jati ekata.jpg
jati ekata.jpg 
सोलापूर

जातीप्रथा निर्मूलनासाठी सकारात्मक पाऊल : वस्त्याची नावे बदलण्याच्या निर्णयाचे स्वागत 

अरविंद मोटे

सोलापूर ः महाराष्ट्र शासनाने शहर व गावांमधील जातीवाचक स्थळ निर्देश हटवण्याचा निर्णय घेतला आहे. अनेक पिढ्यांपासून समाजाच्या खांद्यावर जाती व्यवस्थेचे जोहड ठेवलेले आहे. यात जखडलेला समाज अनेक वर्षांपासून जातीपातीच्या बंधनात गुंतला आहे. यातून समाजाला मुक्ती देण्यासाठी अनेक महापुरुषांना खस्ता खाल्या आहेत. आजही अनेक गावखेड्यांसह शहरात वाड्यावस्त्यांना जातीवाचक नावे आहेत. ही नावे हटवण्याचा आता शासनानेच निर्णय घेतला आहे. जनमानसातूनही या निर्णयाचे स्वागतच होत आहे. "सकाळ'च्या कॉफी विथ सकाळ या उपक्रमात शहरातील विचारवंत, साहित्यिक व सामाजिक कार्यकर्त्यांनी या निर्णयाचे स्वागतच केले आहे. 


निर्णय चांगला, पण पुन्हा 
महापुरुषांची विभागणी नको 

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी पाहिलेले स्वप्न आज पूर्ण होत आहे. गाव खेड्यातील वाडे शहरातील नगर मोहल्ल्यांची जात धर्मविरहित नावे देणे, ही बाब नक्कीच स्वागतार्ह आहे. सोलापूर शहरासह महाराष्ट्रभर अशी नावे आहेत. ती बदलणे नक्‍कीच चांगलेच आहे. केवळ विशिष्टच धर्म किंवा जातीचीच नव्हे, तर सर्व जाती धर्मांची नावे आहेत. सोलापुरात मराठा वस्ती, मुस्लिम पाच्छापेठ, तेलंगी पाच्छापेठ आहे. नाशिकला पिंजारी जाठ आहे. अनेक शहरात ब्राह्मण गल्लीदेखील आहेत. आपली जातीविरहित, धर्मनिरपेक्ष समाजरचनेकडे वाटचाल सुरु आहे. त्यामुळे अशी नावे नसणे चांगले. मात्र, आता एक धोका आहे. नवी नावे देताना ज्यांच्या त्यांच्या जाती धर्मांच्या महापुरुषांची नावे पुढे येतील. त्यातून पुन्हा तोच जाती धर्मांचा बोध होईल. शिवाय जाती-धर्मानुसार महापुरुषांची विभागणीही होईल, हे मात्र टाळणे आवश्‍यकच आहे. 
-अजिज नदाफ, ज्येष्ठ साहित्यिक 

भारतीयत्त्वाची संकल्पना दृढ व्हावी 
शासनाचा निर्णय चांगला आहे. यामुळे सर्वधर्म समभावाची भावना दृढ होईल. जाती-विजाती, असे म्हणत बसू नका. कर्माद्वारे मोठे व्हा, ध्येय सिद्ध करा. आधी माणूस व्हा, मग अधिकारी, नेता आणखीन काय व्हायचे ते व्हा, असा संदेश महात्मा बसवेश्‍वरांनी दिला आहे. त्यांचा हा बाराव्या शतकातील संदेश आज फलश्रृत होत आहे. बसवण्णांनी बाराव्या शतकामध्ये आंतरजातीय विवाह करुन सामाजिक क्रांती घडवून आणली. त्यानंतरही जात पुसली जात नसल्याने खेद वाटत आहे. राज्य शासनाच्या निर्णयामुळे वस्त्यांना लागलेला कलंक पुसण्याबरोबरच भारतीयत्त्वाची संकल्पना दृढ होण्यास मदत होणार आहे. मानवता एकच जात आहे, असे प्रत्येकांनी मानायला हवे. आचार, विचार शुद्ध ठेवून जात निर्मुलनासाठी प्रत्येकांनी पुढाकार घेणे अपेक्षित आहे. 
-श्रीशैल हत्तुरे, संस्थापक अध्यक्ष, महात्मा बसवेश्‍वर प्रतिष्ठान व सामाजिक संस्था 

जाती व्यवस्था नष्ट करण्याची गरज 

पूर्वी सैन्य दलामध्ये भारतातील निरनिराळ्या जाती व जमातींच्या नावाने रेजिमेंट होत्या व आजही आहेत. त्यामध्ये आता बदल करण्यात आला आहे. सैन्यात भरती व्हावयाचे झाल्यास उमेदवाराला त्याच्या जातीच्या रेजिमेंटमध्येच भरती व्हावे लागत. आता त्यामध्ये भारत सरकारने बदल केला आहे. जर एखादा मराठा मुलास सैन्यामध्ये भरती व्हावयाचे झाल्यास तो कोणत्याही रेजिमेंटमध्ये भरती होऊ शकतो. तसेच ग्रामीण भागामध्ये व काही शहरामध्ये जातीच्या नावाने वाड्या-वस्त्या व गल्ल्यांना नावे आहेत. काही समाज एखाद्या भागामध्ये समुहाने रहातो. त्यामुळे त्या भागास किंवा गल्लीस जो समाज राहतो त्या नावाने ओळखले जाते. आता 21 व्या शतकाकडे जात असताना अशा गल्ली बोळांना जातीवाचक नावाने संबोधणे चुकीचे आहे. त्यामुळे राज्य शासनाने जातीवाचक वाड्या-वस्त्यांची नावे बदलण्याचा निर्णय घेतला तो योग्य आहे. 
- दास शेळके, जेष्ठ नेते, मराठा महासंघ 

महापुरुषांच्या नावांपेक्ष विचारांचा प्रसार व्हावा 
वसाहतीला त्या त्या महापुरुषांची जरी नावे दिली तरी महापुरुषांच्या समतावादी सामाजिक कार्याचा बहुजन समाजामध्ये पाहिजे तेवढा प्रचार-प्रसार झाला नाही. म्हणूनच वसाहतींना महापुरुषांची नावे जरी दिली तरी त्या महापुरषांच्या जातीवरून त्या वसाहतीची ओळख होणार हे निश्‍चित आहे. कारण महापुरुषांना जात म्हणून स्वीकारल्याची मानसिकता आजसुध्दा बहुजन समाजाच्या मनामध्ये घट्ट झाले आहे. त्यासाठी वसाहतीला महापुरुषांची नावे देण्यापेक्षा समतावादी विचारांचा प्रचार व प्रसार करणाऱ्या महापुरुषांच्या सामाजिक कार्याच्या अनुषंगाने त्यांच्या समतावादी विचारांचा प्रचार व प्रसार करावा. त्यामुळे महाष्ट्रात होत असलेले अत्याचार कमी होतील. महाराष्ट्रामध्ये जात मानसिकतेतून होत असलेले अन्याय अत्याचार कमी होतील. 
-युवराज पवार, अध्यक्ष, मातंग समाज, सोलापूर शहर-जिल्हा 

 
संपादनः प्रकाश सनपूरकर

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 RCB vs CSK Live Score: रचिन रविंद्रचे शानदार अर्धशतक! चेन्नईच्या आशाही फुलवल्या

Lok Sabha Election 2024: निवडणुकीदरम्यान 8,889 कोटींची रोकड, 4,000 कोटींचं ड्रग्ज जप्त! निवडणूक आयोगाची माहिती

Lok Sabha Election 2024 : रायबरेली, अमेठीत प्रचाराचा धडाका! राहुल गांधी विरुद्ध ‘स्थानिक’ असा तडका

Video: अत्यंत संतापजनक! भर बाजारात अल्पवयीन मुलीसोबत अश्लील वर्तन; व्हिडिओ पाहून तुम्हालाही येईल राग!

RCB vs CSK: सँटेनरनं बॉलला स्पर्श केला अन् डू प्लेसिस रनआऊट झाला, पण विकेट अडकली वादाच्या भोवऱ्यात

SCROLL FOR NEXT