मंगळवेढा (सोलापूर) : कोराना साथीचा प्रादुर्भाव लक्षात घेऊन तालुक्यातील नंदूर येथील फॅबटेक शुगर या खासगी साखर कारखान्याने बाजारात झालेला तुटवडा कमी करण्यासाठी तयार केलेल्या सॅनिटायझरचे उद्घाटन उपविभागीय पोलिस अधिकारी दत्तात्रय पाटील व तहसीलदार स्वप्नील रावडे यांच्या हस्ते करण्यात आले.
हेही वाचा - लॉकडाउनमध्ये सोलापुरात दारूविक्री
सामाजिक गरज लक्षात घेऊन निर्मिती
यावेळी कारखान्याचे संस्थापक - अध्यक्ष भाऊसाहेब रूपनर, अध्यक्ष सरोज काझी, आवताडे शुगरचे अध्यक्ष संजय आवताडे, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष दिलीप चव्हाण, दामाजी कारखान्याचे संचालक विजय माने, पप्पू काकेकर, तुकाराम महाराज, कार्यकारी संचालक मोहन पिसे, डिस्टिलरी मॅनेजर चेतन काळे, वित्त अधिकारी रघुनाथ उन्हाळे, प्रशासनाधिकारी ज्ञानेश्वर बळवंतराव आदींसह कर्मचारी उपस्थित होते. कोरोना साथीचा प्रादुर्भाव देशात सुरू झाल्यापासून सॅनिटायझरची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली. परंतु मागणीप्रमाणे त्याचा पुरवठा बाजारात उपलब्ध नसल्यामुळे त्याची विक्री चढ्या दराने होऊ लागली. त्यामुळेच जनतेची होत असलेली ससेहोलपट कमी करण्यासाठी तालुक्यातील नंदूर येथील फॅबटेक शुगर या कारखान्याने उपलब्ध असलेल्या डिस्टिलरी प्रकल्पातील अल्कोहोलचा उपयोग समाजातील नागरिकांची सामाजिक गरज लक्षात घेऊन सॅनिटायझर निर्माण करण्याचा निर्णय घेतला आणि कमी कालावधीत सॅनिटायझर बाजारात उपलब्ध करून दिले.
सॅनिटायझरसाठी संपर्क साधण्याचे आवाहन
शंभर मिलिलिटरपासून पाच लिटरपर्यंत सॅनिटायझर उपलब्ध असून, त्यामुळे कमी काळात बाजारात झालेला तुटवडा भरून निघणार आहे. ग्राहकांना मागणीप्रमाणे सॅनिटायझर उपलब्ध असून ज्या व्यापाऱ्यांना ग्राहकांच्या मागणीप्रमाणे हवे त्या प्रमाणात खरेदीसाठी कारखान्याशी संपर्क साधावा, असे आवाहन अध्यक्ष सरोझ काझी यांनी केले. आज उत्पादनातील पहिले सॅनिटायझर उत्पादन जनतेच्या सुरक्षिततेसाठी अहोरात्र
तालुक्यातील महसूल व पोलिस खात्यातील कर्मचाऱ्यांसाठी संजय आवताडे यांच्या हस्ते भेट देऊन सामाजिक बांधिलकी जपण्याचा प्रयत्न करण्यात आला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.