Tadipar 
सोलापूर

बापरे ! आजी-माजी नगरसेवकांसह 17 जणांच्या तडिपारीचा प्रस्ताव ! बार्शीतील एकजण जिल्ह्यातून तडिपार

प्रशांत काळे

बार्शी (सोलापूर) : बार्शी नगरपालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहर पोलिसांनी कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी एकत्रित गुन्हे, अवैध व्यवसाय करणारे तसेच आजी- माजी नगरसेवकांसह 17 जणांच्या तडिपारीचे प्रस्ताव पोलिस अधीक्षक यांच्याकडे दाखल केले आहेत. एकास तीन महिन्यांसाठी जिल्ह्यातून तडीपार केले आहे, अशी माहिती पोलिस निरीक्षक संतोष गिरीगोसावी यांनी दिली. 

गिरीगोसावी म्हणाले, शिरीष धनंजय ताटे (रा. कोठारी गॅस एजन्सीसमोर) यास सोलापूर जिल्ह्यातून तीन महिन्यांसाठी तडिपार केले असून 12 फेब्रुवारी रोजी पोलिसांकडून त्यास जिल्ह्याबाहेर सोडण्यात आले आहे. विद्यमान नगरसेवक, सार्वजनिक बांधकाम समिती सभापती रोहित नवनाथ लाकाळ (वय 26), प्रेम नवनाथ लाकाळ (वय 30), सागर नवनाथ लाकाळ (वय 28), आकाश नवनाथ लाकाळ (वय 27, सर्व रा. पाटील चाळ) यांनी एकत्रित गुन्हे केल्याचे निष्पन्न झाले आहे. 

अवैध व्यवसाय करणारे माजी नगरसेवक सोमनाथ रमाकांत पिसे (वय 51, रा. सुभाषनगर), विजय सुनील माने (वय 28, रा. सुभाषनगर), हरिदास शिवाजी सुतार (वय 53, रा. भगवंत मंदिराजवळ), नाना रामचंद्र कांबळे (वय 58, रा. सोलापूर रोड), सुधीर ऊर्फ दशरथ दादासाहेब काकडे (वय 57, रा. उपळाई रोड), भगवान अंबऋषी राऊत (वय 70, रा. सोलापूर रोड), अरुण गणपत मायेकर (वय 68, रा. मंगळवारपेठ), प्रकाश बाबूराव शिंदे (वय 58, रा. सुतारनेट), धवल गणेश बदाले (वय 28, रा. कापसे बोळ), राहुल कैलास घोंगडे (वय 21 रा. धारूरकर बोळ, राऊळ गल्ली), अनंत वसंत वाघ (वय 42, रा. नाळे प्लॉट), इरफान वहिअली शेख (वय 32, रा. रिंगरोड) गुरुलिंग गंगाधर घोडके (वय 45, रा. पंकजनगर) अशा 17 जणांचे प्रस्ताव पोलिस अधीक्षकांकडे दाखल करण्यात आले आहेत. 

सोलापूर व उस्मानाबाद जिल्ह्यातून दोन वर्षे तडिपार करण्याबाबत प्रस्तावामध्ये नमूद करण्यात आले असून, आदेश प्राप्त करून लवकरच संबंधितांना तडिपार करण्यात येईल. शहरातील इतर रेकॉर्डवरील गुन्हेगारांचे तडिपारीचे प्रस्ताव तयार करण्याचे काम सुरू असल्याची माहितीही गिरीगोसावी यांनी दिली. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Cow E-attendance: गायींनाही आता ई-अटेंडन्स द्यावा लागणार! एक विशेष मायक्रोचिप विकसित; राज्य सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय

Marathi Horoscope Prediction : आजपासून फक्त 24 दिवसांमध्ये बदलणार 'या' राशींचं नशीब ! बक्कळ श्रीमंतीचा योग

वाहतुकीचा ‘नवा अध्याय’ लिहिला जाणार! गोरेगाव-मुलुंड लिंक रोडमुळे कोंडीतून दिलासा मिळणार! नवी मुंबई काही मिनिटांत गाठता येणार!

November 2025 Horoscope : नव्या आठवड्यात 'या' 3 राशींच्या लोकांचा होणार फायदाच फायदा..घरी येणार पैसा-गुडलक, तुमची रास आहे का?

Latest Marathi News Update : ISRO कडून भारतीय संवाद उपग्रह CMS-03 चे यशस्वी प्रक्षेपण

SCROLL FOR NEXT