडी वाढवून देण्यात आली आहे. दरम्यान, एक संशयित पोलिसांच्या हाती लागला असून, गुन्ह्याच्या अनुषंगाने मोहोळ पोलिसात (Mohol Police) त्याचा जबाब देखील नोंदविण्यात आला आहे.

14 जुलै रोजी मोहोळ येथील सतीश क्षीरसागर व विजय सरवदे यांच्या दुचाकीवर टेम्पो घालून अपघाताचा बनाव करत त्यांचा खून करण्यात आला होता. यामध्ये सतीश क्षीरसागर जागीच ठार झाले होते तर विजय सरवदे यांचा उपचारादरम्यान सोलापूर येथे मृत्यू झाला होता. या प्रकरणी मोहोळ पोलिसात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, सर्वच्या सर्व सहा संशयितांना पोलिसांनी अटक केलेली आहे. सध्या संशयित आरोपी पोलिस कोठडीत आहेत.

या प्रकरणातील संशयित भैय्या असवले, संतोष सुरवसे, रोहित ऊर्फ अण्णा फडतरे, पिंटू सुरवसे, गोटू बरकडे, गोटू सरवदे (सर्व रा. मोहोळ) यांनी संगनमताने क्षीरसागर व सरवदे यांना संपवण्याचा कट मोहोळ शहरातील एका गोपनीय ठिकाणी आखल्याचे पोलिस तपासात उघड झाले आहे. या संदर्भात दुसरा एक संशयित पोलिसांच्या हाती लागला असून गुन्ह्याच्या अनुषंगाने त्याचा जबाब नोंदविण्यात आला आहे. त्यामुळे या खून प्रकरणाचा तपास महत्त्वपूर्ण टप्प्यावर आला आहे. सदर संशयितांकडून अनेक महत्त्वपूर्ण माहिती समोर येण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे या खून प्रकरणाचे गूढ वाढले आहे. या गुन्ह्याचा तपास पोलिस उपअधीक्षक सूर्यकांत पाटील हे करीत आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loksabha Election 2024 : हुश्श..! प्रचार संपला, राज्यात तोफा शांत, तलवारी म्यान

‘चार सौ पार’ पासून बहुमताच्या आकड्यापर्यंत

सत्ता ठरवणारा उ त्त र रं ग

प्रसारणाचं धोरण नवं उत्तमातलं उत्तम हवं

सिक्स जी : भविष्यातली डिजिटल-क्रांती

SCROLL FOR NEXT