sahkarmaharshi,jpg.jpg 
सोलापूर

सहकारमहर्षी साखर कारखान्यात 1 लाख 11 हजार 111 साखर पोत्याचे उत्पादन 

शशिकांत कडबाने

अकलूज (सोलापूर): सहकारमहर्षी साखर कारखान्यात 1 लाख 11 हजार 111 व्या साखर पोत्याचे पूजन अध्यक्ष जयसिंह मोहिते-पाटील यांचे हस्ते करण्यांत आले. 

सहकारमहर्षी शंकरराव मोहिते पाटील सहकारी साखर कारखान्या सन 2020-21 चा ऊस गळीत हंगाम मागील महिन्यापासून सुरु झाला आहे. शुक्रवार (ता.13) अखेर 1 लाख 46 हजार 299 मे.टन ऊसाचे गाळप पूर्ण झाले. त्याद्वारे 1 लाख 21 हजार साखर पोत्याचे उत्पादन झाले आहे. 

सरासरी साखर उतारा 9.35 व आजचा साखर उतारा 9.42 एवढा आहे. मार्गदर्शक संचालक विजयसिंह शंकरराव मोहिते-पाटील आणि अध्यक्ष जयसिंह शंकरराव मोहिते-पाटील यांचे मार्गदर्शनाखाली प्रगतीपथावर असणाऱ्या या कारखान्यात प्रति दिन 8,000 में.टनाने ऊसाचे गाळप होत आहे. तसेच सहवीज निर्मिती प्रकल्पामध्ये शुक्रवार (ता.13) अखेर 1 कोटी 23 लाख 42 हजार 307 युनीट विज निर्माण झाली. आतापर्यंत 78 लाख 06 हजार 758 युनीट विज विक्री केलेली आहे. तसेच चालू सिझनमध्ये उपपदार्थ प्रकल्पातील डिस्टीलरीमध्ये 9 लाख 67 हजार 813 लिटर्स रेक्‍टीफाईड स्पिरीटचे उत्पादन झाले. तसेच 4 लाख 86 हजार 790 लिटर्स इथेनॉल उत्पादीत झाले असल्याची माहिती कारखान्याचे कार्यकारी संचालक राजेंद्र चौगुले यांनी दिली. 
यावेळी उपाध्यक्ष प्रकाश पाटील, संचालक लक्ष्मण शिंदे, धनंजय चव्हाण चांगदेव घोगरे, भारत फुले, भिमराव काळे, बाबूराव पताळे, खातेप्रमुख, कामगार युनियन प्रतिनिधी व कर्मचारी वर्ग उपस्थित होते. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पक्षात खदखद! नेतृत्वावर थेट प्रश्न अन्...; राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याची भावनिक पोस्ट चर्चेत, काय म्हणाले?

जमीन, जागेची खरेदी-विक्री आता कोणत्याही तालुक्यात! खरेदी-विक्री व्यवहारातून राज्याच्या तिजोरीत ५८,६७३ कोटी; ३१ मार्चपर्यंत सुट्टीतही सुरु राहणार कार्यालये

सोने-चांदीच्या भावात अचानक वाढ! युद्धानंतर सुरू असलेल्या घसरणीला ब्रेक, सोनं ५५००ने तर चांदी ११००० रुपयांनी महाग

Karad News : कऱ्हाड - चिपळुण मार्गावरील अवजड वाहतुक बंद; महामार्गाच्या कामासाठी दोन महिने वाहतुकीत बदल

खरातचं कुटुंब परदेशात पलायनाच्या तयारीत? पतीचे कोट्यवधींचे व्यवहार माहिती नाहीत, पत्नीची भूमिका संशयाच्या भोवऱ्यात

SCROLL FOR NEXT