police checking 
सोलापूर

पोलिस आयुक्त म्हणाले, जिल्हाबंदीचे आदेश अद्याप लागू, ई-पास अनिवार्यच

मिलिंद गिरमे

लवंग (सोलापूर) : सोशल मीडियावर पाच ऑगस्टपासून राज्यात प्रवासाला ई-पासची आवश्‍यकता नाही, अशा प्रकारच्या पोस्ट पसरवणे सुरू आहे. त्याचा त्रास जिल्हा बंदी चेक पोस्टवर असणाऱ्या पोलिसांना होत आहे. अकलूज-सराटी येथे पुणे आणि सोलापूर जिल्ह्याची हद्द येते. त्या ठिकाणी असलेल्या चेक पोस्टवर सोशल मीडियावरून जिल्हा बंदी उठल्याची पोस्ट फिरत असल्याने येणारे - जाणारे वाहनधारक जिल्हा बंदी उठली असताना का अडवता, असा वाद घालताना दिसून येत आहेत. 

या पार्श्वभूमीवर सोलापूरचे पोलिस आयुक्त अंकुश शिंदे यांना मोबाईलवरून विचारणा केली असता ते म्हणाले, राज्यात कोरोनाचा वाढता संसर्ग पाहता जिल्हा बंदीचे आदेश अद्यापही लागू आहेत. जिल्हा बंदीमुळे जिल्ह्यातून किंवा राज्याबाहेर जाण्यासाठी ई-पास अनिवार्यच राहणार आहे. अशा संदर्भात ज्या अफवा पसरवल्या जात आहेत त्यावर विश्वास ठेवू नका, असे आवाहनही आयुक्त अंकुश शिंदे यांनी "सकाळ'शी बोलताना केले. 

राज्यात 31 ऑगस्टपर्यंत लॉकडाउन वाढविण्यात आल्यानंतर काही बाबींमध्ये थोड्याफार प्रमाणात सवलती शासनाने दिल्या असल्या, तरी शासनाकडून जिल्हा बंदीबाबत कोणत्याही नव्याने सूचना न आल्याने जिल्हा बंदीचा आदेश कायम ठेवण्यात आलेला आहे. तसेच जिथे प्रशासनाकडून कंटेन्मेंट भाग घोषित केला गेला आहे, तिथे पास मंजूर केला जात नाही. मात्र आपत्कालीन स्थिती, कामाची निकडता, कामाचे महत्त्व, वैद्यकीय कारण अशा आवश्‍यकतेनुसार ई-पासेस दिले जात आहेत. 

वाढत्या कोरोना संदर्भाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा बंदी करून संसर्ग रोखण्याचा शासनाचा प्रयत्न आहे. वेगवेगळ्या जिल्ह्यांत व अन्य राज्यांत अत्यंत गरजेच्या कारणास्तव येणे - जाण्याकरिता पोलिसांकडून डिजिटल ई - पासची सुविधा देण्यात आलेली आहे. ऑनलाइन ई - पास मागणी करताना खरी माहिती भरली गेली पाहिजे, असे पोलिस आयुक्त अंकुश शिंदे यांनी सांगितले. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Anna Hazare : जनसेवा हीच ईश्वर सेवा,आता जोपर्यंत शरीरामध्ये प्राण आहे तोपर्यंत जनतेची सेवा करणार

Pune Crime : मैत्रिणीशी बोलत असल्याच्या रागातून स्पर्धा परिक्षेच्या विद्यार्थ्याचे अपहरण करणाऱ्या आरोपींना १५ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी

Beed Scam : बीडमध्ये ७ कोटींचा महाघोटाळा! २० वर्षांच्या भाडेपट्ट्यावरील जमिनीवर डल्ला; एसबीआयचे व्यवस्थापक, सरपंचासह ६ जणांवर गुन्हा दाखल

Maratha Reservation: अभिजित दीपके घेणार मनोज जरांगेंची भेट; तारीख अन् वेळही ठरली

Marathi News Live Updates : राजकारण ते हवामान...; एका क्लिकवर वाचा दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी

SCROLL FOR NEXT