आता प्रॉक्सिमिटी सेन्सर प्रणालीची सुरवात सोलापूर रेल्वे स्थानकाच्या पाचही प्लॅटफॉर्मवर करण्यात आली आहे.
सोलापूर : मध्य रेल्वेच्या (Central Railway) सोलापूर विभागात दिवसेंदिवस नवनव्या अत्याधुनिक प्रणालीचा वापर करण्यात येत आहे. आता प्रॉक्सिमिटी सेन्सर प्रणालीची (Proximity sensor system) सुरवात सोलापूर रेल्वे स्थानकाच्या (Solapur Railway Station) पाचही प्लॅटफॉर्मवर करण्यात आली आहे. या सेन्सरमुळे जेव्हा रेल्वे येईल तेव्हा 100 टक्के प्लॅटफार्मवरील लाईट आपोआप लागतील. रेल्वे प्लॅटफॉर्मवरून जाताच 70 टक्के लाईट आपोआप बंद होउन 30 टक्के लाईट सुरू राहतील. सोलापूर रेल्वे स्थानकासह विभागातील मोठ्या रेल्वे स्थानकांवर प्रॉक्सिमिटी सेन्सर लावण्यात आले आहेत.
सोलापूर रेल्वे स्थानकावर अत्याधुनिक प्रणालीचा वापर केला जात असून, या माध्यमातून विजेची आणि पैशाची मोठ्या प्रमाणात बचत होणार असल्याचे रेल्वे प्रशासनाने सांगितले. सोलापूर विभागात विद्युतीकरणाचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. विभागात बसविलेल्या या अत्याधुनिक सेन्सरमुळे वर्षाकाठी लाखो रुपयांची बचत होत आहे. सोलापूर रेल्वे स्थानकावरील पाचही प्लॅटफॉर्मवर सेन्सर बसविण्यात आले आहे. लहान स्थानकावर कर्मचारी काम करीत असल्याने विजेची बचत होत आहे. विभागातील स्थानकावर सेन्सर बसविण्यापूर्वी मोठ्या प्रमाणावर लाईटचा वापर होत असे. त्याचबरोबर मनुष्यबळही लागत असे. मात्र मोठ्या स्थानकावर सेन्सर लावल्यामुळे मनुष्यबळ कमी झाले आहे. यामुळे अत्याधुनिक प्रणालीमुळे मनुष्यबळ आणि विजेची मोठी बचत होण्यास मदत झाली आहे. विभागातील रोड साईड अर्थात लहान स्थानकांवर हे काम रेल्वे कर्मचारी करीत असल्याचे देखील रेल्वे प्रशासनाने सांगितले.
ठळक बाबी...
विजेचा वापर आवश्यक ठिकाणी करण्यास होणार मदत
रेल्वे प्रशासनास येणाऱ्या बिलामध्ये होईल बचत
विद्युत उपकरणे जसे की, पंखे, एसी, ट्यूबलाईट यांचे वाढणार आयुर्मान
मागील वर्षभरात वीजबिलात 16 टक्के झाली बचत
सोलापूर रेल्वे स्थानकावरील पाचही प्लॅटफॉर्मवर स्वयंचलित व्यवस्था कार्यान्वित
स्वयंचलित सेन्सरमुळे रेल्वे प्लॅटफॉर्मवर यंत्रणा बसविण्यात आली आहे. विद्युत उपकरणे सतत सुरू राहात असल्याने लवकर खराब होत असे. मात्र या सेन्सरमुळे प्लॅटफॉर्मवरील विद्युत उपकरणांचे आयुर्मान वाढले आहे. त्याचबरोबर वीजबिलाची मोठी बचत होण्यास मदत झाली आहे.
- अनुभव वार्ष्णेय, वरिष्ठ विभागीय विद्युत इंजिनिअर, सोलापूर
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.