MCP Canva
सोलापूर

मराठा आक्रोश मोर्चाला माकपचा जाहीर व सक्रिय पाठिंबा !

मराठा आक्रोश मोर्चाला माकपचा जाहीर व सक्रिय पाठिंबा

श्रीनिवास दुध्याल

शनिवारी मराठा क्रांती मोर्चाचे निमंत्रक, समन्वयक नरेंद्र पाटील यांनी माकपचे कार्यालय दत्तनगर येथे माजी आमदार नरसय्या आडम यांची भेट घेतली.

सोलापूर : केंद्र सरकारने (Central Government) मराठा आरक्षणाबाबत (Maratha Reservation) घटना दुरुस्ती करून मराठा आरक्षणाचा कायदा अस्तित्वात आणावा; तसेच महाराष्ट्र राज्य सरकारने विधानसभेत मराठा आरक्षणचा कायदा तातडीने अस्तित्वात आणावा असा ठराव एकमताने मंजूर करून केंद्र सरकारकडे पाठवून द्यावा, अशी मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्षाची (Marxist Communist Party) भूमिका राहणार आहे. 4 जुलै रोजीच्या मराठा आक्रोश मोर्चास जाहीर व सक्रिय पाठिंबा आहे, असे ज्येष्ठ नेते माजी आमदार नरसय्या आडम (Narsayya Adam) यांनी जाहीर केले. (Public and active support of the Marxist Communist Party to the Maratha Akrosh Morcha in Solapur)

शनिवारी (ता. 3) सकाळी मराठा क्रांती मोर्चाचे (Maratha Kranti Morcha) निमंत्रक, समन्वयक नरेंद्र पाटील (Narendra Patil) यांनी मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्षाचे कार्यालय दत्तनगर येथे माजी आमदार नरसय्या आडम यांची भेट घेतली, त्या वेळी आडम मास्तर यांनी पाठिंब्याचे पत्र सुपूर्द केले.

या निवेदनात म्हटले आहे की, अठरा पगड जाती गुण्यागोविंदाने नांदणारे पुरोगामी राज्य म्हणजे महाराष्ट्र राज्य होय. देशाच्या आणि महाराष्ट्र राज्याच्या जडणघडणीत व उभारणीत सिंहाचा वाटा असणाऱ्या मराठा समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी आरक्षणाची नितांत गरज असून, त्यांना ते मिळणे अनिवार्य आणि क्रमप्राप्त आहे. अशी अनेक तज्ज्ञ मंडळी, राजकीय विश्‍लेषक, सामाज अभ्यासक, शिक्षणशास्त्रज्ञ, बुद्धिजीवी व्यक्तींनी आपले मत व्यक्त करणारे अहवाल सादर केले. याबाबत साकल्याने, सातत्याने चर्चा व उहापोह अखंडितपणे चालू आहे. याकडे सरकारची डोळेझाक होत आहे. याची गांभीर्याने केंद्र व राज्य सरकारने वेळीच दखल घ्यावी; अन्यथा पुढील परिणाम सरकारला भोगावे लागतील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs NZ, 5th T20I: भारतीय संघाने मैदान मारलं, न्यूझीलंडविरुद्ध मोठा विजय मिळवला; इशान किशनच्या शतकानंतर अर्शदीपच्या ५ विकेट्स

Railway Toilet Incident Video : "गेट तोडा नाहीतर मी मरेन..." ; माजी मुख्यमंत्र्यांचे मीडिया सल्लागार अडकले रेल्वेच्या शौचालयात!

Manoj Jarange: रस्ता काट्यांना भरलेला, गिधाडांपासून सावध राहा, मनोज जरांगेंच्या सुनेत्रा पवारांना मोलाचा सल्ला, काय म्हणाले?

Degloor Crime News : सीमेवरील हणेगावात ज्वेलर्सवर धाडसी दरोडा; साडेसात लाखाचा मुद्देमाल ताब्यात..

Terakhda News : वाशी तालुक्यातील तेरखेडा येथे फटाका कारखान्यात स्फोट; मोठी आग,जीवितहानी टळली.

SCROLL FOR NEXT