करमाळा(सोलापूर): करमाळा तालुक्यात सध्या युरिया टंचाई निर्माण झाली आहे. त्यामुळे युरिया खरेदीसाठी शेतकऱ्यांनी खताच्या दुकानांसमोर रांगा लावल्याचे चित्र बुधवार (ता. 22) रोजी पहायला मिळाले.
करमाळा शहरातील महेश ऍग्रो एजन्सीकडे बुधवारी 910 पोत्यांची आवक झाली. प्रत्येक शेतकऱ्याला दोन पोते याप्रमाणे कृषी विकास अधिकारी कैलास मिरगणे यांच्या उपस्थितीत या खताचे वाटप करण्यात आले. युरिया खरेदी करण्यासाठी शेतकऱ्यांनी मोठी रांग लावली होती. परंतु, खरेदी करण्यासाठी आलेल्या 50 टक्के शेतकऱ्यांनाच युरिया मिळाला. तर 50 टक्के शेतकऱ्यांना रिकाम्या हाती परत जावे लागले. करमाळा तालुक्यात समाधानकारक पेरणीयोग्य पाऊस पडल्यामुळे मका, तूर, सूर्यफूल, उडीद या पिकाची मोठ्या प्रमाणावर पेरणी झाली आहे.
या पिकांची खुरपणी झाली असून खुरपणीनंतर युरिया खताची आवश्यकता आहे. मात्र युरिया खरेदी करण्यासाठी खत विक्रेते शेतकऱ्यांना इतर खते घेण्यासाठी बळजबरी करत आहेत. 10:26:26, डीएपी मॅग्नेट या खताची खरेदी करा, मगच युरीया देतो, असे शेतकऱ्यांना सांगितले जात आहे. करमाळा तालुक्यात जवळपास दोनशे टन युरियाची आवक झाली. तरीही व्यापारी युरियासाठी शेतकऱ्यांना लिंकींग खते घेण्यावरून वेठीला धरत असल्याचे प्रकार निदर्शनास आले आहे.
कारवाई करून परवाने रद्द करू
कृषी विभागातर्फे नोंदविण्यात आलेल्या मागणीप्रमाणे करमाळ्याला युरिया मिळत नाही. कंपनीचे अधिकारी ठरावीक तालुक्याला जास्त माल देतात. करमाळ्यात आलेला युरियासुद्धा व्यापारी दाबून ठेवतात. अशा व्यापाऱ्यांवर कारवाई करून परवाना रद्द करणार आहे.
- कैलास मिरगणे, कृषी अधिकारी, करमाळा
मागणीप्रमाणे युरिया मिळत नाही
आठ दिवसापासून करमाळ्यात युरिया उपलब्ध असला तरी व्यापारी नाही म्हणून सांगतात. आज युरिया मिळाला याबाबत खत विक्रेते महेश चिवटे यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, की मागणीप्रमाणे आम्हाला युरिया मिळत नाही. आज आलेला युरिया वाटप केले आहे.
- तात्यासाहेब शिंदे, माजी सरपंच, कोळेगाव
संपादनः प्रकाश सनपूरकर
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.