Police have succeeded in searching for the accused at Pandharpur
Police have succeeded in searching for the accused at Pandharpur 
सोलापूर

सराईत दरोडेखोर पंढरी उर्फ मिथुन काळे अखेरीस अटकेत; 4 वर्षांपासून होता फरार

अभय जोशी

पंढरपूर (सोलापूर) : गेल्या चार वर्षापासून पोलिस शोध घेत असलेला सराईत दरोडेखोर आणि मोक्कामधील आरोपी पंढरी उर्फ मिथुन किरण काळे यास पंढरपूर तालुका पोलिसांनी शिताफीने पकडले.

पोलीस अधिक्षक श्रीमती तेजस्वीनी सातपुते यांनी सोलापुर ग्रामीणमध्ये गंभीर गुन्हे करणारे रेकाॅर्डवरील दरोडेखोर व मोक्कामधील आरोपी यांना जेरबंद करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्याअनुषंगाने अपर पोलीस अधिक्षक अतुल झेंडे व पंढरपूर विभागाचे उपविभागीय पोलिस अधिकारी विक्रम कदम यांचे मार्गदर्शनाखाली पंढरपूर तालुका पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक किरण अवचर यांचे नेतृत्वाखाली सपोनि श्री. खरात, सपोनि श्री. ओलेकर यांची पथके तयार करण्यात आली होती. परंतु पंढरपूर तालुका पोलिस ठाण्याचे अभिलेखावरील दरोडेखोर व मोक्कामधील पाहीजे असलेला आरोपी पंढरी उर्फ मिथुन किरण काळे हा सन 2016 पासून शोध घेऊनही सापडत नव्हता. मोक्का कायद्यासह सोलापूर ग्रामीणमध्ये सदर आरोपीवर अकलूज पोलिस ठाण्यात अनेक गुन्हे दाखल आहेत.

दरम्यान पंढरपूर तालुका पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक श्री. ओलेकर यांना माहिती मिळाली की आरोपी पंढरी उर्फ मिथुन किरण काळे हा पुळुज परिसरात येऊन गुन्हा करण्याच्या तयारीत आहे. त्याप्रमाणे तात्काळ सपोनि खरात व सपोनि ओलेकर यांनी पोलिस निरीक्षक किरण अवचर यांना कळवून पथकासह खाजगी वाहनाने पुळुज परिसरात गेले. तिथे पोलिसांनी पळुजकडे जाताना एका द्राक्षाचे बागेमध्ये पाठलाग करुन आरोपीच्या मुसक्या आवळल्या. 

पोलिस अधिकाऱ्यांबरोबर पोलिस हवालदार सुजित उबाळे, पोलिस शिपाई सोमनाथ नरळे, पोलिस शिपाई देवेंद्र सुर्यवंषी यांनी या कारवाईत सहभाग घेतला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sucharita Mohanti: काँग्रेसची दुर्दशा सुरूच! आणखी एका उमेदवारानं परत केलं लोकसभेचं तिकीट; कारण ऐकून म्हणाल...

Hardik Pandya MI vs KKR : पांड्यानं केली मोठी चूक; त्याच्यामुळेच मुंबईची ही अवस्था... इरफाननं कॅप्टन हार्दिकवर साधला निशाणा

RBI: मोदी सरकार बायबॅक करणार 40 हजार कोटींचे सोवेरियन बाँड, आरबीआयची माहिती; गुंतवणूकदारांचे काय होणार?

"माझी लाडकी जिवंत आहे", आई 3 दिवस मुलीच्या मृतदेहासोबत झोपली! पोलीस आले अन्...

Latest Marathi News Live Update : उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या सुरक्षेत वाढ

SCROLL FOR NEXT