Pomegranate production in Sangola is in trouble 
सोलापूर

सांगोल्यातील डाळिंब का आहे समस्यांच्या विळख्यात

दत्तात्रय खंडागळे

सांगोला (सोलापूर) : सांगोला तालुका हा डाळिंबीचा आगार म्हणून नावारूपाला आला आहे. परंतु याच डाळिंबीवरील विविध रोग व समस्यांमुळे डाळिंब उत्पादक शेतकरी सध्या द्राक्ष व इतर पिकांच्या लागवडीकडे वळले आहेत. सध्या तालुक्‍यात 650 हेक्‍टरपेक्षा जास्त क्षेत्रावर तालुक्‍यात द्राक्ष लागवड झाली आहे. द्राक्षांबरोबरच आंबा, सीताफळ, पेरू फळपिकांची लागवड केली जात आहे. 
गुणवत्तावर्धक डाळिंब म्हटलं की सांगोला तालुका हे समीकरण गेल्या अनेक वर्षांपासून निर्माण झाले आहे. कमी पाण्यावर तालुक्‍यातील शेतकऱ्यांनी मोठ्या कष्टाने डाळिंबाची लागवड करून उत्पन्नाच्या बाबतीत तालुक्‍याचे नाव अग्रेसर केले आहे. तालुक्‍यात 25 हजार हेक्‍टरपेक्षा जास्त डाळिंबाचे क्षेत्र आहे. परंतु याच डाळिंबाच्या आगाराला सध्या विविध रोगांची लागण झाल्यामुळे डाळिंबाचे क्षेत्र दिवसेंदिवस घटू लागले आहे. डाळिंबावरील तेल्या व मर या प्रमुख रोगांमुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. डाळिंबावरील उभ्या पिकावर तेल्यासारखा रोग आला की संपूर्ण फळांवरच येतो. त्यामुळे पिकांवर होणारा खर्च देखील शेतकऱ्यांच्या हाती येत नाही. याबरोबरच डाळिंबीवरील मर नावाच्या रोगाचे मोठे प्रमाण वाढले आहे. हा रोग बागेत सुरू झाला की रोगाची लागण वाढत जाऊन झाडे जागेवरच जळून जाऊ लागतात. शेतकऱ्यांनी नाना उपाय करूनही मर रोग आटोक्‍यात येत नाही. तसेच मर रोगाच्या डाळिंबाची जुनी बाग काढून त्या जागी नवीन लागवड केली तरीही मर रोग आटोक्‍यात येत नाही. फळांवरच रोग नियंत्रित करता येईल परंतु मर रोग आटोक्‍यात येत नसल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. या रोगांबरोबरच डाळिंबावरील होणाऱ्या एकूण उत्पादनाच्या खर्चात मोठी वाढ झाली आहे.

हेही वाचा- वडिलांचा खून करुन मुलगा साथीदारासह देवदर्शनाला 
द्राक्ष लागवड वाढली

त्याप्रमाणात डाळिंबाच्या दरात वाढ झाली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांचा आर्थिक ताळमेळ लागत नाही. डाळिंबावरील या विविध समस्यांमुळे तालुक्‍यातील शेतकरी सध्या इतर फळपिकांकडे वळलेला दिसून येत आहे. फळबागांमध्ये डाळिंबीनंतर तालुक्‍यात सध्या द्राक्ष लागवड मोठ्या प्रमाणात सुरू आहे. तालुक्‍यात आतापर्यंत 650 पेक्षा जास्त क्षेत्रावर द्राक्ष लागवड झालेली आहे. तसेच अजूनही नवीन लागवड मोठ्या प्रमाणात सुरू आहे. द्राक्ष पिकांबरोबरच तालुक्‍यात काही प्रमाणात पेरू, आंबा, सीताफळ अशा विविध विविध फळपिकांच्या लागवडीकडे शेतकरी वळलेला दिसून येत आहे. डाळिंबाचे क्षेत्र सध्या कमी होत असल्याने डाळिंबाच्या कोठारात इतर फळपिकांची लागवड झालेली तालुक्‍यात दिसून येत आहे. 

झाडे जळाली 
जिल्ह्यातील डाळिंब संशोधन केंद्रालाही तेल्या व मर रोगावर ठोस अशी उपाययोजना सापडली नाही. मर रोगामुळे डाळिंबीची झाडे संपूर्ण जळून जात असल्यामुळे डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांना केलेला खर्चही शिल्लक राहत नाही. या आर्थिक टंचाईमुळे सांगोल्यात डाळिंबाचे नवीन लागवडीचे क्षेत्र कमी होऊ लागले आहे. 

मर रोगामुळे
मर रोगामुळे डाळिंबाची झाडे मोठ्या प्रमाणात जळून गेल्याने डाळिंबीची सर्व बागच काढली. या क्षेत्रावर डाळिंबाची नवीन लागवड न करता आम्ही द्राक्षे लागवड केली आहे 
- प्रभाकर खंडागळे, नवीन द्राक्ष उत्पादक, संगेवाडी 

६५० हेक्टरवर द्राक्ष
तालुक्‍यात सध्या द्राक्ष लागवडीचे प्रमाण वाढले आहे. सध्या जवळजवळ 650 हेक्‍टर क्षेत्रावर द्राक्ष पिकाची लागवड झाली आहे. द्राक्ष पिकाबरोबरच आंबा, सीताफळ, पेरू आदी फळपिकांची थोड्याफार प्रमाणात शेतकरी लागवड करीत आहेत. 
- दीपाली जाधव, तालुका कृषी अधिकारी, सांगोला

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा M. Chinnaswamy Stadium वरील हा शेवटचा सामना कसा? नेमकी भानगड काय? Explained

IPL 2026 Point Table: विराट कोहलीचे शतक हुकले, देवदत्त पडिक्कलने चागंलेच झोडले; RCB चा घरच्या मैदानावरील शेवटच्या लढतीत विजय

Paytm Bank: पेटीएम पेमेंट्स बँकेचा परवाना रद्द! वापरकर्त्यांवर काय परिणाम होणार? पेमेंट करता येणार का? जाणून घ्या...

Manohar Mama Arrested: आणखी एका बाबाला अटक! स्वतःला बाळूमामाचा अवतार सांगायचा; कुर्डुवाडीत गुन्हा दाखल

RCB vs GT Live: विराट कोहलीने इतिहास रचला! IPL मध्ये असा पराक्रम करणारा पहिलाच फलंदाज ठरला; गेल, रोहितच्या यादीत स्थान

SCROLL FOR NEXT