Purchase of maize at Pandharpur was delayed again 
सोलापूर

पंढरपूर येथील मक्‍याची हमीभावाने खरेदी पुन्हा रखडली 

सकाळ वृत्तसेवा

पंढरपूर (सोलापूर) : आधीच बारदाण्याअभावी महिनाभरापासून मका खरेदी रखडली आहे. त्यात आज मका खरेदी केंद्राच्या शासकीय गोदामाला पावसाची गळती सुरू झाली आहे. त्यामुळे पुन्हा मका खरेदी लांबवणीवर पडली आहे. ""नकटीच्या लग्नाला, सतराशे विघ्नं'' अशीच काहीशी गत येथील मका खरेदी केंद्राची झाली आहे. शासकीय मका खरेदी लांबणीवर पडत असल्याने कमी दरात मक्‍याची खरेदी करून व्यापारी शेतकऱ्यांची लूट करू लागले आहेत, असा आरोप रयत क्रांती संघटनेचे प्रदेश कार्याध्यक्ष दीपक भोसले यांनी केला आहे. 
येथील खरेदी-विक्री संघाला एक हजार 760 रुपये या हमीभावाने मक्‍याची खरेदी करण्यास परवानगी देण्यात आली आहे. मागील दोन महिन्यांपूर्वीच मका खरेदी केंद्र सुरू होणे अपेक्षित होते. परंतु लॉकडाउनमुळे खरेदी लांबणीवर पडली. लॉकडाउन शिथील झाल्यानंतर खरेदी केंद्र सुरू करण्याचे आदेश मार्केटिंग फेडरेशनने दिल्यानंतर बारदाणा उपलब्ध नसल्याचे कारण पुढे करत मक्‍याची खरेदी थांबवण्यात आली होती. 
7 जुलैच्या "सकाळ' मध्ये बारदाण्याअभावी मक्‍याची खरेदी रखडली या मथळ्याखाली बातमी प्रसिद्ध झाली होती. त्यानंतर मार्केटिंग फेडरेशनच्या अधिकाऱ्यांनी बातमीची दखल घेऊन पंढरपूर येथील मका खरेदी केंद्रासाठी 20 हजार बारदाणा उपलब्ध करून दिला आहे. त्यानंतर मंगळवार (ता. 16) पासून मका खरेदी सुरू करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. परंतु कालपासून सुरू असलेल्या पावसामुळे येथील मका खरेदी केंद्रासाठी देण्यात आलेले शासकीय धान्य गोदाम पावसामुळे गळू लागले आहे. 
त्यातच आज सकाळपासून पावसाने जोर लावला आहे. त्यामुळे गोदामात पावसाचे पाणी साचले आहे. अचानक गोदाम गळू लागल्याने मक्‍याची खरेदी करता आली नाही. पर्यायी जागेचा शोध सुरू आहे. जागा उपलब्ध होताच तातडीने खरेदी सुरू केली जाईल, अशी माहिती खरेदी-विक्रीच्या संघाच्या सूत्रांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

BMC Election: किशोरी पेडणेकर ते नील सोमय्या... बीएमसी निवडणुकीत उमेदवारांच्या संपत्तीत मोठी वाढ, शपथपत्रांतून धक्कादायक आकडे उघड

CM Fadnavis: नॅशनल क्रश घेणार मुख्यमंत्र्यांची मुलाखत; देवेंद्र फडणवीसांचा पुण्यात 'टॉक शो'

Latest Maharashtra News Updates Live: अजित पवारांचा मोदी, फडणवीसांच्या नेतृत्वावर विश्‍वास नाही का?- मोहोळ

Crime: नवऱ्याचे घनदाट केस आवडायचे; पत्नीने प्रेमाने डोक्यावरून हात फिरवला अन् सगळे केसच हाती आले, नंतर... जे घडलं ते भयंकर

Raigad News : घातक कचऱ्यावरून खळबळ; पालीत वैद्यकीय कचरा व्यवस्थापनावर कडक निर्बंध!

SCROLL FOR NEXT