पहिली बायको असताना मुख्याध्यापकाने केले दुसरे लग्न! Sakal
सोलापूर

दोन्ही बायकांचा मुख्याध्यापक पतीला शॉक अन्‌ तो झाला पोलिस ठाण्यात लॉक!

दोन्ही बायकांनी दिला मुख्याध्यापक पतीला 'शॉक'! मुख्याध्यापक झाला पोलिस ठाण्यात लॉक

विजयकुमार कन्हेरे

पहिले लग्न झालेले असताना मुलीच्या आई- वडिलांना फसवून दुसरे लग्न केल्या प्रकरणी मुख्याध्यापकास कुर्डुवाडी पोलिसांनी अटक केली आहे.

कुर्डुवाडी (सोलापूर) : पहिले लग्न (Marriage) झालेले असताना मुलीच्या आई- वडिलांना फसवून दुसरे लग्न केल्या प्रकरणी मुख्याध्यापकास कुर्डुवाडी पोलिसांनी अटक केली आहे. बापूसाहेब बाबासाहेब आडसूळ (रा. अंकोली, ता. मोहोळ, सध्या रा. भोसरे, ता. माढा) असे अटक झालेल्या म्हैसगाव (ता. माढा) येथील एका माध्यमिक शाळेच्या मुख्याध्यापकाचे नाव आहे. याबाबत त्याच्या पहिल्या व दुसऱ्या पत्नीनेही त्या मुख्याध्यापका विरुद्ध दिलेल्या फिर्यादीनुसार कुर्डुवाडी पोलिस ठाण्यात (Kurduwadi Police Station) गुन्हे (Crime) दाखल करण्यात आले आहेत.

याबाबत कुर्डुवाडी पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, पहिल्या पत्नीने दिलेल्या फिर्यादीनुसार बापूसाहेबाचे मोहोळ तालुक्‍यातील अंकोली येथे 13 मे 2012 रोजी पहिले म्हणजे फिर्यादीबरोबर लग्न झाले होते. त्यावेळी बापू हा विनाअनुदानित शाळेत कामाला होता. कॉम्प्युटर सेंटर व इतर कारणासाठी सारखा माहेरहून पैसे आण असे तगादा लावत होता. पती, सासरे, सासू, दीर, जाऊ, नणंद व नंदवा यांनी मूल होणार नाही या कारणावरून शारीरिक व मानसिक त्रास दिला. या सर्व गोष्टींना कंटाळून पहिली पत्नी जुलै 2018 साली माहेरी निघून गेली.

त्यानंतर पहिल्या पत्नीशी घटस्फोट झाला नसताना त्याने पहिले लग्न लपवून कोरोनाच्या साथीमुळे मोजक्‍या लोकांच्या उपस्थितीत परंडा तालुक्‍यातील वस्तीवर 30 मार्च 2021 रोजी दुसऱ्या मुलीबरोबर लग्न केले. बापूसाहेब, सासरे बाबासाहेब आडसूळ, सासू आवडाबाई आडसूळ, दीर अनिल आडसूळ, जाऊ दीपाली आडसूळ, नणंद सोनाली क्षीरसागर व लग्नासाठी मध्यस्थी करणारे चांगदेव कांबळे या सर्वांनी मिळून दुसऱ्या मुलीच्या आई- वडिलांना फसवून बापूसाहेबाचे दुसऱ्या फिर्यादीबरोबर लग्न केले आहे. फिर्यादीस वेळोवेळी मारहाण, शिवीगाळ व दमदाटी केली. गेल्या दोन महिन्यांपासून पोलिस बापूसाहेबाच्या शोधात होते. त्याला कुर्डुवाडी पोलिसांनी अटक केली असल्याची माहिती सहाय्यक पोलिस निरीक्षक विक्रांत बोधे यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT