maidarngi.jpg 
सोलापूर

मैंदर्गीत रॅपिड अँटीजन टेस्टमध्ये आढळले 19 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण 

अैादुंबर चव्हाण


मैंदर्गी(सोलापूर)ः मैंदर्गी येथे कोरोनाचा पादुर्भाव वाढत असल्याने शहरातील ऐंशी जणांचे अँन्टीजन रॅंपिड टेस्ट घेण्यात आली. त्यामध्ये 19 कोरोना बाधित रूग्ण आढळले असल्याची माहिती तहसीलदार अंजली मरोड यांनी दिली. 

नगरपालिका प्रशासनाने संपूर्ण शहर प्रतिबंधित क्षेत्र लागू केली आहे. यामुळे शहरातील बाजारपेठ शंभर टक्के बंद करण्यात आली आहे. गेल्या तीन दिवसात चाळीस कोरोना बाधित रुग्ण आढळले आहेत. 


यासाठी कोरोनाचा संक्रमणाची साखळी तोडण्यासाठी शहरात नगरपालिका सभागृहात सकाळी 10 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत अँन्टीजन रॅंपिड टेस्ट घेण्यात आली. या तपासणी मध्ये ऐंशी जणापैकी 19 अहवाल पॉझिटिव्ह तर 61 अहवाल निगेटिव्ह आले. पॉझिटिव्ह रूग्ण विविध भागातून आढळल्याने शहरात चिंतेचे वातावरण पसरले आहे. मैंदर्गीतील कोरोना बाधित तपासलेले रूग्ण हे अँन्टीजन रॅंपिड टेस्टने सोबत स्वॅब पध्दतीने देखील या रुग्णांची टेस्ट घ्यावी अशी मागणी नागरिकांतून केली जात आहे. गटनेता किरण केसूर, प्राथमिक आरोग्य केंद्राचे अधिकारी डॉ गजानन मारकड, पी आर अंटद, नगरपालिकेचे कार्यालयीन अधिक्षक अनिकेत सरडे, संदिप पवार, दिलीप जगदी, पोलीस निरीक्षक विजय जाधव, पोलिस उपनिरीक्षक सि. बी. बेरड, एजाज मुल्ला यांच्यासह नगरपालिकेचे सदस्य आणि कर्मचारी आरोग्य सेवक आदी उपस्थित होते 
 
 

संपादन  ः प्रकाश सनपूरकर 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran-Israel War: होर्मुजच्या समुद्रधुनीत भारत इराणविरुद्ध युद्धनौका तैनात करणार? ट्रम्प यांच्या आवाहनावर परराष्ट्र मंत्रालयाने दिलं उत्तर

Pune News: सुरक्षारक्षकाच्‍या सतर्कतेमुळे युवती सुखरूप परतली घरी; युवती रात्रभर अंधारात, अन् खडकवासला धरण परिसरात काय घडलं!

Pune Pollution: प्रदूषण रोखण्याची घोषणा हवेतच! पुणे महापालिकेला बांधकाम प्रकल्पांवर सेन्सर बसविण्याचा विसर, धूलिकणांचा आरोग्यावर गंभीर परिणाम..

Javali politics: जावळीच्या राजकारणात शिवेंद्रसिंहराजेच'धुरंधर'; दोन्ही पदांवर भाजपचाच झेंडा, राष्ट्रवादीच्या शिल्पा शिंदे तटस्थ!

Latest Marathi Update: DRDO चे माजी शास्त्रज्ञ डॉ. प्रदीप कुरुलकर जासूसी प्रकरण

SCROLL FOR NEXT