Textile 
सोलापूर

लॉकडाउन : यंत्रमाग उद्योग एक वर्ष पिछाडीवर 

श्रीनिवास दुध्याल

सोलापूर : कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी सुरू असलेल्या लॉकडाउनमुळे 22 मार्चपासून येथील यंत्रमाग उद्योग बंद आहे. दररोज चार कोटींच्या हिशेबाने 30 एप्रिलपर्यंत 150 कोटींची उलाढाल यामुळे ठप्प होणार आहे. या लॉकडाउनमुळे उद्योजकांसह मर्चंट एक्‍स्पोर्टर, व्यापारी यांच्यासह कामगार, बॅक प्रोसेस कामगारांचेही अतोनात नुकसान होत आहे. 

उद्योगाला पूर्वस्थितीत येण्यास लागू शकतो वर्षाचा कालावधी 
लॉकडाउननंतर उद्योग सुरू झाल्यानंतरही पुढील दिवस कठीण जाणार आहेत. देशांतर्गत व विदेशी मार्केट खुली न होणे, कच्चा माल न मिळणे, उधारी वसूल न होणे, खेळते भांडवल तसेच बॅंकांचे पूर्वीचे कर्जाचे हप्ते... अशी अनेक विघ्ने यंत्रमाग उद्योजकांसमोर असणार आहेत. एकूणच या उद्योगाला पूर्वस्थितीत येण्यास वर्षाचा कालावधी लागू शकतो, अशी शक्‍यता यंत्रमाग उद्योजकांनी "सकाळ'शी बोलताना व्यक्त केली. 

यंत्रमाग उद्योग : आज आणि उद्या 

  • उत्पादने बंद, व्यवहार बंद, कच्च्या मालाची आवक व पक्‍क्‍या मालाची जावक बंद 
  • लॉकडाउन कधी उठणार याबाबत ठोस माहिती नाही 
  • यादरम्यान कर्जाच्या हप्त्यांना तीन महिन्यांची सवलत मात्र उत्पादन नसल्याने पुढील हप्त्यांची चिंता 
  • शासनच कोरोना नियंत्रणासाठी मदतीचे आवाहन करत आहे, तेव्हा उद्योजकांना मदत कोण करणार? 
  • लॉकडाउननंतर कापूस उपलब्ध होईल, स्पिनिंग मिल सुरू होतील मात्र व्यापारी दुकाने व दळणवळण यंत्रणा व्हायला हवी सुरळीत 
  • कच्च्या मालापासून तयार उत्पादने मार्केटमध्ये जाणे व त्याची बिले मिळून उद्योग सुरळीत होण्यास बराच कालावधी जाणार 
  • दैनंदिन उत्पादन बंद, उलाढाल बंदमुळे लॉकडाउननंतर कच्चा माल व खेळत्या भांडवलाची येणार समस्या 
  • यात छोटे यंत्रमागधारक तग धरणे कठीण 
  • कारखानदारांना कमी व्याजदराने कर्ज व कमी दरात वीज उपलब्ध होणे आवश्‍यक 
  • कामगारांमधील कोरोनाची भीती घालवून त्यांची कार्यक्षमता वाढवण्याची गरज 

एकूण उत्पादनाच्या 25 टक्के नुकसान कामगारांचे 
यंत्रमाग उद्योगात 650 कारखानदार असून, 12 हजार लूम आहेत. बॅक प्रोसेससह यंत्रमागावर वस्त्र विणणारे अशी एकूण कामगारांची संख्या 40 हजार आहे. कोरोनामुळे रोजच्या चार कोटींच्या उलाढालीवर परिणाम झाला आहे. उत्पादनातील 20 ते 25 टक्के मजुरीचा हिस्सा हा कामगारांचा असतो. त्यामुळे कारखानदारांना तीन कोटी तर कामगारांना दररोजचे एकत्रित उत्पन्न एक कोटींचे नुकसान सहन करावे लागत आहे. 

कोरोनामुळे इतर उद्योगांसह यंत्रमाग उद्योगालाही खूप मोठा फटका बसला आहे. 22 मार्चपासून उद्योग बंद असल्याने दररोजची चार कोटींची उलाढाल ठप्प झाली असून, कारखानदारांसह कामगारांनाही खूप मोठे नुकसान सहन करावे लागत आहे. लॉकडाउनमुळे यंत्रमाग उद्योग एक वर्ष मागे गेला आहे. सोलापूर ग्रीन झोनमध्ये आल्याने थोड्या प्रमाणात उत्पादने घेण्याची आशा होती. मात्र रविवारी एक पॉझिटिव्ह प्रकरण पुढे आल्याने ती आशाही आता धूसर झाली आहे. 
- पेंटप्पा गड्डम, 
अध्यक्ष, सोलापूर जिल्हा यंत्रमागधारक संघ 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tata Chairman Salary: Tata Sons च्या चेअरमनला किती पगार मिळतो? नोएल टाटांच्या विरोधानंतर पद पुन्हा चर्चेत; आकडा पाहून धक्का बसेल!

Akola News : जिल्हाधिकाऱ्यांनी सोडले शेतकऱ्यांना वाऱ्यावर; महाबीज प्रशासनाकडून माहिती देण्यास नकार, एमडींनीही केले हात वर

Ai+ Nova 2 Power 5G भारतात लाँच! 16,999 रुपयांत खरेदीची संधी...पाहा फीचर्स अन् ऑफर्स!

Katraj Kondhwa Road Issue : आयुक्तांचे आश्वासन विरणार हवेत! कात्रज कोंढवा रस्ता; उर्वरित १० मिळकतींमुळे रस्ता रुंदीकरण रखडणार

Farmer Agitation : शेतकरी संकटात, सरकार कुठंय? लोहाऱ्यात हजारो शेतकऱ्यांचा आक्रोश; आमदारांना बोलण्यास मनाई करत शेतकऱ्यांनी सोयाबीन उधळले

SCROLL FOR NEXT