mithai1.jpg 
सोलापूर

खव्याविना मिठाई निर्मिती अन विक्री करण्याचा प्रश्न सुटेना म्हणून 'ते' झाले हतबल

प्रकाश सनपूरकर

सोलापूरः शहरातील मिठाई विक्रीची दुकाने सुरू करण्यास परवानगी मिळाल्यानंतर देखील मिठाई विक्रेते व खवा उत्पादक यांच्यातील अर्थकारण मागणी नाही तर कधी पुरवठा जास्त या प्रकारामुळे बिघडले आहे. या प्रकारामुळे विक्रेते व खवा उत्पादकांची मोठी अर्थिक कोंडी झाली आहे. परिसरातील आठ गावची वाडी भागातून खवा उत्पादकांना देखील त्याचा मोठा फटका बसला आहे. 

शहरामध्ये मिठाई विक्रीची दुकाने मोठ्या प्रमाणात आहेत. लग्नसराई, सण व कार्यक्रमाच्या निमीत्ताने मिठाई खरेदीला कायम ग्राहक असते. कोरोना संकटामुळे मंदिरे बंद आहेत. त्यामुळे मंदिरांमध्ये सणासाठी जाणारी मिठाई आता विक्री होईनाशी झाली आहे. लग्नसराईचा सर्वच हंगाम रद्द झाला आहे. पण या परिस्थितीत वर्षोनुवर्षे मिठाई दुकानात काम करणारे कारागिरांना मदत करणे आवश्‍यक होते. म्हणून बहुतांश विक्रेत्यांनी या कारागिरांना कशीबशी मदत करत त्याना काही रकमा दिल्या होत्या. 
लॉकडाउन संपल्यानंतर मिठाई दुकाने उघडण्यास परवानगी मिळाली. बाजारातील व्यवहार काही प्रमाणात सुरू झाले. पण शहरात कोरोनाचा कहर कायम वाढता राहिला. त्यामुळे ग्राहकी घटली. 

या मिठाई व्यवसायातील सर्वात महत्वाचा घटक हा खवा उत्पादक असतो. अनेक शेतकरी जोडधंदा म्हणून दुध उत्पादनाचा व्यवसाय करतात. शहरातील मिठाई व्यवसायाला या शेतकऱ्यांची खवा उत्पादनाची जोड आहे. परिसरातील आठ गावची वाडी म्हणून जी गावे ओळखली जातात तेथून खव्याचा पुरवठा केला जातो. हे खवा उत्पादक देत असलेल्या खव्याच्या पासून मिठाई तयार केली जाते. ग्राहक नाही म्हणून विक्रेत्यांनी खवा मागवणे कमी केले. तर बहूतांश खवा उत्पादकांना कोरोना संकटामुळे बाजारात पोहोचण्याची देखील अडचणच झाली. त्यातच मिठाई चालकांचा प्रतिसाद कमी असल्याने त्यांनी खवा उत्पादन बंदच केले. हे खवा उत्पादक देखील आर्थिक नुकसानीत सापडले आहेत. अजुनतरी ही खवा उत्पादक ते मिठाई विक्री ही साखळी पुन्हा व्यवस्थीत झालेली नाही. त्यामुळे अद्यापही या व्यवसायातील आर्थिक अडचणी अधिक आहे. मुख्य म्हणजे खवा उत्पादक शेतकरी व विक्रेते यांची आर्थिक कोंडी झाली आहे. 


ग्राहकी कमी झाल्याने अडचणी 
सध्या शहरात मिठाई विक्रीची दुकाने सुरु झाली आहेत. मात्र ग्राहकी नसल्याने केवळ मिठाईचे उत्पादन अगदी पंचवीस टक्‍क्‍यावर आले आहे. खवा उत्पादकांकडून खव्याचा पुरवठा कमी झाला आहे. 
- रविंद्र तंबाके, मिठाई विक्रेते तथा उपाध्यक्ष कुंभार वेस व्यापारी संघटना, सोलापूर. 

खवा उत्पादन बंद करण्याची वेळ 
लॉकडाउनमुळे शहरात खवा पोहोचवणे अवघड झाले आहे. मागील काही महिन्यापासून खवा तयार करणे बंदच केले आहे. सध्या डेअरीला दूध देण्याशिवाय पर्याय राहिला नाही 
- समाधान भोसले, दुध व खवा उत्पादक, देवडी. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manikrao Kokate latest News : माणिकराव कोकाटेंना कोणत्याही क्षणी अटक होणार ; राजीनामा अजित पवारांनी स्वीकारला

Latest Marathi News Live Update : केडीएमसीच्या निवडणुकीसाठी नऊ ठिकाणी मतमोजणी

Ishan Kishan : १० षटकार, ६ चौकार! इशान किशनचे वादळी शतक; अभिषेक शर्माच्या विक्रमाशी बरोबरी, पूर्ण केल्या ५०० धावा

31 Dec Deadline alert : ३१ डिसेंबर शेवटची संधी!, बँक अन् ‘आधार’शी संबंधित 'ही' महत्त्वाची कामे केली नाहीत, तर पडेल महागात!

'एक दो तीन' गाण्यावेळी माधुरी दीक्षितसोबत नक्की काय घडलं? की, सरोज खान वैतागून म्हणाल्या...'तू घरी जा...'

SCROLL FOR NEXT