Rajabhau Patil a farmer in Washimbe has experimented with apple cultivation.jpg 
सोलापूर

आता मिळणार करमाळ्याचे सफरचंद; उजनीच्या जवळ राजाभाऊ पाटील यांनी लावली ९९ जातीची रोपे

राजाराम माने

केतूर (सोलापूर) : सफरचंद म्हटले की, आपल्या डोळ्यासमोर आपसुकच चित्र ऊभे राहते ते म्हणजे जम्मू काश्मीर, शिमला, मनालीचे. परंतु करमाळा तालुक्यातील ऊस आणि केळीचे आगार समजल्या जाणाऱ्या ऊजनी लाभक्षेत्रातील वाशिंबे येथे प्रगतशील शेतकरी राजाभाऊ साहेबराव पाटील यांनी सफरचंदाच्या हर्मन ९९ जातीच्या सुमारे दीड एकर क्षेत्रावर ५४४ रोपांची लागवड केली आहे.

राजाभाऊ पाटील यांनी लागवडीपूर्वी महाराष्ट्र, कर्नाटक या राज्यातील सफरचंद लागवड केलेल्या प्रयोगशील शेतकऱ्यांच्या बागांना प्रत्यक्ष भेटी देऊन व उत्तर भारतातील सफरचंद शेतीविषयी मोबाईल इंटरनेटच्या माध्यमातून संपूर्ण माहिती घेऊन डिसेंबर २०१९ मध्ये जम्मू काश्मीर येथून राष्ट्रपती पदक विजेते हरिमत शर्मा यांनी विकसित केलेल्या ऊष्ण कटिबंधीय प्रदेशात तयार होणाऱ्या हर्मन ९९ जातीची रोपे प्रती रोप ७० रुपये प्रमाणे मागवून घेऊन १२ फूट रूंद व १० फूट लांबीवर रोपांची लागवड केली.

पंधरा महिन्याच्या कालावधीत त्यांना आत्तापर्यंत 60 हजार रुपये खर्च आला आहे. झाडांची परिस्थिती समाधान कारक असून झाडांना सुमारे आठ फूट ऊंचीची झाङे झाली आहेत. त्यांचा हा करमाळा तालुक्यातील पहिलाच प्रयोग असल्याने या नवीन प्रयोगाचे संपूर्ण तालुक्यातील शेतकऱ्यांकडून कौतुक होत आहे. त्यांनी आपल्या शेतात आत्तापर्यंत केळी, डाळींब, सीताफळ, शेवगा, पेरू, ड्रँगन फ्रूट, अशा फळपिकांचे यशस्वी प्रयोग केले आहेत. त्यामुळे त्यांच्या अशा प्रयोगातून परिसरातील शेतकऱ्यांना त्यांच्यापासून प्रेरणा मिळाली आहे.

पाटील यांनी आपल्या शेतीमध्ये पारंपारिक शेती बरोबरच केळी, सीताफळ, डाळिंब, पेरू तसेच ड्रगन फ्रुट आदि पिकांचा यशस्वी प्रयोग केला आहे.     थंडगार वातावरणात सफरचंदाच्या बागा फुलतात वाढतात. परंतु आपल्या भागातील वातावरणामुळे ते येतील की नाही अशी शंका होती. परंतु सविस्तर माहिती घेतली व लागवड केली, असे राजाभाऊ पाटील यांनी 'सकाळ' शी बोलताना सांगितले. शेणखत व इतर खतांचा झाडांसाठी वापर केला. उष्ण व दमट हवामानात हा प्रयोग केल्याने सर्वत्र आश्चर्य व्यक्त केले जात आहे. अभिजीत, हर्षवर्धन तसेच अतुल ही तिन्ही मुलेही शेतीत मदत करतात. नवीन प्रयोगाबाबत शासकीय पातळीवर प्रोत्साहन मिळणे गरजेचे आहे, असे पाटील यांनी सांगितले.

'उजनी लाभक्षेत्रातील पारंपारिक ऊस पीकाशिवाय शेतकरी इतर पिकाकडे वळत आहे, ही निश्चितच स्वागतार्ह बाब आहे. सफरचंदाचा हा प्रयोगही निश्चितच यशस्वी होईल असे वाटते.'
 - सुयोग शंकर झोळ, शेतकरी, वाशिंबे .

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Winter Update : राज्यातील थंडी गायब की गारठा कायम राहणार? हवामान विभागाचा महत्त्वाचा अंदाज समोर

PIFF Mahotsav : ‘पिफ’ १५ जानेवारीपासून रंगणार; सुमारे १४० चित्रपट दाखविले जाणार

होता स्‍कार्फ म्‍हणून वाचला गळा! 'बिबट्याचा वृद्ध महिलेवर जीवघेणा हल्ला; गवतातून झडप, जिवाच्या आकांताने आरडाओरडा अन्..

सोलापूर जिल्ह्यात 2 वर्षात 1350 जणांचा अपघाती मृत्यू! दुपारी 4 ते रात्री 12 या वेळेत सर्वाधिक अपघात; ‘या’ 5 महिन्यात अपघाताचे प्रमाण जास्त

लाडक्या बहिणींना ‘ई-केवायसी’साठी ३१ डिसेंबरपर्यंत मुदत! महापालिकेत लाडक्या बहिणींचे मतदान आपल्यालाच मिळावे म्हणून भावी नगरसेवकांकडून मोफत ‘ई-केवायसी’ शिबिरे

SCROLL FOR NEXT