Post Logo 
सोलापूर

पोस्ट खाते नेमणार विमा एजंट ! थेट मुलाखतीद्वारे होणार प्रतिनिधींची निवड; त्यासाठी असा करा अर्ज 

अभय जोशी

पंढरपूर (सोलापूर) : टपाल जीवन विमा योजना आणि ग्रामीण टपाल जीवन योजनेअंतर्गत असणाऱ्या विविध विमा योजनांच्या विक्रीसाठी विमा प्रतिनिधींची नेमणूक थेट मुलाखतीद्वारे केली जाणार आहे. इच्छुकांनी 6 आणि 7 जानेवारी रोजी पंढरपूर येथील मुख्य पोस्ट कार्यालयात उपस्थित राहावे, असे आवाहन पंढरपूर येथील डाक घर अधीक्षक एन. रमेश यांनी केले आहे. 

डाक घर अधीक्षक एन. रमेश यांनी याविषयी सविस्तर माहिती दिली. ते म्हणाले, मुलाखतीसाठी येताना इच्छुकांनी आपल्या सोबत अधीक्षक डाक घर, पंढरपूर विभाग यांच्या नावाचा लेखी अर्ज व शैक्षणिक प्रमाणपत्र तसेच आधार कार्ड, पॅन कार्ड, जन्म तारखेचा दाखला, फोटो व अन्य संबंधित कागदपत्रांसह उपस्थित राहावे. विमा प्रतिनिधीचे काम करू इच्छिणाऱ्या व्यक्तीचे वय 18 ते 50 वर्षांपर्यंत असावे. संबंधित व्यक्ती दहावी पास असावी, इच्छुक व्यक्तीस विमा विक्रीचा अनुभव, संगणकाचे ज्ञान, स्थानिक भागाची पूर्ण माहिती असणे अपेक्षित आहे. बेरोजगार तरुण, तरुणी, स्वयंरोजगार असणाऱ्या महिला, पुरुष, कोणत्याही कंपनीचे माजी विमा प्रतिनिधी, माजी जीवन विमा सल्लागार, अंगणवाडी कर्मचारी, महिला मंडळ, कर्मचारी, स्वयंसेवी संघटना चालक, माजी सैनिक, निवृत्त शिक्षक, ग्रामपंचायत सदस्य किंवा वरील पात्रता असणारे सर्व इच्छुक अर्ज करू शकतात. 

थेट मुलाखतीद्वारे विमा प्रतिनिधी म्हणून निवड झालेल्या उमेदवारांना टपाल विभागाने वेळोवेळी ठरवून दिल्याप्रमाणे कमिशन, प्रोत्साहन भत्ता दिला जाईल. थेट मुलाखतीद्वारे टपाल जीवन विमा व ग्रामीण जीवन विमा प्रतिनिधी म्हणून निवड झालेल्या उमेदवारांना टपाल खात्यामार्फत आंतरिक प्रशिक्षण दिले जाईल. निवड झालेल्या उमेदवारांना परीक्षा फी 400 आणि परवाना फी 50 रुपये जमा करावे लागेल. निवड झालेल्या उमेदवारांना पाच हजार रुपये टपाल बचत खात्यामध्ये राष्ट्रीय बचत पत्र, किसान विकास पत्रमध्ये भारताचे राष्ट्रपती यांचे नावे तारण म्हणून ठेवावे लागेल. इच्छुक उमेदवारांनी 6 आणि 7 जानेवारी रोजी सकाळी 10 ते सायंकाळी चार या वेळात लेखी अर्ज आणि कागदपत्रांसह स्वखर्चाने उपस्थित राहावे, असे आवाहन पंढरपूर येथील डाक घर अधीक्षक एन. रमेश यांनी केले आहे. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Srinagar Blast : दिल्लीनंतर श्रीनगर पोलिस स्टेशनजवळ भयानक स्फोट! ९ ठार, २९ जखमी; CCTV व्हायरल

'पुरुषांना सुद्धा मासिक पाळीच्या वेदना झाल्या पाहिजेत' अभिनेत्री रश्मिका मंदानाचं वक्तव्य, नेटकरी म्हणाले, 'पुरुषांचा त्रास...'

Pune Navale Bridge Accident : नवले पूल अपघात 'ब्रेक फेल'ने नव्हे, तर 'चालकाचे नियंत्रण सुटल्याने' झाला! RTO चा प्राथमिक निष्कर्ष

Sahyadri Tiger Reserve : ऐतिहासिक क्षण! सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात पहिली वाघीण दाखल; ताडोबातील ‘चंदा’ सह्याद्रीच्या जंगलात झेपावली...

Pune Navale Bridge Accident : 'अधिकारी समन्वयाचा अभाव दिसल्यास कारवाई'; केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांचा स्पष्ट इशारा

SCROLL FOR NEXT