karmala.jpg 
सोलापूर

करमाळा बाजार समितीमध्ये उडदाला सहा हजार रुपये मिळतोय भाव 

अण्णा काळे

करमाळा (सोलापूर) : करमाळा कृषी उत्पन्न बाजार समिती उडदाची आवक वाढली असून उडदाला 6 हजारापर्यंत भाव मिळत आहे. शेतकऱ्यांना 24 तासाच्या आत पैसे दिले जात आहे. 

कृषी उत्पन्न बाजार समितीत अडत दुकानात जाऊन स्वतः सभापती बंडगर यांनी आडत व्यापारी व शेतकरी यांच्याशी संवाद साधला.यावेळी बाजार समितीचे संचालक संतोष वारे, आनंदकुमार ढेरे, सचिव सुनील शिंदे उपस्थित होते. 

बाजार समितीत उडीदाची आवक मोठ्या प्रमाणात होत आहे. यंदाच्या खरीप हंगामात समाधानकारक पाऊस झाल्यामुळे शेतकऱ्यांना उडीदाचे मोठे उत्पादन झाले आहे . त्यामुळे बाजार समितीत सध्या दररोज सरासरी 3500 क्विंटल आवक होत असून उडीदाला चांगला मिळत असल्यामुळे शेतकरी वर्गात समाधान व्यक्त होत आहे . करमाळा बाजार समितीत शेतकऱ्यांचे मालाचे त्वरीत मापे, चोख वजन व 24 तासाच्या आत पट्टीमिळत असल्यामुळे व आसपासच्या बाजार समित्यापेक्षा जास्त दर मिळत असल्यामुळे शेतकऱ्यांनी आपला माल बाजार समितीत विक्रीस आणत आहेत. बाजार समितीत पारदर्शी सौदे व चोख व्यवहार असल्याने शेतकऱ्यांनी इतर बाजार समितीतील बाजार भावाची चौकशी व खात्री करुन शेतकरी माल आणत आहेत. जादा दराचा लाब शेतकऱ्यांना मिळतो आहे. 

शेतकऱ्यांनी माल आणावा 
बाजार समितीचा सभापती झाल्यापासून शेतकऱ्यांच्या शेतमालाला जास्तीत जास्त भाव मिळुन देण्यात साठी प्रयत्नशील आहे.त्यामुळे जास्तीत जास्त शेतक-यांनी आपला माल बाजार समितीत विक्रीस आणावा. 
- प्रा.शिवाजी बंडगर, सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती 

संपादनः प्रकाश सनपूरकर 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Video: एलपीजी गॅसला पर्याय सापडलेलं डायमिथाईल इथर नेमकं काय आहे? पुण्यातल्या शास्त्रज्ञांच्या हाती मोठं यश

CA Exam : टेलर व्यावसायिकाचा मुलगा झाला ‘सीए’; प्रतिकूल परिस्थितीवर मात करत मिळवले यश

Beed Crime: अल्पवयीन विवाहितेवर अत्याचार करुन खांबाला बांधलं; लोकांनी सोडवण्याऐवजी व्हिडीओ शूट केले

Nasrapur Accident : भरधाव डंपरने दुचाकीला मागून ठोकरले; अपघातात आजोबा, नातीचा मृत्यू

Prakash Ambedkar : एपस्टिन प्रकरणाबाबत संघाला जाब विचारणार; २३ मार्चला नागपुरात आंदोलन

SCROLL FOR NEXT