अवकाळीमुळे पंढरपुरातील 8 हजार एकर द्राक्षबागांना मोठा फटका! esakal
सोलापूर

अवकाळीमुळे पंढरपुरातील 8 हजार एकर द्राक्षबागांना मोठा फटका!

अवकाळीमुळे पंढरपुरातील 8 हजार एकर द्राक्षबागांना मोठा फटका!

सकाळ वृत्तसेवा

मध्यरात्रीपासून पंढरपूर तालुक्‍यात अवकाळी पाऊस सुरू आहे. अवकाळी पावसाचा द्राक्ष, डाळिंब बागांसह रब्बी पिकांना मोठा फटका बसला आहे.

पंढरपूर (सोलापूर) : मध्यरात्रीपासून पंढरपूर (Pandharpur) तालुक्‍यात अवकाळी पाऊस (Rain) सुरू आहे. अवकाळी पावसाचा द्राक्ष (Grapes), डाळिंब (Pomegranate) बागांसह रब्बी पिकांना मोठा फटका बसला आहे. अवकाळीमुळे तालुक्‍यातील सुमारे 8 हजार एकरावरील द्राक्षबागा धोक्‍यात आल्या आहेत. तर डाळिंब बागांचेही मोठे नुकसान झाले आहे. संततधार पावसामुळे तालुक्‍यातील ऊसतोडी बंद झाल्या आहेत. परिणामी, कारखान्याच्या दैनंदिन गाळप क्षमतेवर परिणाम झाला आहे. सततच्या अवकाळी पावसामुळे शेतकर्यांचे पार कंबरडे मोडले आहे. सरकारने द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी केली जात आहे.

सततच्या हवामान बदलामुळे द्राक्ष, डाळिंब, केळी, सीताफळ, पेरू यासह अन्य फळबागा व भाजीपाल्याची शेती धोक्‍यात आली आहे. यावरही मात करत द्राक्ष बागा वाचवण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड सुरू आहे. अशातच कालपासून (बुधवार) अवकाळी पावसाची संततधार सुरू आहे. आज (गुरुवारी) पहाटेपासून पावसाचा आणखी जोर वाढला आहे. सलग आठ तासाहून अधिक काळ पाऊस सुरू असल्याने द्राक्षाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.

पंढरपूर तालुक्‍यात सुमारे 8 ते 10 हजार एकरावर द्राक्षबागा आहेत तर सुमारे 12 हजार एकरावर डाळिंबाचे पीक आहे. संततधार पावसामुळे द्राक्ष घडात पाणी शिरल्याने कुजवा आणि दावण्याचा प्रादुर्भाव होण्याची भीती आहे. तर अनेक ठिकाणी द्राक्षावरील फुलोरा गळून पडला आहे. त्यामुळे उत्पादनात मोठी घट होईल, अशी शक्‍यता द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांमधून व्यक्त केली जात आहे. अवकाळीचा सर्वाधिक फटका कासेगाव, टाकळी, बोहाळी, खर्डी या भागातील द्राक्षबागांना बसला आहे. मिरची, कांदा, शेवगा यासह इतर भाजीपाल्यांच्या शेतीलाही अवकाळीचा मोठा फटका बसला आहे.

दरम्यान, पावसामुळे ऊस तोडणीवरही मोठा परिणाम झाला आहे. कालपासून काही भागात पाऊस सुरू झाल्याने ऊस तोडणीचे काम थांबले आहे. आजच्या पावसामुळे अनेक ठिकाणी उसाची वाहने शेतात अडकून पडली आहेत. त्यामुळे कारखान्याच्या दैनंदिन गाळप क्षमतेवर परिणाम झाला आहे. अवकाळी पावसामुळे द्राक्षाचे मोठे नुकसान झाले आहे. हातातोंडाशी आलेला घास पावसाने हिरावून घेतला आहे. आधीच द्राक्ष शेती संकटात आहे. अशातच अवकाळी

पावसामुळे द्राक्ष बागांचे नुकसान झाले आहे. माझ्या 24 एकर द्राक्ष बागेचे अवकाळीमुळे सुमारे 30 ते 40 लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. सरकारने शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी.

- सुरेश टिकोरे, द्राक्ष उत्पादक शेतकरी, कासेगाव

आजच्या अवकाळी पावसाचा सर्वात जास्त फटका द्राक्षबागांना बसला आहे. कुजव्या, करपा, डावण्या, घड जिरणे, आदी संभाव्य रोगांपासून बागा वाचविताना शेतकऱ्यांना मोठी कसरत करावी लागणार आहे. त्यातूनच फवारण्यांचा खर्च वाढणार आहे. शेतात पाणी साठून राहिल्याने सर्वच पिकांच्या पांढरी मुळीची वाढ खुंटणार आहे. त्याचा परिणाम उत्पादनावर होणार आहे.

- दत्तात्रय वसेकर, कृषी पर्यवेक्षक, करकंब

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bhopal Crime: महिलांची अंतर्वस्त्रे चोरायचा अन् स्वतः घालून झोपायचा; पोलिसांनी काढला माग, धक्कादायक कारण आलं समोर

Ajit Pawar: अजित पवारांच्या हेलिकॉप्टरमधून बजरंग सोनवणेंचा प्रवास; बीडच्या राजकारणात नवा ट्विस्ट

१३ वर्षांपासून शारीरिक संबंध नाही, विकी डोनर बनवून ठेवलंय... टीव्हीच्या श्रीकृष्णाने पत्नीवर केलेले गंभीर आरोप

Ladki Bahin eKYC: लाडक्या बहिणींना दिलासा की तांत्रिक गोंधळ? लाडकी बहीण योजनेची ई-केवायसी सुविधा सुरूच, पण अंतिम तारीख काय?

India Cricket Matches in 2026: टी२० वर्ल्ड कप ते इंग्लंड, न्यूझीलंडचे दौरे... भारतीय संघाचे २०२६ वर्षात कसे आहे संपूर्ण वेळापत्रक?

SCROLL FOR NEXT