Crime Sakal
सोलापूर

विवाहितेचा खून : 24 तासात संशयिताच्या आवळल्या मुसक्‍या

जुजारपूर येथील विवाहितेचा खून : 24 तासात संशयिताच्या आवळल्या मुसक्‍या

उमेश महाजन

जुजारपूर येथील रूपाली नारायण पाटील (वय 28) या विवाहितेचा शुक्रवारी (ता. 22) पहाटे पाच वाजण्याच्या पूर्वी मानेला गंभीर इजा करून खून करण्यात आला होता.

महूद (सोलापूर) : जुजारपूर येथील रूपाली नारायण पाटील (वय 28) या विवाहितेचा शुक्रवारी (ता. 22) पहाटे पाच वाजण्याच्या पूर्वी मानेला गंभीर इजा करून खून (Crime) करण्यात आला होता. शिवाय हे प्रकरण उघडकीस येऊ नये म्हणून संबंधित विवाहितेचा मोबाईलही घेऊन मारेकरी फरार झाला होता. मात्र, सांगोला पोलिसांनी (Sangola Police) गतिमान तपास करत अवघ्या 24 तासांत संशयिताच्या मुसक्‍या आवळल्या आहेत. या प्रकरणी गावातील सुधाकर मच्छिंद्र हिप्परकर या तरुणास अटक करण्यात आली आहे.

जुजारपूर येथील रूपाली नारायण पाटील (वय 28) या विवाहितेचा पती कंटेनरवर चालक असून, तो परगावी गेला असताना शुक्रवारी (ता. 22) पहाटे पाच वाजण्याच्या पूर्वी रूपालीच्या मानेला गंभीर इजा करून खून करण्यात आला होता. शिवाय हे प्रकरण उघडकीस येऊ नये म्हणून संबंधित विवाहितेचा मोबाईलही घेऊन मारेकरी फरार झाला होता. याप्रकरणी खून झालेल्या विवाहितेचा चुलत दीर दादासाहेब दगडू पाटील यांनी सांगोला पोलिसात फिर्याद दिलेली आहे.

सुधाकर मच्छिंद्र हिप्परकर यास सांगोला न्यायालयात हजर केले असता त्याला शुक्रवार (ता. 29) पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. दरम्यान, या खून प्रकरणात आणखी कोणाचा सहभाग आहे का? सदर आरोपीस कोणी मदत केली आहे का? याचा तपास पोलिस करीत असल्याचे तपास अधिकारी तथा सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रशांत हुले यांनी सांगितले. पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते, उपविभागीय पोलिस अधिकारी राजश्री पाटील, पोलिस निरीक्षक सुहास जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली तपास अधिकारी तथा सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रशांत हुले, पोलिस हवालदार असलम काझी, पोलिस नाईक तुकाराम व्हरे, पोलिस नाईक विजय थिटे, कॉन्स्टेबल गणेश कुलकर्णी यांनी गतिमान तपास करत केवळ चोवीस तासात गावातील सुधाकर मच्छिंद्र हिप्परकर या तरुणास अटक केली आहे.

दरम्यान, या खून प्रकरणाचा तातडीने तपास लावून मारेकऱ्याला कडक शासन करावे. या घटनेमुळे जुजारपूर येथील स्त्रिया व शाळेमध्ये शिकणाऱ्या मुली प्रचंड दहशतीखाली आहेत, अशा आशयाचे निवेदन जुजारपूर ग्रामस्थांनी पोलिस अधीक्षकांना दिले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai News: नव्या वर्षापासून रुग्णालयात जेवण बंद, नर्सेस आणि कर्मचाऱ्यांची अडचण; कारण काय?

Accident News: दुर्दैवी! काँग्रेसच्या माजी केंद्रीय मंत्र्याच्या मुलीसह तीन जणांचा मृत्यू; घटनेनं हळहळ, काय घडलं?

Nagpur Municipal Election 2026 : नागपुरात भाजपच्या दाव्यांना बंडखोरीचे ग्रहण; काँग्रेसचीही खास रणनीती, मनपात कुणाची येईल सत्ता?

सीन शूट करताना जितेंद्र जोशीला खरोखरच फास लागला ! अभिनेत्याने सांगितली भयानक आठवण, म्हणाला..

Weekly Horoscope 12 to 18 January 2026: शुक्रादित्य राजयोगामुळे वृषभ राशीसह 5 राशींना मिळेल आदर अन् संपत्ती, वाचा साप्ताहिक राशिभविष्य

SCROLL FOR NEXT