turung.jpg 
सोलापूर

अबब...! कारागृहाची क्षमता 141 अन्‌ आहेत 428 कैदी 

तात्या लांडगे

सोलापूर : देशातील कोरोनाच्या विषाणूचा विळखा कमी करण्यासाठी गर्दीतून विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी तुरुंगातील कैद्यांची पॅरोलवर सुटका केली जात आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या हाय पॉवर कमिटीच्या निर्देशानुसार सोलापुरातील तुरुंगातून मागील चार दिवसांत 32 कैद्यांची सुटका करण्यात आली आहे. सोलापुरातील तुरुंगाची क्षमता 141 कैद्यांची आहे, मात्र सद्यस्थितीत तुरुंगात तब्बल 428 कैदी असल्याची माहिती तुरुंग अधिक्षक दिगंबर इगवे यांनी दिली. 


राज्यातील तुरुंगाची क्षमता कमी अन्‌ कैदी पाचपट अशी आवस्था सर्वत्र पहायला मिळत आहे. गर्दीतून कोरोनाचा संसर्ग वाढणार नाही, याची दक्षता राज्याच्या गृह विभागाकडून घेतली जात आहे. गृहमंत्री अनिल देशमुख सातत्याने त्याबद्दलचा आढावा घेत आहेत. आतापर्यंत राज्यातील अंदाजे 20 हजारांहून अधिक कैद्यांच सुटका करण्यात आली आहे. त्यामध्ये सोलापुरातील तुरुंगातील 32 कैद्यांचा समावेश असून त्यांना विविध गुन्ह्यांमध्ये सात वर्षांपेक्षा कमी शिक्षा झालेली आहे. यांना आता सुरवातीला 45 दिवसांच्या मुदतीवर सोडण्यात आले आहे. त्यांना घराबाहेर फिरु नका अशी सक्‍त ताकीद देण्यात आली असून घराबाहेर फिरताना दिसल्यास पुन्हा तुरुंगात टाकले जाईल, असा इशाराही त्यांना देण्यात आला आहे. 


सोलापुरातील तुरुंगात तीनपट कैदी 
सोलापुरातील तुरुंगाची क्षमता 141 आहे, मात्र सद्यस्थितीत तुरुंगात 428 कैदी आहेत. स्वातंत्र्यपूर्व काळातील तुरुंग असून मागील दहा वर्षांपूर्वी तुरुंगाचा विस्तार करण्यासाठी निधी मिळाला. 80 टक्‍के कामही पूर्ण झाले, मात्र निधीअभावी 2012 पासून तुरुंगाचे काम रखडलेले आहे. तुरुंगाच्या विस्तारासाठी निधी मिळाल्यास आणखी 150 कैद्यांची क्षमता वाढणार आहे. तुरुंगात कैद्यांची दाटीवाटीमुळे तुरुंग प्रशासन हतबल झाले आहे. आता कोरोनामुळे सात वर्षांच्या आत शिक्षा झाली आहे, अशांना पॅरोलवर सोडण्यात येत आहे. मात्र, त्यांना 30 दिवसांतून एकदा जवळच्या पोलिस ठाण्यात हजेरी देणे बंधनकारक आहे. दरम्यान, लॉकडाउन आणि कोरोना रुग्णांची स्थिती अशीच राहिल्यास कैद्यांना आणखी 30 दिवसांच्या पटीत मुदतवाढ दिली जाणार आहे, असेही तुरुंग अधिक्षक दिगंबर इगवे यांनी सांगितले. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

नातेवाईक नाहीत, आधार नाही; शेवटच्या प्रवासाची चिंता मिटवण्यासाठी वृद्धाने केलं स्वतःचं श्राद्ध

“मी स्क्रिप्ट वाचत नाही, तर लेखक किंवा दिग्दर्शकाकडून त्यांचं व्हिजन ऐकतो” सिनेमा निवडण्यावर सलमानचा खुलासा

Best Mileage Bikes : कमी पेट्रोलमध्ये जास्त चालतात 'या' 5 दमदार बाईक्स; सर्वाधिक मायलेज अन् किंमत लाखाच्या आतच

वल्लरीचा खोटेपणा उघड होणार? तू हि रे माझा मितवा मधील ट्विस्टने प्रेक्षक चकित

Latest Marathi News Live Update : पुण्यात पोलिसांवर गोळीबार करणाऱ्या हल्लेखोरांचा शोध तीव्र

SCROLL FOR NEXT