सोलापूर

जालीहाळमध्ये घोळात घोळ...

हुकुम मुलाणी

मंगळवेढा (जि. सोलापूर )ः तालुक्‍यातील जालीहाळ येथील शेतकऱ्याला पंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेचा दोन बॅंकेतला लाभ मिळाल्यामुळे वंचित शेतकऱ्यांतून संताप व्यक्त केला जात आहे. या योजनेच्या लाभासाठी तालुक्‍यातील अजून बहुतांश शेतकरी वंचित आहेत. नियुक्त तलाठी मुख्यालयात भेटत नसल्यामुळे शेतकऱ्यांना मंगळवेढ्याला हेलपाटे मारावे लागत आहेत. 

लोकसभा निवडणुकीपूर्वी केंद्र शासनाने शेतकऱ्यांना प्रति वर्ष सहा हजार रुपये वार्षिक पेन्शन देण्याचा निर्णय घेतला. त्याप्रमाणे ही पेन्शन वर्षात तीन वेळा शेतकऱ्यांच्या थेट बॅंक खात्यावर जमा करण्यात येत आहे. दरम्यान, नुकतीच या रकमेत वाढ करून ती आता आठ हजार रुपये करण्यात आली. यासाठी शेतकऱ्यांकडून या योजनेचे ऑनलाइन अर्ज पी. एम. किसान या संकेतस्थळावर करण्यात येत आहेत.

तालुक्‍यात शेतकऱ्यांच्या नावाची माहिती ऑनलाइन करताना तलाठी व त्यांच्या हाताखालच्या झिरो कर्मचाऱ्याकडून खाते क्रमांक, बॅंक पासबुक व आधार क्रमांक चुकलेला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची त्यांच्या अनुदानाची रक्कम दुसऱ्या शेतकऱ्याच्या खात्यावर जमा झाली आहे. याबाबत तलाठ्याकडून शेतकऱ्यांना समाधानकारक उत्तरे दिली जात नसल्यामुळे शेतकरी वर्गातून संताप व्यक्त केला जात असतानाच खाते क्रमांक दुरुस्तीनंतरही काही गावात दुसऱ्याच्या खात्यावर रक्कम जमा झाली. तालुक्‍यातील जालीहाळ येथील भीमराव गुंडीबा खरात या शेतकऱ्याच्या विदर्भ कोकण ग्रामीण बॅंक, शाखा निंबोणी या खात्यावर व जिल्हा मध्यवर्ती बॅंक, शाखा निंबोणी या दोन ठिकाणी त्यांच्या अनुदानाची रक्कम जमा झाली. त्यामुळे एकाच शेतकऱ्याला दोनदा लाभ खाते क्रमांक चुकवून देण्याचा प्रकार केला. त्यामुळे या गावातील शेतकऱ्यांतून संताप व्यक्त केला जात आहे. याशिवाय धोंडिबा दौला सोलनकर व बापू कृष्णा कांबळे या 
या शेतकऱ्यांचा खाते क्रमांक चुकल्यामुळे त्यांचे अनुदान दुसऱ्या शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाले. त्या शेतकऱ्याने ती रक्कम काढून नेल्यामुळे सोलनकर या शेतकऱ्याला बॅंकेला हेलपाटे मारून रिकाम्या हाती ते घरी परतावे लागले. 

शेतकऱ्यांकडून या योजनेचे ऑनलाइन अर्ज पी. एम. किसान या संकेतस्थळावर करण्यात येत आहे. एकाच शेतकऱ्याच्या खात्यावर दोनदा पैसे आल्याच्या प्रकाराची चौकशी करण्यात येईल. 
- स्वप्नील रावडे, तहसीलदार  

तलाठ्याकडे बॅंक पासबुक, आधार कार्ड झेरॉक्‍स देऊनही माझ्या नावापुढे खरात या शेतकऱ्यांचा खाते क्रमांक टाकून त्याच्या खात्यात अनुदान जमा करण्याचा प्रकार केल्यामुळे या अनुदानापासून वंचित राहावे लागत आहे. भविष्यातील अनुदान माझे खात्यावर जमा व्हावे. पोर्टलवर अद्याप दुरुस्ती केली नाही. उलट झालेली चूक एकमेकांवर ढकलली जात आहे.

- असंत जावीर, जालीहाळ 

महाराष्ट्र

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Live Updates : एरंडोलमध्ये ८२ सार्वजनिक गणेश मंडळांकडून उत्साहात गणरायाची स्थापना

पतीचा मंगळदोष दूर करण्यासाठी पत्नीच्या प्रायव्हेट पार्टला हळदी कुंकू लावून...; भोंदूबाबाकडून अघोरी कृत्य, हुंड्यासाठी छळ

Ganesh Chaturthi 2026: क्रिकेटपटूंचा ‘सुपर सिलेक्टर’ म्हणून प्रसिद्ध खजराना गणपती; दरवर्षी १ इंचाने वाढतो स्वयंभू मूर्तीचा आकार?

Ganesh Chaturthi 2026 : गणपतीचे जन्मस्थान कोणते माहितीय ? इथे कधीच होत नाही गणेश विसर्जन ! जाणून घ्या डोडीतालचे रहस्य

Asia Cup 2026 : 'त्यांच्याकडून आणखी काही मागू शकत नाही...', कर्णधार हरमनप्रीत कौरने चॅम्पियन झाल्यानंतर काय म्हणाली?

SCROLL FOR NEXT